AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सकाळी उठल्यानंतर ‘या’ 5 चुका करू नका, नाहीतर तुमचे आयुष्य होईल उद्ध्वस्त

आजकालच्या या धावपळीच्या जीवनात असे फार कमी लोकं असतात जी सकाळी उठल्यानंतर नियमित त्यांच्या आरोग्याची काळजी घेत चांगल्या गोष्टी करताना दिसतात. खरं तर सकाळच्या काही वाईट सवयी मेंदुला मंद आणि कमकुवत बनवते, म्हणून सकाळी उठल्यानंतर तुम्ही कोणत्या गोष्टींची चुक केली नाही पाहिजे ते जाणून घ्या...

सकाळी उठल्यानंतर 'या' 5 चुका करू नका, नाहीतर तुमचे आयुष्य होईल उद्ध्वस्त
waking up
Follow us
| Updated on: Apr 24, 2025 | 6:30 PM

संपूर्ण दिवस आनंदी आणि उत्साहात जाण्यासाठी अनेक लोकं सकाळी लवकर उठतात. असं म्हणतात की तुमची संपूर्ण दिनचर्या तुमच्या सकाळच्या सवयींवर अवलंबून असते. सकाळी उठल्यानंतर जर तुम्हाला तुमचे कोणतेही काम यशस्वी करायचे असेल तर त्यापूर्वी तुम्हाला तुमच्या आयुष्यातील काही सवयी बदलाव्या लागतील. काही चांगल्या सवयी अंगीकारल्याने तुम्ही लवकरच यशाच्या मार्गावर वेगाने धावू शकाल. अशातच सकाळी लवकर उठल्यानंतर संपूर्ण दिवस फ्रेश आणि आनंदात जातो. परंतु, बरेच लोक सकाळी अशा गोष्टी करायला सुरुवात करतात, ज्यामुळे त्यांना दिवसभर त्रास होत राहतो.

कारण सकाळच्या सवयी अनेकदा एखाद्या व्यक्तीला श्रीमंतीकडे जाण्यास मदत करतात. त्याचवेळी काही चुकीच्या सवयी अशा असतात ज्याने तुमचे नुकसान होत राहते. त्या चुकीच्या सवयींमुळे तुमचे संपूर्ण शरीर वेगवेगळ्या आजारांना बळी पडते. आणि तुमचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ लागते आणि तुम्ही खूप लहान वयात आजारी पडू लागता. अशा परिस्थितीत, आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत की जर आपल्याला जीवनात यशस्वी व्हायचे असेल, तर सकाळी उठल्यानंतर कोणत्या सवयी करू नयेत.

खरंतर, आज आम्ही तुम्हाला त्या पाच सवयींबद्दल सांगणार आहोत, ज्या जर केल्या नाहीत तर त्यांचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर होईल आणि तुमचा संपूर्ण दिवस चिडचिडेपणात जाईल. असे मानले जाते की या पाच सवयींचा तुमच्या आरोग्यावर थेट परिणाम होतो. सकाळी केलेल्या या पाच चुका तुमचा संपूर्ण दिवस खराब करतात आणि तुम्ही कोणतेही काम निर्धारित वेळेत व्यवस्थित करू शकत नाही.

या सवयींपैकी पहिली सवय म्हणजे सकाळी उठल्यानंतर फोनकडे पाहणे. बरेच लोक सकाळी उठल्याबरोबर त्यांचे फोन तपासायला सुरुवात करतात. सकाळी झोपेतून उठताच फोनकडे पाहिल्याने मेंदूवरचा भार वाढतो, ज्यामुळे तुम्ही लक्ष केंद्रित करू शकत नाही आणि तुमचा संपूर्ण दिवस तणावात जातो.

दुसरी सवय म्हणजे नाश्ता वगळणे. असे मानले जाते की सकाळी नाश्ता वगळल्याने तुमच्या शरीरातील चयापचय क्रिया मंदावते आणि तुम्हाला दिवसभर सुस्तपणा जाणवतो. यामुळे, तुम्ही कोणतेही काम वेळेवर करू शकत नाही आणि त्यामुळे बरेच लोक कामात दिरंगाई करू लागतात.

तिसरी सवय म्हणजे गरम पाण्याने आंघोळ करणे. सकाळी उठल्यानंतर गरम पाण्याने आंघोळ केल्याने तुमचे शरीर आणि त्वचा कोरडी होते आणि तुमच्या शरीरातील नैसर्गिक तेल पूर्णपणे नाहीसे होऊ लागते.त्‍यामुळे सकाळी काम करण्यात उत्साह राहत नाही.

चौथी सवय म्हणजे सकाळी उठल्यानंतर शरीराला हायड्रेट ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. सकाळी पाणी प्यायल्याने मेंदूच्या पेशी खूप सक्रिय होतात. जर तुम्ही सकाळी पाणी प्यायलात नाही, तर तुमच्यासाठी अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

यानंतर पाचवी चुकीची सवय म्हणजे रिकाम्या पोटी कॉफी पिणे. असे म्हटले जाते की जर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी कॉफी प्यायली तर तुमची पचनसंस्था पूर्णपणे बिघडते आणि तुम्हाला दिवसभर अस्वस्थता जाणवते. अशा परिस्थितीत, या पाच सवयी सुधारून, तुम्ही स्वतःमध्ये बदल आणू शकता आणि दिवसभर नवीन उर्जेने काम करू शकता.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन.
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर.
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा.
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल.
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली.
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला.
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था.
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक.
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ.