Divorce Rate: भारतात दिवसागणिक का वाढत आहे घटस्फोटाचं प्रमाण? ‘ही’ आहेत 5 मोठी कारणं

Why Divorce Rate Is Increasing In India: घटस्फोटाचा डाग स्वतःवर लागल्यानंतर..., गेल्या काही वर्षांपासून भारतात का वाढतोय घटस्फोटाचा आकडा? 'ही' 5 कारणं हैराण करणारी...

Divorce Rate: भारतात दिवसागणिक का वाढत आहे घटस्फोटाचं प्रमाण? 'ही' आहेत 5 मोठी कारणं
Follow us
| Updated on: Aug 20, 2024 | 1:01 PM

Why Divorce Rate Is Increasing In India: भारतात सर्वात जास्त महत्त्व संस्कृतीला दिलं जातं. शिवाय भारतीय संस्कृतीमध्ये लग्नाला जन्मोजन्मीचं नातं मानलं जातं. लग्न झाल्यानंतर पती – पत्नी कायमसाठी एकमेकांचे होऊन जातात. लग्नात सात जन्म एकत्र राहाण्याचं वचन पती – पत्नी एकमेकांना देतात. पण आता भारतात देखील घटस्फोटाच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. सांगायचं झालं तर, पाश्चिमात्य देशांच्या तुलनेक भारतात घटस्फोटाचं प्रमाण फार कमी आहे. पण गेल्या काही वर्षांपासून भारतात घटस्फोटाच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. तर भारतात घटस्फोट होण्याची 5 सर्वात माठी कारणं आहेत.

1. व्यस्त जीवनशैली : आजच्या धावपळीच्या आयुष्यात पती – पत्नीमध्ये कम्यूनिकेश गॅप वाढत आहे. जर पती – पत्नी दोघे ऑफिसमध्ये जाणारे असतील तर, दोघांमधील वेळ आणि प्रोफेशनल आयुष्य एकत्र सांभांळणं कठीण होतं. ज्यामुळे भावनात्मक दुरावा निर्माण होतो. अनेक गैरसमज देखील निर्माण होतात, ज्यामुळे नातं घटस्फोटापर्यंत पोहचू शकतं.

2. सामाजिक विचारांमध्ये बदल – सुरुवातीला घटस्फोटाला स्वतःवर लागलेला फार मोठा डाग समजला जायचं. कारण पूर्वी घटस्फोट घेण्याचा विचार करताना अनेक गोष्टींचा सामना करावा लागत होता. पण आता परिस्थिती पूर्ण बदलली आहे. लोकं परिस्थितीचा स्वीकार शक्त तितक्या लवकर करण्यास शिकले आहेत. विशेषतः शहरी भागांमध्ये घटस्फोट आता सामान्य गोष्ट होत आहे.

3. महिला जागरूकता – गेल्या काही वर्षांमध्ये महिलांमध्ये साक्षरतेचं प्रमाण झपाट्याने वाढत आहे. महिलांना देखील आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आणि सक्षम होण्यासाठी संधी मिळत आहे. महिला आता स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतात. म्हणून लग्नानंतर ज्या महिलांना हवं तसं जगता येत नाही, अशात नातं घटस्फोटापर्यंत पोहोचतं. शिवाय महिलांना त्यांचे हक्क देखील माहिती झाले आहेत.

4. इगो प्रॉब्लम्स – आजच्या दिवसांमध्ये पती – पत्नी दोघे स्वतंत्र असल्यामुळे त्यांच्यामध्ये इगो प्रॉब्लम्स मोठ्या प्रमाणात निर्माण होतात. एक व्यक्ती रागात असेल तेव्हा दुसऱ्याने शांत राहिल्यास नाती अधिक काळ टिकू शकतात. पण सतत दोघांमधील इगो नात्यामध्ये येत असेल तर लग्न घटस्फोटापर्यंत पोहोचतं…

5. लव्ह मॅरिजचं वाढतं प्रमाण – पूर्वी घरातल्या प्रमुख व्यक्ती लग्न ठरवायचे. म्हणून पती – पत्नीमध्ये काही मतभेद झाल्यास वाद मिटवण्याची जबाबदारी देखील घरातल्या मोठ्यांची असायची. पण आता लव्ह मॅरेजचं प्रमाण वाढलं आहे. तरुण – तरुणी आता लव्ह मॅरेजला अधिक प्राधान्य देतात. पण लग्नानतंर पाहिलेले स्वप्न पूर्ण न झाल्यास ते स्वतःच घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतात. शिवाय कुटुंबाकडून देखील लव्ह मॅरेजला पाठिंबा मिळत नाही.

प्रसूतीसाठी गर्भवतीला पुराच्या पाण्यातून नेले; बांबूची झोळी अन् पायपीट
प्रसूतीसाठी गर्भवतीला पुराच्या पाण्यातून नेले; बांबूची झोळी अन् पायपीट.
सरन्यायाधीशांच्या घरी मोदी, विरोधकांच्या टीकेवर फडणवीसांचं प्रत्युत्तर
सरन्यायाधीशांच्या घरी मोदी, विरोधकांच्या टीकेवर फडणवीसांचं प्रत्युत्तर.
शिवसेनेकडून मुस्लिम महिलांना बुरखा विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
शिवसेनेकडून मुस्लिम महिलांना बुरखा विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
'मग अजितदादांना कुठे फेकायचं तेही सांगा',शरद पवार गटातील नेत्याचा सवाल
'मग अजितदादांना कुठे फेकायचं तेही सांगा',शरद पवार गटातील नेत्याचा सवाल.
खर्गे राजीनामा देणार? भाजप आक्रमक, कुणी केली राजीनाम्याची मागणी
खर्गे राजीनामा देणार? भाजप आक्रमक, कुणी केली राजीनाम्याची मागणी.
'त्या' पत्रानंतर किरीट सोमय्या म्हणाले, 'मला कोणतंही पद नको, तर मला..'
'त्या' पत्रानंतर किरीट सोमय्या म्हणाले, 'मला कोणतंही पद नको, तर मला..'.
'माझी विनंती, आता फसायच नाही', बार्शीच्या आमदारान जरांगेंना जोडले हात
'माझी विनंती, आता फसायच नाही', बार्शीच्या आमदारान जरांगेंना जोडले हात.
'जरांगे म्हणतील का..राहुल गांधी फडणवीसांचा माणूस?' भाजप नेत्याचा सवाल
'जरांगे म्हणतील का..राहुल गांधी फडणवीसांचा माणूस?' भाजप नेत्याचा सवाल.
हा रस्ता म्हणावा की काय? मुंबईच्या या भागातील रस्त्याला भलं मोठं भगदाड
हा रस्ता म्हणावा की काय? मुंबईच्या या भागातील रस्त्याला भलं मोठं भगदाड.
बारामती अन् साताऱ्यात बाप्पाच्या सजावटीत थेट दादांची लाडकी बहीण योजना
बारामती अन् साताऱ्यात बाप्पाच्या सजावटीत थेट दादांची लाडकी बहीण योजना.