त्वचेला आतून निरोगी ठेवण्यासाठी रोज सकाळी करा या ४ गोष्टी, मिळवा नैसर्गिक चमक

वाढते प्रदूषण, जास्त स्क्रीन टाइम, ताण तणाव अशी अनेक कारणे असतात, ज्यामुळे त्वचेच्या समस्या वाढल्यामुळे चेहऱ्याची चमकही निघून जाऊ लागली आहे. त्यामुळे निस्तेज त्वचेला नवसंजीवनी द्यायची असेल तर ती आतून निरोगी करणे गरजेचे आहे.

त्वचेला आतून निरोगी ठेवण्यासाठी रोज सकाळी करा या ४ गोष्टी, मिळवा नैसर्गिक चमक
एकदम नितळ त्वचा
Follow us
| Updated on: Nov 13, 2024 | 2:45 PM

आपल्यातील प्रत्येकला चमकदार आणि तजेलदार चेहरा हवा असतो. चेहरा चमकदार दिसण्यासाठी आपण अनेक स्किन रुटिंग करत असतो. महागडे क्रीम, फेस वॉश, आणि अनेक उपाय त्वचेवर ट्राय करत असतो. याने तुमची त्वचा बाहेरून निरोगी राहू शकते. पण तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक हवी असल्यास त्वचा आतून देखील निरोगी असणे फार महत्वाचं आहे. याकरीत तुम्हाला तुमची दिनचर्या सुधारणे अत्यंत गरजेचे आहे. तुम्हाला जर मेकअपशिवाय सुंदर दिसायचे असेल व चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी दैनंदिन स्किनकेअर रुटिंग व्यवस्थित पाळणे गरजेचे आहे. याशिवाय तुम्हाला त्वचेला आतून निरोगी बनवायचे असल्यास रोज सकाळी या काही छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.

वाढते प्रदूषण, जास्त स्क्रीन टाइम, ताण तणाव अशी अनेक कारणे असतात, ज्यामुळे त्वचेच्या समस्या वाढल्यामुळे चेहऱ्याची चमकही निघून जाऊ लागली आहे. त्यामुळे निस्तेज त्वचेला नवसंजीवनी द्यायची असेल तर ती आतून निरोगी करणे गरजेचे आहे. चला तर मग जाणून घेऊया सकाळची काही कामे करून तुम्ही त्वचेला आतून निरोगी आणि नैसर्गिक चमकदार कसे बनवू शकता.

रोज सकाळी हे एक काम नियमित करा

हे सुद्धा वाचा

तुमच्या दैनंदिन दिनक्रमात रोज सकाळी उठल्यानंतर एक ग्लास कोमट पाणी प्यावे. यामुळे तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतील. याने त्वचेची चमक तर वाढेलच शिवाय आरोग्यालाही फायदा होईल आणि तुम्ही तुमचं वजनही नियंत्रणात राहील.

भिजवलेले ड्रायफ्रूट्सचे सेवन करा

रोज सकाळी उठून रिकाम्या पोटी भिजवलेले ड्रायफ्रूट्स खा. हे आपल्याला भरपूर ऊर्जा देण्याचे काम तर करेलच शिवाय त्वचेला निरोगी देखील बनवेल. तीन ते चार बदाम, नट्स यांचा दैनंदिन दिनक्रमात समावेश करा.

डार्क चॉकलेटचे सेवन करा

चॉकलेट आरोग्यासाठी खूप फायदेशीर असून त्वचेसाठीही फायदेशीर ठरते. रोज सकाळी डार्क चॉकलेटचे एक-दोन छोटे तुकडे खाल्ल्याने त्वचा निरोगी होईल. तुम्हाला हवं असेल तर कॉफीमध्ये डार्क चॉकलेट घालून सुद्धा सेवन करू शकतात. यामध्ये असलेले फ्लेव्होनॉइड्स गुणधर्म त्वचा तरुण ठेवण्यास मदत करतात.

दररोज व्यायाम करा

त्वचा निरोगी ठेवायची असेल तर तुम्ही रोज व्यायाम करणंही खूप गरजेचं आहे. ही सवय रुटीनमध्ये अंगीकारली तर वयाच्या पन्नाशी नंतर सुद्धा शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या तंदुरुस्ती राहू शकता, तर चेहऱ्यावर वयाची चिन्हे कमी दिसू लागतात. त्यामुळे रोज हलके वर्कआउट करावे किंवा योगाभ्यासाचा रुटीनमध्ये समावेश करावा.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.