Dink Couple: दोघेही कमवतात तरी पालक व्हायचे नाही, जाणून घ्या काय आहे हा ट्रेंड

हल्ली रिलेशनशिपशी वेगवेगळे ट्रेंड उदयास येत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे डिंक कपल. जे आजकाल खूप लोकप्रिय होत आहे. आपल्या आजूबाजूला अशी अनेक जोडपी आहेत जी आजकाल डिंक कपल बनण्याचा निर्णय घेत आहेत. या नवीन ट्रेंडबद्दल जाणून घेऊयात.

Dink Couple: दोघेही कमवतात तरी पालक व्हायचे नाही, जाणून घ्या काय आहे हा ट्रेंड
Follow us
| Updated on: Oct 12, 2024 | 6:52 PM

समाजात वेगवेगळ्या गोष्टी येतात तेव्हा त्याचा दूरपर्यंत प्रभाव असतो. भारतीय संस्कृती आणि पाश्चिमात्य संस्कृती यात मोठा फरक आहे. भारतीय संस्कृतीत कुठे तरी आता पाश्चात्य संस्कृती घर करू लागल्या आहेत. अगदी लिव्ह इन पासून ते डिंक कपल पर्यंतची जीवनशैली आता भारतात ही दिसू लागली आहे. समाजावर विचारसरणी मोठा प्रभाव टाकत असते. बदलत्या जीवनशैलीमुळे आणि विचारसरणीमुळे नात्याविषयी नवीन संकल्पना येऊ लागल्या आहेत. आता डिंक कपल हे सध्या ट्रेंड होत आहे. नातेसंबंधाच्या या नवीन ट्रेंडबद्दल वेगवेगळे मतं आहेत.

डिंक कपल म्हणजे काय?

DINK म्हणजे दुहेरी उत्पन्न पण मुले नाही. अशी जोडपी जिथे दोन्ही नोकरी करतात आणि दोघांचे वेगवेगळे उत्पन्नाचे स्रोत आहेत, परंतु ते मुले जन्माला घालत नाहीत. 20 व्या शतकाच्या मध्यात आणि विशेषत: 21 व्या शतकात, जेव्हा महिलांनी अधिक शिक्षण घेतले आणि नोकरीमध्ये त्यांची संख्या वाढली तेव्हा हा शब्द लोकप्रिय झाला. दुप्पट उत्पन्नाच्या सुविधेमुळे जोडप्यांचा पालक होण्याचा दृष्टिकोन बदलला. पण यामुळे समाजाची मूलभूत व्यवस्था तसेच कौटुंबिक रचना देखील बदलली आहे. जोडप्यांनी कुटुंबाला पुढे जाण्यासाठी लग्नानंतर काही काळानंतर मुले जन्माला घालण्याचा विचार केला.

आर्थिक जबाबदारी : मुलांचे संगोपन ही आता मोठी आर्थिक जबाबदारी आहे. पण सर्व DINK जोडप्यांचे उत्पन्न जास्त असेलच असे नाही. अनेक निम्न मध्यमवर्गीय आणि कमी उत्पन्न असलेल्या DINK जोडप्यांना जगण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. अशा परिस्थितीत जर मुले झाली तर त्यांचे संगोपन आणि शिक्षणाचा खर्च यामुळे आर्थिक बोजा वाढतो. उच्च उत्पन्न असलेले जोडपे मुलांच्या संगोपनासाठी वेळ देण्याऐवजी सुट्टी, टूर आणि विलासी जीवनशैली जगणे पसंत करतात. ते दीर्घकाळासाठी आर्थिक स्थिरतेलाही प्राधान्य देऊ शकतात.

करिअर : आजच्या काळात स्त्री आणि पुरुष दोघेही महत्त्वाकांक्षी झाले आहेत. त्यांचं करिअरमध्ये यश मिळवण्याकडे जास्त लक्ष असतं. ते पालकत्वाच्या घेण्याच्या तयारीत नसतात. कारण मुले झाले तर याचा त्यांच्या करिअरच्या विकासावर विपरीत परिणाम होतो.

जीवनशैली : मुलाचे संगोपन करण्यासाठी आणि त्यांना वेळ देताना स्वांतत्र्य कमी होऊन जाते. DINK जोडपे त्यांचे जीवन त्यांच्या इच्छेनुसार जगण्याच्या स्वातंत्र्याला प्राधान्य देतात. पालक होऊन त्यांनाजबाबदाऱ्यांमध्ये अडकायचे नसते. त्यांना त्यांच्या जीवनशैलीचा आनंद घेण्यासाठी आणि नवीन ठिकाणी भेट देण्यासाठी अधिक वेळ घालवायचा असतो. त्यांचा वेळ आणि पैसा त्यांच्या वैयक्तिक काळजीवर खर्च करायचा असतो.

लोकसंख्येच्या वाढीबद्दल चिंता : काही DINK जोडपे असे ही सांगतात की, त्यांना जास्त लोकसंख्या आणि त्याच्या पर्यावरणीय परिणामांबद्दल काळजी वाटते. त्यामुळे ते मुलं जन्माला घातल नाहीत.

इच्छा पूर्ण करण्यासाठी: काही DINK जोडपे पारंपारिक कौटुंबिक प्लानिंग करण्याऐवजी एकमेकांमध्ये अधिक आनंदी असतात आणि त्यांचे छंद पाळतात. काही जोडप्यांना वैद्यकीय परिस्थितीमुळे गर्भधारणा होत नाही. त्यामुळे ते पालक होण्याऐवजी त्यांच्या आरोग्याला प्राधान्य देतात. काहींना मानसिक शांती आवडते आणि त्यांच्या जीवनात तणाव कमी हवा असतो.

डिंक जोडपे असणे ठीक आहे का?

हा निर्णय जोडप्याच्या वैयक्तिक पसंतींवर अवलंबून आहे. पंरतू DINK जोडपे असण्याचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत. या पर्यायाच्या दोन्ही बाजूंचा गांभीर्याने विचार करून मगच निर्णय घेणे केव्हाही उचित ठरेल. घाईघाईत किंवा सोशल मीडियाच्या प्रभावामुळे किंवा केवळ ट्रेंड असल्यामुळे ही निवड करणे योग्य नाही. यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.