Weight Loss : लठ्ठपणामुळे त्रस्त आहात?, मग ‘हे’ वाचा…
आज प्रत्येकजण लठ्ठपणामुळे त्रस्त आहे. लठ्ठपणा कमी करण्यासाठी आपण विविध प्रकारचे व्यायाम, डायट आणि उपचार देखील घेतो. लठ्ठपणा आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे.
मुंबई : आज प्रत्येकजण लठ्ठपणामुळे त्रस्त आहे. लठ्ठपणा कमी करण्यासाठी आपण विविध प्रकारचे व्यायाम, डायट आणि उपचार देखील घेतो. लठ्ठपणा आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. लठ्ठपणामुळे टाईप-2 मधुमेह, उच्च रक्तदाब, स्ट्रोक यासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो. देशातील 50 दशलक्षाहूनही अधिक लोक लठ्ठपणामुळे ग्रस्त आहेत. लठ्ठपणाचे मुख्य कारण म्हणजे जास्त प्रमाणात खाणे. आपण एका दिवसात किती कॅलरी खाता? हे आपल्या आहारावर अवलंबून आहे. (Do this to lose weight)
-आजच्या धावपळीच्या आयुष्यात मानसिक ताणतणाव खूप वाढला आहे. बराच काळ ताणतणावात राहिल्यामुळे लठ्ठपणा देखील वाढतो. ताण आपणास आपले वाढते वजन कमी करण्यापासून प्रतिबंधित करतो. वाढत्या लठ्ठपणापासून बचाव करण्यासाठी ताणतणावाचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
-आपण अजिबात व्यायाम न केल्यास आपल्याला लठ्ठपणाचा धोका हा वाढत असतो. व्यायामाच्या अभावामुळे आणि शारीरिक हालचाली न केल्यामुळे आपल्या शरीरात चरबी जमा होते आणि शरीर साठून राहिलेली चरबी जळत नाही. ज्यामुळे आपले वजन सतत वाढू लागते.
-लठ्ठपणा कमी करण्यासाठी सर्वप्रथम सकाळी उठल्याबरोबर एक ग्लास कोमट पाणी प्या. मग, अर्ध्या तासानंतर केवळ 2 केळी खा, जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही आपल्या भुकेनुसार केळ्याचे प्रमाण कमी अधिक करू शकता.
-आपण जास्त जंक फूड खाणे आणि प्रक्रिया केलेले अन्न खाण्याने आपल्याला लठ्ठपणाचा धोका संभवतो. या प्रकारच्या अन्नात अनहेल्दी कार्बोहायड्रेट असतात, जे आपल्या शरीरात चरबीच्या रूपात साठवले जातात. जर तुम्ही बाहेरील खाद्यपदार्थ वारंवार खाल्ले आणि साखरयुक्त पेयांचे सेवन केले, तर तुम्हाला लठ्ठपणाचा धोका उद्भवू शकतो. निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी आपण आजच ‘या’ सवयी बदलल्या पाहिजेत
संबंधित बातम्या :
Weight Loss | Intermittent Fasting दरम्यान ‘ब्लॅक कॉफी’ पिणे ठरेल फायदेशीर! जाणून घ्या कसे…
कापूराचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत? वाचा…
Weight Loss | डिलिव्हरीनंतर वाढलेलं वजन कमी करायचेय? मग, ‘या’ टिप्स नक्की ट्राय करा!#WeightLoss | #pregnancy | #weightlosstips https://t.co/NqRHG06RFD
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 3, 2021
(Do this to lose weight)