Dark Circle Home Remedy | डोळ्यांखाली काळी वर्तुळे येतायत? ‘या’ टिप्स नक्की वापरून पाहा…
आपण कितीही काळजी घेतली तरी, कामाच्या ताणामुळे आणि झोपेच्या वेळेमुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे तयार होतात.
मुंबई : आपले सुंदर डोळे हे आपल्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा असतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही कमी झोप घेतली किंवा ताणताणाव यामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे आली तर तुमचे सौंदर्य रंगहीन दिसू लागते. आपण कितीही काळजी घेतली तरी, कामाच्या ताणामुळे आणि झोपेच्या वेळेमुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे तयार होतात. यामुळे आपण आजारी असल्यासे सारखे दिसू लागतो. आपण देखील या समस्येने ग्रस्त आहात, तर या घरगुती उपायांचा नक्की अवलंब करू शकता (Dark Circle Home Remedy tips).
डोळ्यांवर काकडी ठेवणे
घरगुती उपचार काळी वर्तुळे नाहीशी करण्यासाठी सर्वात प्रभावी असल्याचे सिद्ध होऊ शकते. काळी वर्तुळे अर्थात डार्क सर्कलपासून मुक्त होण्यासाठी डोळ्यावर काकडीचे काप ठेवा. काकडीत अँटीऑक्सिडेंट असतात. त्याचा थंड प्रभाव आपल्याला डोळ्यांना शीतलता देईल, तसेच डोळे डार्क सर्कलपासून मुक्त होतील.
थंड टी बॅग
ज्या वस्तू थंड आहेत, त्या डार्क सर्कल कमी करण्यात लाभदायी ठरतात. आपण ही युक्ती थंड चमच्याच्या सहाय्याने देखील करू शकता. परंतु, आपण वापरलेल्या टी बॅग गोठवून ही टीप करून पाहू शकता. या टी बॅग आयमास्क प्रमाणे 15 मिनिटे डोळ्यांवर ठेवू शकता (Dark Circle Home Remedy tips).
दूध
डार्क सर्कल अर्थात काळी वर्तुळे नाहीशी करण्यासाठी थंड दुधही खूप फायदेशीर आहे. दुधामध्ये भरपूर व्हिटामिन ए असते, जे काळपटपण कमी करण्यास मदत करते. यासाठी एक कॉटन बॉल थंड दुधात भिजवा आणि सुमारे 15 मिनिटांसाठी आपल्या डोळ्यांवर ठेवावा. असे नियमित केल्यास लवकर बदल दिसून येईल.
व्हिटामिन ई तेल
‘व्हिटामिन ई’ मुरुमे आणि काळी वर्तुळे कमी करण्यात मदत करते. तसेच यामुळे आपला त्वचेचा टोन चांगला राहतो. डार्क सर्कल कमी करण्यासाठी व्हिटामिन ईच्या तेलात कोरफड जेल मिसळावे. रोज रात्री झोपण्यापूर्वी हे तेल आपण डोळ्यांभोवती लावू शकता.
नेहमी सरळ झोप
दररोज 8 तास झोप घ्या. तसेच नेहमी सरळ रेषेत झोपा. पोटावर किंवा एका कुशीवर झोपल्यामुळे लिम्फॅटिक अॅसिड जमा होते आणि आपला चेहरा फुगतो.
(Dark Circle Home Remedy tips)
Skin Care Tips | लग्न करताय? ना ब्यूटी पार्लर, ना ट्रिटमेंट, ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा ग्लो!https://t.co/k1NdKE8Rsy#TipsForBrideToBe #Bride #marriage #WeddingGoals
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 7, 2020