Corona | भारतातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने उतार कसा झाला? वैज्ञानिकांनाही पडलाय प्रश्न..
गेल्या चार महिन्यांत भारतातील कोरोना रूग्णांच्या संख्येत मोठी घसरण झाली आहे आणि आता भारतात कोरोना संसर्गाची केवळ 10,000 प्रकरणे दररोज नोंदवली जात आहेत.
मुंबई : गेल्या वर्षी सप्टेंबरपर्यंत भारतात दररोज सुमारे एक लाख कोरोनाग्रस्तांची नोंद झाली होती. हाच काळ होता जेव्हा या प्रकरणात भारत अमेरिकेला मागे टाकण्याच्या मार्गावर होता. रुग्णालये कोरोना रुग्णांनी भरलेली होती. भारतीय अर्थव्यवस्था मंदीच्या गर्तेत गेली होती. तथापि, गेल्या चार महिन्यांत भारतातील कोरोना रूग्णांच्या संख्येत मोठी घसरण झाली आहे आणि आता भारतात कोरोना संसर्गाची केवळ 10,000 प्रकरणे दररोज नोंदवली जात आहेत (Decreasing corona cases in India mystery for scientist).
गेल्या महिन्यात आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की 26 जानेवारी रोजी भारतात कोरोनाचे केवळ 9,100 नवीन रुग्ण आढळले आहेत. गेल्या आठ महिन्यांतील ही सर्वात कमी रुग्ण संख्या आहे. त्याशिवाय 7 फेब्रुवारी रोजी केवळ 11,831 प्रकरणे नोंदविण्यात आली. जॉर्जटाउन युनिव्हर्सिटीचे हेल्थ इकॉनॉमिस्ट जिष्णू दास म्हणतात, ‘भारतात ना कसलीही चाचणी कमी झाली आहे की धोक्याला कमी लेखले गेले नाही, मग हा वेगवान पसरणारा आजार अचानक कसा नाहीसा झाला? रुग्णालयात आयसीयूचा वापरही कमी झाला आहे. प्रत्येक गोष्ट हेच दर्शवते की आता भारतात रूग्णांची संख्या कमी झाली आहे.’
वैज्ञानिकांसाठी रहस्य
हे अगदी वैज्ञानिकांसाठी देखील एक रहस्य आहे. ते भारतात कोरोना बळींच्या संख्येत अचानक होणाऱ्या घटविषयी ते चौकशी करत आहेत. भारतीय लोक काय करत आहेत आणि कोरोना विषाणूचा संसर्ग पसरलेल्या इतर देशांनी काय करण्याची गरज आहे, हे समजून घेण्याचा प्रयत्न वैज्ञानिक करत आहेत.
हा प्रश्न अगदीच सामान्य आहे. एडिनबर्ग विद्यापीठातील सार्वजनिक आरोग्य संशोधक जिनेव्ही फर्नांडिस म्हणतात, ‘अर्थात यामागे सार्वजनिक आरोग्य सेवा उपाय कार्यरत आहेत. चाचणी संख्या वाढवण्यात आली आहे. परिस्थिती बिकट होण्यापूर्वी लोक रुग्णालयात जात आहेत, त्या मुळे मृतांचा आकडा देखील खाली आला आहे. पण हे आत्तापर्यंत एक रहस्यच आहे.’ संशोधक भारतातील मास्कचे निर्बंध आणि सार्वजनिक अंतराच्या आवश्यकतेचे नियम तपासत आहेत. त्यासोबतच देशात सामान्यतः पसरणार्या रोगांसाठीचे हवामान, लोकसंख्याशास्त्र आणि पद्धती समजून घेण्याचा प्रयत्नही केला जात आहे.
मास्क घालणे आवश्यक!
आशिया, आफ्रिका दक्षिण अमेरिका आणि भारत अशा अनेक देशांत सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे बंधनकारक केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: कोरोना साथीच्या सुरुवातीच्या टप्प्यात मास्क घालताना दिसले. त्यांचा संदेश अगदी स्पष्ट होता. मुंबईसारख्या मोठ्या शहरांच्या नगरपालिकांमध्ये पोलिस प्रशासनाने मास्क न घातलेल्यांकडून 200 रुपये दंड आकारण्यास सुरवात केली. जे लोक घराबाहेर पडले आहेत, जॉगर्स, बीच चालणारे किंवा ओपन एअर रिक्षामध्ये बसलेल्या प्रवाशांनाही हा दंड तितकाच लागू होता (Decreasing corona cases in India mystery for scientist).
मुंबईत नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला अधिकाऱ्यांनी मास्क न घातलेल्यांकडून सुमारे 27 लाख रुपये दंड जमा केला. जुलैमध्ये प्रसिद्ध झालेल्या सर्वेक्षणात सुमारे 95 टक्के लोकांनी असे सांगितले की, ‘शेवटच्या वेळी ते घराबाहेर पडले तेव्हा त्यांनी मास्क परिधान केले होते.’ नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्चने फोनद्वारे हा अभ्यास केला.
शासनाने दिलेला संदेशही एका फोन कॉलवर ऐकू आला. यात ‘हात धुणे’ आणि ‘मास्क आवश्यक’ यासारख्या महत्त्वाच्या गोष्टींबद्दल इशारा देण्यात येत होता. तथापि, मास्क आवश्यक आणि हात धुण्याऐवजी आता लसीकरणाचे आवाहन करण्यात आले आहे.
उष्णता आणि आर्द्रता
कोरोना बळींच्या संख्येत घट होण्यासाठी हवामान देखील उपयुक्त ठरू शकते. देशातील बहुतेक भाग गरम आणि दमट आहेत. श्वसन विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी भारताचे हवामान उपयुक्त आहे. तथापि, काही गोष्टी त्याउलट देखील आहेत. प्लस वन जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या शेकडो नागरिकांच्या संशोधनाचा आढावा घेताना असे दिसून आले आहे, की कोरोनाचा प्रभाव गरम आणि दमट ठिकाणी कमी आहे. उबदार तापमान आणि आर्द्रता एकत्रितपणे कोरोना विषाणूचा परिणाम कमी करते.
पेन्सिल्व्हानिया राज्य विद्यापीठाच्या सेंटर फॉर इन्फेक्टीव्ह डिसीझ डायनेमिक्सचे संचालक एलिझाबेथ मॅकग्रा यांनी गेल्या वर्षी एनपीआरला सांगितले की, थंड आणि कोरड्या ठिकाणी हवेत या विषाणूचे थेंब जास्त काळ कार्यरत असतात. गरम हवा आणि आर्द्रता असलेल्या ठिकाणी थेंब झपाट्याने खाली येतात, ज्यामुळे संक्रमणाचा धोका कमी होतो (Decreasing corona cases in India mystery for scientist).
मात्र दुसरीकडे गेल्या वर्षी जुलै महिन्यात ‘द लान्सेट’मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, अति उष्णतेमुळे लोक वातानुकूलित खोल्यांमध्येच राहतात. यामुळे विषाणूचा फैलाव होण्याचा धोकाही वाढतो. ‘नॅचरल रिसोर्स डिफेन्स कौन्सिल’ने असा इशारा दिला होता की, अति उष्णतेमुळे लोकांना डिहायड्रेशन आणि अतिसाराचा त्रास होईल आणि ते रुग्णालयांकडे वळतील, तेव्हा रुग्णालये कोरोनावर प्रथम उपचार घेत असलेल्या रूग्णांनी भरले जातील. बंद ठिकाणी लोकांना एकत्र केल्याने संक्रमणाचा धोका देखील वाढेल.
रोगांशी लढण्याची क्षमता
भारतात आधीपासूनच मलेरिया, डेंग्यू ताप, टायफॉइड, हिपॅटायटीस आणि कॉलरासारखे आजार आहेत. देशातील कोट्यवधी लोकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी देखील मिळत नाही. स्वच्छता आणि आरोग्यदायी अन्नाची कमतरता आहे. काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अशा परिस्थितीत राहणाऱ्या लोकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती अधिक क्षमतेची असते.
मुंबईतील ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनच्या शहरी धोरण तज्ज्ञ सायली मानकीकर म्हणतात, “भारतीयांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे. इथले बहुतेक लोक जीवनात एकदा मलेरिया, टायफाइड आणि डेंग्यूसारख्या आजारांना बळी पडतात. परंतु प्रतिकारशक्तीच्या चांगल्या प्रणालीमुळे आपण या रोगांपासून विजय मिळवा. या प्रबंधात दोन नवीन शोधनिबंध देखील समर्थित आहेत.’
डेमोग्राफिक
भारत हा तरुणांचा देश असे म्हणतात. 65 वर्षापेक्षा जास्त वयाचे केवळ 6 टक्के लोक येथे राहतात. निम्म्याहून अधिक लोक 25 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. अनेक अभ्यासात हे स्पष्ट झाले आहे की, कोरोनामुळे तरुणांना मृत्यूचा धोका कमी आहे. आणखी एका अहवालात असे म्हटले आहे की, देशात वयाच्या 65 वर्षांपेक्षा जास्त काळानंतर कोरोना मृत्यू दर आपोआप कमी होतो.
चेन्नईच्या शास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की कमी उत्पन्न असणार्या देशांमध्ये जेथे आरोग्य सेवा, स्वच्छता आणि स्वच्छता सुविधा कमी आहेत, तिथे कोरोना मृत्यूचे प्रमाण खूपच कमी आहे. त्याच वेळी डॉ. राजेंद्र प्रसाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शास्त्रज्ञांना अभ्यासात असे आढळले की ज्या देशात विविध प्रकारचे सूक्ष्मजंतू आणि बॅक्टेरिया आढळतात, तिथे देखील कोरोनापासून मृत्यूचा धोका कमी असतो.
तज्ज्ञांना चुकीचे सिद्ध केले!
साथीच्या काळात भारताचे हवामान आणि लोकसंख्याशास्त्र बदलले नाही. सप्टेंबरमध्ये ही प्रकरणे झपाट्याने वाढली परंतु त्यानंतर घटतच राहिले. अशा वेळी कोरोना बळी पडलेल्यांची संख्या नोंदवली गेली होती, तसेच ती आणखी वाढेल, असे तज्ज्ञांनी म्हटले होते. ऑक्टोबरमध्ये दिवाळी आणि दुर्गापूजनाच्या वेळी कोरोनाची प्रकरणे वाढण्याची शक्यताही तज्ज्ञांनी व्यक्त केली होती. मात्र, हा आकडा सातत्याने उतरत राहिला आहे.
(Decreasing corona cases in India mystery for scientist)
हेही वाचा :
कोरोना विषाणू फुफ्फुसांना कसा पोखरतो? वैज्ञानिकांना महत्त्वपूर्ण माहिती मिळालीhttps://t.co/7Kz124dXyv #coronavirus #CoronaVaccine #Corona
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 13, 2020