Summer Drinks : उकाड्याने हैरान झालाय? तर मग ‘या’ चार स्पेशल हेल्दी ड्रिंक नक्की ट्राय करा, वाचा रेसिपी !

| Updated on: May 08, 2021 | 10:24 AM

उन्हाळ्याच्या हंगामात आरोग्याची विशेष काळजी घेणे महत्वाचे आहे. उष्णतेचा सामना करण्यासाठी आपल्याला नेहमीच हायड्रेटेड आणि रीफ्रेश राहणे आवश्यक आहे.

Summer Drinks : उकाड्याने हैरान झालाय? तर मग या चार स्पेशल हेल्दी ड्रिंक नक्की ट्राय करा, वाचा रेसिपी !
Follow us on

मुंबई : उन्हाळ्याच्या हंगामात आरोग्याची विशेष काळजी घेणे महत्वाचे आहे. उष्णतेचा सामना करण्यासाठी आपल्याला नेहमीच हायड्रेटेड आणि रीफ्रेश राहणे आवश्यक आहे. हायड्रेटेड राहण्यासाठी पाणी, लिंबू शरबत पिऊन आपण बोर होतो. आज आम्ही तुम्हाला खास उन्हाळ्यात पिण्यासाठी चार पेय सांगणार आहोत. जे अतिशय चवदा आहेत आणि ज्यामुळे तुमचे शरीर हायड्रेटेड राहिल. या पेयांची रेसिपी पाहूयात. (Definitely try the summer special healthy drink)

कलिंगड स्पेशल ज्यूस

साहित्य

-आले

-हिरवी मिरची 1

-ताजे कलिंगड 6-7 भाग

-मध 10 मि.ली.

-लिंबाचा रस 5 मि.ली.

-पद्धत
कलिंगडचे तुकडे, हिरवी मिरची आणि आले एकत्र करा. सर्व्हिंग ग्लासमध्ये मिक्स करा आणि त्यात लिंबाचा रस आणि मध आला. यानंतर यामध्ये पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्या. आपले पेय तयार आहे.

सफरचंद स्पेशल 

साहित्य

-सफरचंद – अर्धा, बारीक चिरून

-अॅपल ग्रीन टी – 2 ग्रॅम

-बर्फ – 6 ते 8 तुकडे

-थंड पाणी – 150 मि.ली.

-दालचिनीची – आपल्याला हवे असल्यास

-मध – आवश्यक असल्यास – 1 चमचे

-पद्धत
अर्धा बारीक चिरलेला सफरचंद आणि अॅपल ग्रीन टी – 2 ग्रॅम मिक्स करून घ्या. त्यानंतर त्यामध्ये बर्फाचे तुकडे आणि मध घालून हे चांगले मिक्स करा. हे मिश्रण एका काचेच्या भांड्यात काढा. आपण इच्छित असल्यास, आपण एक दालचिनी देखील यामध्ये घालू शकता. यानंतर थंड पाणी घाला आणि थंड सर्व्ह करावे.

आंबा, काकडी स्पेशल ज्यूस

साहित्य

-4-5 काकडी रस

-8 – 10 आंब्याचा रस

-1 चमचा हळद

-1/2 टीस्पून वेलची

-1 चमचे मध

-1.5 ताजे लिंबाचा रस

-1 आले आल

-बर्फ

पध्दत-

काकडीचा रस एका मोठ्या भांड्यात काढून घ्या. त्यामध्ये आता लिंबाचा काढलेला रस घाला हे दोन्ही रस चांगले मिक्स करून घ्या. त्यानंतर त्यामध्ये हळद आणि वेलची मिक्स करा. सर्वात शेवटी आले आणि मध आला. यानंतर त्यामध्ये थंड पाणी आणि बर्फाचे तुकडे मिक्स करा. थंड सर्व्ह करावे.

पुदीना स्पेशल ज्यूस

साहित्य

-पुदीना पाने – 3 ते 5 पाने

-पेपरमिंट ग्रीन टी – 2 ग्रॅम

-बर्फ – 6 ते 8 तुकडे

-थंड पाणी – 150 मि.ली.

-मध 1 चमचे

-काकडी – बारीक चिरून

पध्दत-

सर्वात अगोदर पुदीण्याची पाने बारिक करून घ्या. त्यानंतर त्यामध्ये पेपरमिंट ग्रीन टी मिक्स करा. त्यामध्ये मध आणि काकडीचे बारीक तुकडे मिक्स करा. सर्वात शेवटी त्यामध्ये थंड पाणी मिक्स करा.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

(Definitely try the summer special healthy drink)