डोळ्यांखालील डार्क सर्कल्स घालवण्यासाठी लावा दही, या पद्धतीने वापरून पहा

दही आणि हळदीच्या मदतीने हा मास्क तयार केला जातो. दही डोळ्यांना थंडावा देते. त्याचबरोबर हळद आपल्या डोळ्यांखालील काळेपणा दूर करण्यास मदत करते. हा मास्क ट्राय करून तुम्ही जिद्दी डोळ्यांखालील डार्क सर्कल्सपासून सुटका मिळवू शकता.

डोळ्यांखालील डार्क सर्कल्स घालवण्यासाठी लावा दही, या पद्धतीने वापरून पहा
under eye curd
Follow us
| Updated on: May 14, 2023 | 3:46 PM

मुंबई: डोळे ही माणसाची ओळख आहे. त्यामुळे आकर्षक डोळे मिळावेत अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण अनेकांना डोळ्यांखाली डार्क सर्कलची समस्या असते, ज्यामुळे तुमच्या डोळ्यांच्या सौंदर्याला ग्रहण लागतं. अशातच आज आम्ही तुमच्यासाठी “दही अंडर आय मास्क” घेऊन आलो आहोत. दही आणि हळदीच्या मदतीने हा मास्क तयार केला जातो. दही डोळ्यांना थंडावा देते. त्याचबरोबर हळद आपल्या डोळ्यांखालील काळेपणा दूर करण्यास मदत करते. हा मास्क ट्राय करून तुम्ही जिद्दी डोळ्यांखालील डार्क सर्कल्सपासून सुटका मिळवू शकता. याशिवाय फुगलेल्या आणि थकलेल्या डोळ्यांच्या समस्येवरही तुम्ही मात करू शकता, तर चला जाणून घेऊया दही मास्क कसे बनवावे?

दही अंडर आय मास्क बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • एक चमचा दही
  • एक चमचा हळद पावडर

कसे बनवावे?

  • डोळ्याखाली दही मास्क लावण्यासाठी आधी एक वाटी घ्या.
  • नंतर त्यात एक चमचा दही आणि एक चमचा हळद पावडर घाला.
  • त्यानंतर त्यात एक चमचा लिंबाचा रस घालावा.
  • मग तुम्ही या सर्व गोष्टी नीट मिसळून गुळगुळीत पेस्ट तयार करा.
  • आता तुमचे दही अंडर आय मास्क तयार आहे.

दही अंडर आय मास्क कसे लावावे?

  • चेहरा धुवून पुसून घ्या.
  • त्यानंतर तयार केलेला मास्क डोळ्याखाली चांगला लावा.
  • यानंतर साधारण १५-२० मिनिटे ठेवा.
  • यानंतर चेहरा धुवून स्वच्छ करावा.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.