लहान मुलांना ‘हे’ पदार्थ खाण्यासाठी देत आहात, थांबा अगोदर हे वाचा…
लहान मुलांना आपण आहारात खाण्यासाठी काय देतो हे सर्वात महत्वाचे आहे. कारण त्यामुळे मुलांच्या आरोग्यावर परिणाम होतो
मुंबई : लहान मुलांना आपण आहारात खाण्यासाठी काय देतो हे सर्वात महत्वाचे आहे. कारण त्यामुळे मुलांच्या आरोग्यावर परिणाम होतो. चुकीच्या आहारामुळे मुलांची वाट खुंटू शकते जर तुम्ही लहान मुलांना चुकीचे पदार्थ खायला दिलेत तर त्यांच्या आरोग्यावर याचे घातक परिणाम होऊ शकतात. बऱ्याचवेळा पालकांना सुद्धा माहिती नसते की, बाळाला काय खाऊ घालणे योग्य आहे. चलातर मग बघूयात लहान मुलांना कुढल्या खाद्यपदार्थांपासून दूर ठेवले पाहिजे. (Do not give this food to children)
-बटाटा फ्राइज लहान मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी हानिकारक असतात. यात ट्रान्स फॅट जास्त प्रमाणात असते जे की स्मरणशक्तीवर अत्यंत घातक व गंभीर परिणाम करू शकते. बाळाच्या मेंदूमध्ये सूज वाढू शकते आणि सेरोटोनिन नावाच्या केमिकल उत्पादनाचे प्रमाण वाढू शकते ज्यामुळे डिप्रेशन निर्माण होते. यामुळे शक्यतो लहान मुलांना बटाटा फ्राइज खाण्यासाठी देऊ नये.
-पाकीट बंद चिप्स लहान मुलांच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक असतात. हे खाल्ल्याने पोटदुखी, डोकेदुखी आणि मळमळ सारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. लहान मुलांच्या वर्तनात्मक समस्यांचा सामना करावा लागल्यास त्याला लक्ष केंद्रित करण्यास तसेच बौद्धिक क्षमतेमध्ये अडचणी जाणवू शकतात. शक्यतो लहान मुलांना ताजे अन्न खाण्यास द्यावे.
-चॉकलेट आणि आईस्क्रीम शक्यतो लहान मुलांना खाण्यासाठी देऊ नये. कारण चॉकलेटमुळे लहान मुलांचे दात किडतात आणि आईस्क्रीम थंड असल्यामुळे त्यांना ताप, सर्दी खोकला या सारखे अनेक आजारा होऊ शकतात. कॅफिनयुक्त सर्वच पदार्थ शरीरासाठी हानिकारक मानले जातात. त्यामुळे याचे शक्य होईल तितके कमी सेवन करावे.
-गोड पदार्थ देखील लहान मुलांना खाण्यासाठी देणे टाळावे. त्याचे अत्यंत वाईट परिणाम त्यांच्या आरोग्यावर होऊ शकतो. आईसक्रिम, केक किंवा कॅन्डी मध्ये हाय शुगर असते. याचे अधिक सेवन केल्याने अस्वस्थता निर्माण होऊ शकते.
संबंधित बातम्या :
Fitness Tips | वजन कमी करायचंय? ‘हा’ डाएट प्लॅन फॉलो करा नि लठ्ठपणापासून सुटका मिळवा!https://t.co/0poynwll2i#WeightLoss #Diet #Food
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 23, 2020
(Do not give this food to children)