Skin Care : खरंच रेड वाईनमुळे उजळतो चेहरा? जाणून काय आहे सत्य

Skin Care : फक्त रेड वाईन प्यायल्यामुळे नाही तर, रेड वाईनने चेहरा धुतल्यामुळे देखील उजळतो? काय सांगतात डॉक्टर जाणून घ्या..., त्वचेसाठी आपण अनेक सौंदर्य प्रसाधणांचा वापर करतो... जाणून घ्या काय आहेत रेड वाईनचे चेहऱ्याला होणारे फायदे?

Skin Care : खरंच रेड वाईनमुळे उजळतो चेहरा? जाणून काय आहे सत्य
Follow us
| Updated on: Jan 12, 2024 | 2:54 PM

मुंबई | 12 जानेवारी 2024 : तुम्ही अनेकदा तुमच्या आस-पासच्या व्यक्तींकडून ऐकलं असेल की, रेड वाईनमुळे स्किन उजळते. हे देखील एक कारण आहे ज्यामुळे रेड वाईन पिण्याचा ट्रेंड खूप वाढला आहे आणि रेड वाईनची मागणी देखील वाढली आहे. रेड वाईनमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-सेप्टिक गुणधर्म आहेत, ज्यामुळे पिंपल्स आणि एक्नेची समस्या दूर होते. याशिवाय हे बॅक्टेरिया कमी करण्यासही मदत करते… असं आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं आहे. रेड वाईनमुळे खरंच चेहरा उजळतो का? या प्रश्नाचं उत्तर डॉक्टरांनी दिलं आहे.

काय म्हणतात एक्सपर्ट ?

दिल्लीच्या इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलमधील डर्मेटोलॉजिस्ट विभागातील वरिष्ठ सल्लागार डॉ. डी.एम. महाजन सांगतात की, यामध्ये रेस्वेराटॉल नावाचे अँटीऑक्सिडंट असते, जे त्वचेसाठी खूप फायदेशीर मानले जाते. हे अँटिऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्स आणि ऑक्सिडेटिव्ह तणाव दूर करतात. या अँटीऑक्सिडंटच्या अँटी इंफ्लामेटरी गुणधर्मामुळे त्वचेमध्ये कोलेजन तयार होते, ज्यामुळे त्वचेचे वृद्धत्व कमी होते.

रेड वाईन पीत असाल तर व्हा सावधान

डॉ. डी.एम. महाजन सांगतात की, कोणत्याही गोष्टीचं अधिक प्रमाण सेवन करणं धोकादायक होऊ शकतं. रेड वाईन स्किनसाठी गुणकारी आहे. पण रेड वाईनमुळे आरोग्यास मोठा धोका देखील होऊ शकतो. रेड वाईनचं अधिक प्रमाणात सेवन केल्यास स्किन खराब होऊ शकते. अल्कोहोलचं अधिक सेवन डिहाइड्रेशन आणि इंफ्लामेशनचं कारण ठरु शकतं.

हे सुद्धा वाचा

रेड वाईन पिण्यासोबतच तुम्ही रेड वाईनने चेहर धुवू देखील शकता. जर तुम्हाला एक्ने किंवा पिंपल्सची समस्या वारंवार होत असेल तर त्यापासून आराम मिळवण्यासाठी कॉटन बॉल रेड वाईनमध्ये बुडवून एक्ने किंवा पिंपल्सवर लावा. लाल वाइन त्वचेवर 15-20 मिनिटे ठेवा आणि नंतर धुवा.

त्वचा किंवा संबंधित समस्या टाळण्यासाठी तुम्ही रेड वाईन वापरत असाल तर त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा, असेही महाजन सांगतात. त्वचेसाठी अनेक जण सौंदर्य प्रसाधणांचा वापर करतात. पण कोणत्याही गोष्टीचा वापर करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या…

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.