केसांना पांढरे होण्यापासून रोखेल ‘कढीपत्ता’, अशाप्रकारे बनवा हेअर पॅक

कढीपत्त्याची पाने अतिशय औषधी असतात. याला एक विशिष्ट प्रकारचा सुगंध असल्यामुळे निरनिराळ्या चटण्यामध्ये, भाज्यांमध्ये व मसाल्यामध्ये सुद्धा याचा वापर केला जातो.

केसांना पांढरे होण्यापासून रोखेल 'कढीपत्ता', अशाप्रकारे बनवा हेअर पॅक
कढीपत्ता
Follow us
| Updated on: Mar 24, 2021 | 4:11 PM

मुंबई : कढीपत्त्याची पाने अतिशय औषधी असतात. याला एक विशिष्ट प्रकारचा सुगंध असल्यामुळे निरनिराळ्या चटण्यामध्ये, भाज्यांमध्ये व मसाल्यामध्ये सुद्धा याचा वापर केला जातो. केस पांढरे होणे ही एक सामान्य समस्या आहे. आजकाल तरुण वयातच नव्हे तर लहान मुलांचेही केसही पांढरे होत आहेत. तणाव आणि बदलेल्या जीवनशैलीमुळे तरूण वयातच लोकांची पांढरे केस होत आहेत. (Curry tree is beneficial for health)

कढीपत्ता आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर असतो. यात कॅल्शियम, फायबर, प्रथिने आणि जीवनसत्त्वे यासह बरेच पौष्टिक घटक आहेत. कढीपत्ता केस आणि त्वचेसाठी देखील लाभदायी आहे. बहुतेक लोकांना गडद आणि दाट केस आवडतात. परंतु योग्य काळजी न घेतल्यामुळे, केस गळणे आणि पांढरे केस ही समस्या सामान्य झाले आहे. जर, आपल्यालाही केस गळून पडण्याची समस्या उद्भवत असेल, तर नारळ तेलात कढीपत्ता आणि आवळा घाला. तेलाचा रंग काळा होईपर्यंत हे तेल मिश्रण उकळवा. थंड झाल्यावर स्काल्प आणि केसांच्या मुळांवर हे तेल लावा. दुसर्‍या दिवशी केस स्वच्छ धुवा.

कढीपत्त्यात असलेले फायबर रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते. या व्यतिरिक्त हे पाचन तंत्रास देखील बळकट करते. ज्यामुळे शरीरात कोलेस्टेरॉल जमा होत नाही. कढीपत्त्याचे सेवन केल्यास हृदय व रक्तवाहिन्यांचा धोका कमी होतो. यासाठी दररोज 8 ते 10 कढीपत्ता किंवा रस प्या. याशिवाय कढीपत्ता आमटी, भात आणि सलाडमध्ये मिसळून खाऊ शकता

कढीपत्त्याचे इतर फायदे :

-कढीपत्त्याच्या पानांमध्ये पालक, मेथी, कोिथबीर या भाज्यापेक्षा ‘अ’ जीवनसत्त्वाचे प्रमाण जास्त असते. तसेच इतर भाज्यांपेक्षा या पानांमध्ये कर्बोदके आणि प्रथिनांचे प्रमाण साधारणत: दुप्पट असते.

-लघवीला जळजळ होऊन थेंब थेंब होत असेल तर अशा वेळी कढीपत्त्याच्या पानांच्या रसामध्ये सुती कापडाच्या घडय़ा बुडवून ओटीपोटावर ठेवाव्यात. यामुळे शरीरातील उष्णता कमी होऊन लघवीची जळजळ थांबते.

-कढीपत्त्याची पाने ही रक्तवर्धक व रक्तशुद्धीकारक आहेत. या पानांच्या नियमित सेवनाने रक्ताचे प्रमाण वाढून रक्त शुद्ध होण्यास मदत होते.

(टीप : कुठल्याही कृतीपूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

(Curry tree is beneficial for health)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.