रोज एक मिनिट करा हा व्यायाम; पोटाची चरबी होईल महिनाभरात कमी
पुरुषांच्या तुलनेत महिलांना पोट वाढण्याची समस्या जास्त आहे. यामुळे व्यक्तिमत्व तर बिघडतेच पण आवडते कपडे ही स्वतःला चांगले दिसत नाहीत पोटावर जास्त काळ चरबी साचत राहिल्यास आरोग्यासाठी घातक ठरू शकते.
नोकरी किंवा व्यवसाय आपण काहीही करत असलो तरी त्यासाठी धावपळ हे करावीच लागते. ही सर्व धावपळ करत असतांना आपल्या जेवणाकडे आपली दुर्लक्ष होते त्यासोबतच अनेक वेळा बाहेरचे फास्ट फूड खाल्ल्या जाते. फास्ट फूड खाल्यामुळे चरबी वाढते. व्यस्त जीवनशैलीमुळे अनेकांमध्ये पोटाची चरबी वाढण्याची समस्या वाढत आहे. चरबी कमी करण्यासाठी फलकासन हा प्रभावी व्यायाम आहे. रोज एक मिनिट फलकासन करून पोट, कंबर आणि खांद्यावरील चरबी कमी करता येते. हे केल्याने शरीराचे संतुलन सुधारते, मुद्रा सुधारते आणि स्नायू मजबूत होतात. नियमित फलकासन केल्याने चयापचय क्रियाही सुधारते.
पोटावर जमा झालेली चरबी काढून टाकणे सोपे काम नाही जगभरातील लोक या समस्येने रस्ता आहेत पुरुषांच्या तुलनेत महिलांना पोट वाढण्याची समस्या जास्त आहे. यामुळे व्यक्तिमत्व तर बिघडतेच पण आवडते कपडे ही स्वतःला चांगले दिसत नाहीत पोटावर जास्त काळ चरबी साचत राहिल्यास आरोग्यासाठी घातक ठरू शकते. यामुळे हृदयविकाराचा झटका मधुमेह यासारखे आजार होऊ शकतात जे घातकही ठरू शकतात अशा परिस्थितीत काही व्यायाम आहे ज्याच्या मदतीने काही मिनिटात पोटाची चरबी कमी करता येते. दिवसातून रोज एक मिनिट जरी फलकासन केले तरी कमरेची आणि पोटाची चरबी कमी होईल.
असे करा फलकासन
रोज एक मिनिट फलका असं केले तर पोटाची चरबी झपाट्याने कमी होऊ शकते फलकासन करण्यासाठी जमिनीवर चटई पसरवा आणि त्यावर पोटावर झोपून त्यानंतर पूश अपची स्थिती तयार करायची. आपल्या हातांवर शरीराचा संपूर्ण भार द्या आणि नितम खूप उंच करण्याऐवजी समान ठेवण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीच्या काही दिवस हे काही सेकंदासाठी करता येईल मात्र फलकासन रोज केल्याने हे दररोज एक मिनिटापर्यंत तुम्ही करू शकता.
फलकासन करण्याचे फायदे
कंबर पोट खांदे हात मांडा इत्यादी ठिकाणी जमा झालेली चरबी या व्यायामामुळे कमी होते आणि स्नायू देखील मजबूत होतात. याचा सराव केल्याने शरीराचा संतुलन सुधारतं मुद्रा सुधारते आणि मुख्य स्नायू मजबूत होतात फलकासनच्या नियमित सरावाने चयापचय सुधारते आणि खांदे सरळ दिसतात.