Stress relief tips: ऑफिसमधून घरी आल्यावर करा या गोष्टी, ताण-तणाव होतो कमी

तुमच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे, पण काळजी न घेतल्याने ऑफिसची धावपळ तुमचे मानसिक स्वास्थ्य बिघडू शकते. त्यामुळे ऑफिसमधून आल्यानंतर मन विचलित करणं खूप गरजेचं आहे. काही उपक्रम तुम्हाला हे करण्यात मदत करू शकतात. ऑफिसमधून परत आल्यानंतर तुम्ही तुमचे मन कसे विचलित करू शकता ते जाणून घ्या.

Stress relief tips: ऑफिसमधून घरी आल्यावर करा या गोष्टी, ताण-तणाव होतो कमी
stress
Follow us
| Updated on: Dec 23, 2023 | 4:51 PM

मुंबई : आपण दिवसातला बराच वेळ ऑफिसमध्ये घालवतो. कामात आपण व्यस्त असतो. कामाचा ताण देखील असतो त्यामुळे दिवस तणावपूर्ण असू शकतो. कामाचा अतिरेक, सहकाऱ्याशी वाद, कामाच्या ठिकाणी खराब वातावरण अशा वेगवेगळ्या कारणामुळे मेंटल हेल्थवर परिणाम होतो. तुमच्या मानसिक आरोग्यावर ऑफिसमधल्या अनेक गोष्टी परिणाम करू शकतात. तणाव, चिंता आणि नैराश्य येणं यामुळे स्वाभाविक आहे. ऑफिसमधून घरी परतल्यानंतर तुम्हाला जर कामाचा ताण कमी करायचा असेल तर तुम्ही काही घरगुती उपाय करु शकता.  मनाला शांत करण्यासाठी कोणत्या गोष्टी करु शकता जाणून घ्या.

पुस्तकांची दुनिया

पुस्तकांची दुनियाच वेगळी आहे. आपण जर पुस्तकात रमून जात असाल तर आपण तणावापासून लांब राहू शकता. फोन आणि लॅपटॉप पेक्षा पुस्तकांमध्ये वेळ घालवा. तुमचा स्क्रीन टाइम कमी करून तुमच्या मनाला ताजेतवाने करण्याची संधी देणे महत्त्वाचे आहे. तुम्ही कोणतेही पुस्तक वाचू शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते ठरवा. वाचण हे तुमचा मूड बदलू शकते.

चालण्यासाठी जा

ऑफिसमध्ये बराच वेळ बसून काम केल्यानंतर तुमचे शरीर आणि मन दोघांना हालचालींची गरज असते. थकवा दूर करण्यासाठी तुम्ही फिरायला जाऊ शकता. चालल्यामुळे तुमचे शरीर सक्रिय होते आणि मन देखील रिफ्रेश होते. फेरफटका मारण्यासाठी तुम्ही उद्यानात जाऊ शकता किंवा तुमच्या घराच्या टेरेसवर किंवा बाल्कनीत फिरू शकता.

ध्यान करु शकता

कामाचा ताण कमी करण्यासाठी ध्यान करणे हा उत्तम पर्याय आहे. ध्यान तुमच्या मानसिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे तुमचा तणाव कमी होतो. तुम्ही शांत ठिकाणी बसून तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करू शकता. यामुळे तुमचे मन मोकळे होईल आणि तणाव आपोआप कमी होईल.

संगीत ऐका

संगीत तुमच्या मानसिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तुमच्या घरात तुम्ही तुमची आवडती गाणी ऐकू शकतात. त्या गाण्यावर नाचू देखील शकतात. यामुळे चिंता कमी करण्यातही खूप मदत होते. त्यामुळे संगीत ऐकणे हा विचलित करण्याचा एक चांगला मार्ग असू शकतो.

आवडते पदार्थ बनवा

तुमची आवडती डिश खाण्यात जितका आनंद असू शकतो, तितकाच तो बनवण्याचा आनंदही असू शकतो. त्यामुळे ऑफिसमधून आल्यावर तुमची आवडती डिश तयार करा, यामुळे तुमच्या कामाच्या ताणातून तुमचे लक्ष विचलित होईल आणि तुम्ही तुमची आवडती डिश देखील खाऊ शकाल, ज्यामुळे तुमचा मूड सुधारू शकेल.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.