चुकूनही चहामध्ये टाकू नका हे तीन पदार्थ, अन्यथा चहा करेल विषाचे काम
अनेकांची दिवसाची सुरुवात सकाळी चहा पिऊन होते पण चहा मध्ये दूध, साखर, गूळ यांचा समावेश कधीही करू नये. त्यासोबतच काही खाद्यपदार्थ आहेत जे चहासोबत खाऊ नये. यामुळे अनेक आजार होऊ शकतात.
चहा असे पेय आहे ज्या शिवाय दिवसाची सुरुवात होत नाही. सकाळी उठल्याबरोबर सकाळचा एक कप चहा घेतला तरच सकाळी फ्रेश वाटते. असे अनेक जण सांगतात. घरी कोणी पाहुणे आले तर सर्वप्रथम त्यांना चहा देतो. जर तुम्हाला मित्रांसोबत गप्पा टप्पा करायच्या असतील तर तुम्ही चहाच्या स्टॉलवर जाऊन गरमागरम चहा पितात. पण तुम्हाला माहिती आहे का की जर आपण चहा मध्ये तीन गोष्टी मिसळून चहा पिला तर हा चहा विषारी होऊ शकतो. आयुर्वेदात या तीन गोष्टी चहाच्या विरोधात मानल्या जातात आणि चहा मध्ये टाकून पिल्यास एक दोन नव्हे तर तब्बल दहा प्रकारचे आजार होऊ शकतात.
चहामध्ये चुकूनही टाकू नका या तीन गोष्टी डॉ. रॉबिन शर्मा यांनी नुकतेच इंस्टाग्राम वर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे या व्हिडिओमध्ये त्यांनी चहामध्ये कोणत्या गोष्टी टाकू नयेत आणि तुम्ही अश्या प्रकारे बनवलेला चहा तुमच्या शत्रूंना द्यावा हे सांगितले आहे.
डॉ. रॉबिन यांनी सांगितले आहे की, दूध आणि साखर घालून केलेला चहा हा आरोग्यासाठी हानिकारक असतो. त्यामुळे दूध आणि साखरेचा चहा कधीही पिऊ नये. एवढेच नाही तर काही लोक चहा मध्ये साखरे ऐवजी गुळाचा वापर करतात. पण चहा मध्ये गूळ घातल्याने पचनाचा धोका वाढतो आणि मधुमेहही वाढतो त्यामुळे चहा मध्ये या तीन गोष्टी कधीही टाकू नयेत.
चहा सोबत हे पदार्थ खाणे टाळा आयुर्वेदानुसार चहा सोबत काही खाद्यपदार्थ खाणे देखील विषाचे काम करतात. डॉक्टर रॉबिन यांच्या मते चहा सोबत समोसे, भजे, नमकीन पदार्थ कधीही खाऊ नये. याशिवाय काही जणांना चहा सोबत पराठा खाण्याची सवय असते तर चहा सोबत पराठा देखील खाऊ नये विशेषतः पॅकिंगच्या पिठापासून बनवलेली पोळी किंवा पराठ्यामुळे आजार होऊ शकतात.
बहुतेक लोक दूध, केळी, गूळ आणि हरभरा यांचा शेक बनवतात आणि तो पितात जो प्रोटीनने समृद्ध आहे असे मानले जाते. मात्र हा शेक पोटात गेल्यानंतर अनेक रोगांचा धोका वाढू शकतो. या रोगांमध्ये टाईप 1 मधुमेह, संधिवात, सोरायटिक संधिवात, मल्टिपल स्क्लेरोसिस, दाहक आतडी रोग, ग्रेव्हस रोग, मायस्थेनिया ग्रॅव्हिस, सेलिआक रोग, अपायकारक अशक्तपणा यासारख्या रोगांचा समावेश होतो.