मुंबई : सध्या धकाधकीच्या जीवनात झोप पुरेशी होत नाही. त्यामुळे तरूणींच्या तसंच महिलांच्या डोळ्याखाली डाग सर्कल (Dark Circles Removal) आल्याचं दिसतं. तणाव आणि थकव्यामुळे देखील डाग सर्कल येऊ शकतात. त्यामुळे आपला चेहरा डल दिसायला लागतो. त्यासाठी काय करावं कळत नाही. अनेकदा काही क्रिम वापरूनही फायदा होत नाही. पण आपल्या घरातील काही (Home Remedies) गोष्टी वापरूनही आपल्याला फरक अनुभवता येऊ शकतो. तुम्ही काही घरगुती उपाय करून पाहू शकता. यामुळे डार्क सर्कलची समस्या दूर होण्यास मदत होईल. काकडी, हिरव्या चहाच्या पिशव्या, दूध, गुलाब पाणी, मध आणि लिंबाचं मिश्रण वापरल्यास तुम्हाला फायदा होऊ शकतो.
काकडी वापरूनही तुम्ही डाग सर्कलपासून सुटका मिळवू शकतात. त्यासाठी काकडी कापून घ्या. थंड होण्यासाठी काही वेळ फ्रीजमध्ये ठेवा. काकडीचे तुकडे काही वेळ डोळ्यांवर ठेवा. 10 ते 15 दिवस डोळ्यांवर ठेवा. त्यानंतर ते काढून टाका. यामुळे तुमच्या डोळ्यांना खूप थंडावा मिळेल.
ग्रीन टी डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. त्यात अँटिऑक्सिडंट गुणधर्म आहेत. ग्रीन टी पिशव्या वापरल्यानंतर त्यांचा वापर केला जाऊ शकतो. यानंतर ग्रीन टी बॅग्ज फ्रीजमध्ये ठेवा. त्यानंतर त्यांना बाहेर काढा. त्यांना 15 मिनिटे डोळ्यांवर राहू द्या. यामुळे डोळ्यांना खूप आराम मिळेल. यामुळे डोळ्यांची सूजही दूर होते.
दुधात व्हिटॅमिन ए मोठ्या प्रमाणात असते. यासाठी दूध थंड करा. दुधात कापूस बुडवा. डोळ्यांवर ठेवा. 10 ते 15 मिनिटं राहू द्या. त्यानंतर ते काढून टाका. त्यामुळे डाग सर्कलची समस्या दूर होण्यास मदत होते.
टोमॅटो वाटून घ्या.तो रस एका भांड्यात घ्या. त्यात 1 चमचा लिंबाचा रस टाका. नंतर हे मिश्रण कापसाने डार्क सर्कलवर लावा. काही वेळ तसंच राहू द्या. त्यानंतर चेहरा धुवा. यामुळे तुमचे डाग सर्कल कमी व्हायला मदत होईल शिवाय डोळ्यांना थंडावा मिळेल.
गुलाबपाणी डाग सर्कलसाठी फायदेशीर आहे. एका भांड्यात गुलाबपाणी घ्या. त्यात कापसाचा गोळा भिजवून 20 मिनिटं डोळ्यांवर ठेवा. काही वेळ तसंच राहू द्या. तुम्ही ते रोज सकाळी वापरू शकता. यामुळे डार्क सर्कलची समस्या दूर होण्यास मदत होईल.
एका भांड्यात थोडं मध आणि लिंबाचा रस घ्या. ते डाग सर्कलवर लावा. 20 मिनिटे तसेच राहू द्या. यानंतर त्वचा पाण्याने धुवा. यामुळे तुम्हाला काही दिवसात फरक दिसू लागेल.