कलिंगड खाताना अजिबात करु नका या चुका, अन्यथा होऊ शकते त्रासदायक

कलिंगडमध्ये पोटॅशियम, लोह, कॅल्शियम, तांबे, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ए, जीवनसत्व बी 1, बी 6, सी आणि डी आणि लायकोपीन सारखे पोषक घटक असतात. म्हणून हे फळ खूप फायदेशीर मानले जाते. (Do not make these mistakes while eating watermelon, otherwise it can be annoying)

कलिंगड खाताना अजिबात करु नका या चुका, अन्यथा होऊ शकते त्रासदायक
कलिंगड खाताना अजिबात करु नका या चुका
Follow us
| Updated on: May 07, 2021 | 9:27 AM

मुंबई : रसाळ, लाल-लाल आणि अतिशय चवदार कलिंगड आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. कलिंगडमध्ये 92 टक्के पाणी असते. उन्हाळ्यात हे फळ खाल्ल्याने शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते आणि शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. कलिंगडमध्ये पोटॅशियम, लोह, कॅल्शियम, तांबे, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ए, जीवनसत्व बी 1, बी 6, सी आणि डी आणि लायकोपीन सारखे पोषक घटक असतात. म्हणून हे फळ खूप फायदेशीर मानले जाते. परंतु हे खाण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे अन्यथा आपल्याला कदाचित त्याचा त्रास होऊ शकतो. (Do not make these mistakes while eating watermelon, otherwise it can be annoying)

हे फायदे आहेत

1. कलिंगडमध्ये कॅलरी आणि चरबी नसते आणि पाणी 92 टक्के असते. अशा परिस्थितीत ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी हे फळ खूप फायदेशीर आहे.

2. यामध्ये उपस्थित व्हिटॅमिन ए आणि सी रोगप्रतिकार शक्ती सुधारते, तर व्हिटॅमिन बी 6 आणि आयर्न लाल रक्तपेशी वाढवतात आणि अँटीबॉडीज बनविण्यात देखील मदत करतात.

3. कलिंगड पाचन तंत्रालाही मजबूत करते. त्यातील पाण्याचे 92 टक्के भाग बद्धकोष्ठतेच्या समस्येस दूर करण्यास उपयुक्त आहे. तसेच त्वचा निरोगी आणि चमकदार बनवते.

4. कलिंगडमुळे एलडीएल नावाचे खराब कोलेस्ट्रॉल कमी होते आणि रक्तवाहिन्यांमध्ये चरबी तयार होण्यास प्रतिबंध करते. यामुळे हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका कमी होतो.

कलिंगड खाण्यापूर्वी या गोष्टींची काळजी घ्या

1. एका दिवसात 400-500 ग्रॅम कलिंगड खाणे पुरेसे आहे. जास्त प्रमाणात सेवन केल्याने अति-हायड्रेशन समस्या उद्भवू शकतात. तसेच, जुलाब, गॅस, पोट भुगणे आणि अतिसार सारख्या समस्या असू शकतात.

2. कलिंगड खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये कारण या फळात आधीपासूनच भरपूर पाणी आणि फ्रुक्टोज अस्तित्वात आहे, अशा परिस्थितीत पचन संबंधित समस्या उद्भवू शकतात.

3. रात्री कलिंगड खाऊ नये, यामुळे वजन वाढते तसेच पोटाशी संबंधित समस्या देखील वाढतात.

4. दररोज मद्यपान करणाऱ्यांनी कलिंगड खाऊ नये. त्यामुळे यकृतात जळजळ होण्याची तक्रार होऊ शकते.

5. मधुमेह रुग्णांनी कलिंगड मर्यादित प्रमाणात खावे अन्यथा शरीरातील ग्लुकोजची पातळी वाढू शकते. (Do not make these mistakes while eating watermelon, otherwise it can be annoying)

इतर बातम्या

5G Network टेस्टिंग सुरु, मोबाईल कंपन्या 15000 हून कमी किंमतीत 5G स्मार्टफोन्स लाँच करणार

प्रवासी विमान हिमालयातून का जात नाही? कारणे जाणून हैराण व्हाल

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.