Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin Care : चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय नक्की ट्राय करा !

सगळ्यांनाच आपला चेहरा हेल्दी आणि चमकदार हवा असतो. परंतु जर आपल्या चेहऱ्यावर अगदी लहान वयातच सुरकुत्या पडल्या, तर कदाचित आपणास सकाळी उठून आरशात आपला चेहरा पाहणे देखील आवडणार नाही.

Skin Care : चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा !
सुंदर त्वचा
Follow us
| Updated on: Jun 06, 2021 | 10:20 AM

मुंबई : सगळ्यांनाच आपला चेहरा हेल्दी आणि चमकदार हवा असतो. परंतु जर आपल्या चेहऱ्यावर अगदी लहान वयातच सुरकुत्या पडल्या, तर कदाचित आपणास सकाळी उठून आरशात आपला चेहरा पाहणे देखील आवडणार नाही. म्हणूनच, आपणही आपल्या त्वचेची विशेष काळजी घेतली पाहिजे. ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या पडणार नाहीत. सुरकुत्या चेहऱ्यावर पडल्यावर विशेष काळजी ही घ्यावी लागते. (Definitely try this remedy to get rid of facial wrinkles)

-चेहऱ्यावरील सुरकुत्या गायब करण्यासाठी दूध अत्यंत फायदेशीर आहे. रात्री झोपण्याच्या अगोदर आपल्या चेहऱ्याला गायीचे कच्चे दूध लावा आणि रात्रभर तसेच ठेवा. यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होण्यास मदत होते. हा उपाय आपण सतत एक महिना केला तर चेहऱ्यावरील सुरकुत्या गायब होतील. मात्र, हे दूध नेहमी ताजे आणि न गरम केलेले असावे.

-चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या घालवण्याचा चंदन पावडर फायदेशीर असते. चंदनाचा लेप चेहऱ्याला लावल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या जाण्यास मदत होते. चंदनातील अॅन्टीबॅक्टेरीयल तत्त्व हे चेहऱ्यावर परिणाम करणारे बॅक्टेरीया नष्ट करतात आणि आपला चेहरा उजळवतात.

-चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी ऑलिव्ह ऑईल फायदेशीर आहे. ऑलिव्ह ऑईलचा वापर करून आपण सुरकुत्यापासून मुक्त होऊ शकता. दररोज रात्री झोपण्याच्या अगोदर संपूर्ण चेहऱ्याला ऑलिव्ह ऑईल लावा आणि काही वेळ चेहऱ्याचा मसाज करा आणि चेहरा धुवा.

-अंड्यामध्ये मध मिसळा आणि दररोज चेहऱ्यावर लावा. हे आपल्या त्वचेला पोषण देईल तसेच एक आठवड्यात आपल्या चेहऱ्यावरही फरक दिसून येईल. सलग 25 दिवस हे केल्यानंतर, आपण दर दोन ते तीन दिवसांनी हे लागू शकतो. हे केल्याने आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या जाण्यास मदत होते.

-अंडी फेसपॅक वृद्धत्वाचा प्रभाव लपविण्यासाठी देखील कार्य करते. त्यामध्ये वृद्धत्व विरोधी गुणधर्म असतात. हा पॅक तयार करण्यासाठी 1 अंडे घ्या आणि त्यामध्ये 4 ते 5 थेंब तेल मिक्स करा. हे चांगले मिसळा आणि संपूर्ण चेहऱ्याला यावर लावा आणि कोरडे झाल्यावर थंड चेहरा धुवा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Skin Care Tips | लग्न करताय? ना ब्यूटी पार्लर, ना ट्रिटमेंट, ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा ग्लो!

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

(Definitely try this remedy to get rid of facial wrinkles)

..पण तोपर्यंत उशीर झाला होता, गनबोटेंच्या पत्नीनं सांगितला थरारक अनुभव
..पण तोपर्यंत उशीर झाला होता, गनबोटेंच्या पत्नीनं सांगितला थरारक अनुभव.
पहलगाम घटनेच्या निषेधार्थ मालेगाव बंदची हाक
पहलगाम घटनेच्या निषेधार्थ मालेगाव बंदची हाक.
लष्कर-ए-तोयबासाठी काम करणाऱ्या 4 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या
लष्कर-ए-तोयबासाठी काम करणाऱ्या 4 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या.
हल्ला झालेल्या बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 चा ग्राउंड रिपोर्ट
हल्ला झालेल्या बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 चा ग्राउंड रिपोर्ट.
आमच्या भावना, संवेदना सरकार सोबत; पहलगामवर संजय राऊतांची प्रतिक्रिया
आमच्या भावना, संवेदना सरकार सोबत; पहलगामवर संजय राऊतांची प्रतिक्रिया.
शरद पवारांनी घेतलं जगदाळे आणि गणबोटेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन
शरद पवारांनी घेतलं जगदाळे आणि गणबोटेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन.
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक.
75 पर्यटकांची पहिली तुकडी एकनाथ शिंदेंसह मुंबईत दाखल
75 पर्यटकांची पहिली तुकडी एकनाथ शिंदेंसह मुंबईत दाखल.
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.