World’s Top Restaurant: जगातील सर्वश्रेष्ठ रेस्टॉरंट आठवड्यातील केवळ 4 दिवस सुरू, टॉप 50 रेस्टॉरंट्सची यादी जाहीर

तुम्ही जर फिरण्याचे आणि खाण्या-पिण्याचे शौकीन असाल जगभरातील टॉप 50 रेस्टॉरंट्सची नावे जरूर जाणून घ्या. डेन्मार्कमधील कोपनहेगन येथील रेस्टॉरंट सर्वश्रेष्ठ ठरले असून विशेष म्हणजे ते आठवड्यातील केवळ 4 दिवसच सुरू असते.

World's Top Restaurant: जगातील सर्वश्रेष्ठ रेस्टॉरंट आठवड्यातील केवळ 4 दिवस सुरू, टॉप 50 रेस्टॉरंट्सची यादी जाहीर
Follow us
| Updated on: Jul 23, 2022 | 9:58 PM

तुम्ही जर फिरण्याचे आणि खाण्या-पिण्याचे शौकीन असाल जगभरातील टॉप 50 रेस्टॉरंट्सची ( World’s Top 50 restaurants) नावे जरूर जाणून घ्या. काही रेस्टॉरंट्समध्ये जेवण चांगले असते ,पण त्यांची सर्व्हिस खास नसते. तर काही ठिकाणी माहौल, वातावरण उत्तम असले तरी जेवणाची चव आवडत नाही. त्यामुळे सर्व निकषांवर बसणारे आणि उत्तम चवीचे जेवण असणारे रेस्टॉरंट सापडणे, तसे कठीणच असते. हेच लक्षात ठेऊन जगभरातील टॉप 50 रेस्टॉरंट्सच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये डेन्मार्कमधील (Denmark)कोपनहेगन येथील जेरेनियम (Geranium) हे रेस्टॉरंट सर्वश्रेष्ठ ठरले आहे. या रेस्टॉरंटने सलग दुसऱ्या वर्षीही प्रथम क्रमांक पटकावला असून विशेष म्हणजे हे रेस्टॉरंट आठवड्यातील केवळ 4 दिवसच सुरू असते. कधी तिकडे फिरायला गेलात, तर या रेस्टॉरंटमधील जेवणाचा आस्वाद नक्की घ्या.

काय आहेत या लिस्टमधील विशेष गोष्टी ?

जगभरातील टॉप 50 रेस्टॉरंट्समध्ये डेन्मार्कमधील जेरेनियम (Geranium) हे रेस्टॉरंट प्रथम स्थानावर आहे. सलग दुसऱ्यांदा या रेस्टॉरंटने या यादीत पहिल क्रमांक पटकावला आहे. तर पेरू मधील लीमा येथील सेंट्रल ( Central) हे रेस्टॉरंट दुसऱ्या स्थानावर असून ते संपूर्ण दक्षिण अमेरिकेतील सर्वश्रेष्ठ हॉटेल ठरले आहे. स्पेनमधील बार्सिलोना येथील Disfrutar हे तिसऱ्या स्थानावर आहे. मेक्सिको स्थित पुजॉ (Pujol) हे उत्तर अमेरिकेतील सर्वश्रेष्ठ रेस्टॉरंट ठरले असून या यादीत ते पाचव्या (5th) स्थानावर आहे. जपानमधील टोकियो येथील डेन (Den)हे आशियातील सर्वात उत्तम रेस्टॉरंट ठरले असून टॉप 50 रेस्टॉरंट्सच्या यादीत ते 20 व्या स्थानावर आहे. गेल्या वर्षी टॉप 20 मधील सर्वश्रेष्ठ रेस्टॉरंट्सचा पुरस्कार केवळ युरोप उत्तर आणि अमेरिकेतील हॉटेल्सनाच मिळाला होता. त्यामध्ये स्पेन, अमेरिका, यूके, डेन्मार्क, इटली आणि फ्रान्स या देशांतील रेस्टॉरंट्सची नावे होती. मात्र यंदा या यादीत आशियातील रेस्टॉरंटचाही समावेश झाला आहे.

काय आहे जगातील सर्वश्रेष्ठ रेस्टॉरंटचे वैशिष्ट्य ?

जेरेनियम (Geranium) रेस्टॉरंटचे वैशिष्ट्य म्हणजे तेथील पदार्थ एका कलेप्रमाणे सादर केले जातात. त्यांच्या जेवणात मीटचा (मांस) समावेश नसतो, तेथे तुम्हाला उत्तम सी-फूड चाखायला मिळेल. डेन्मार्कमधील कोपनहेगन येथील सॉकर स्टेडियमच्या 8 व्या मजल्यावरील या रेस्टॉरंटमधील जेवणाची चव अप्रतिम असते. कामाच्या नवनवीन पद्धती स्वीकारणाऱ्या या रेस्टॉरंटचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते आठवड्यातील केवळ 4 दिवसच सुरु असते.

या रेस्टॉरंटमध्ये टेस्टिंग मेन्यूसाठी अंदाजे 450 डॉलर ( 36 हजार रुपये) खर्च करावे लागतात. टेस्टिंग मेन्यू म्हणजे वेगवेगळ्या कोर्समध्ये अनेक पदार्थ चाखायला मिळतात. तर टॉप 50 रेस्टॉरंट्सच्या यादीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या स्पेनमधील बार्सिलोना येथील Disfrutar या रेस्टॉरंटमध्ये टेस्टिंग मेन्यूसाठी 112 डॉलर ( सुमारे 9000 रुपये) द्यावे लागतात. ही किंमत 250 डॉलर्सपर्यंत वाढत जाऊ शकते.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.