तुम्हीही रोज अंडे खाता का? जाणून घ्या अंडे खाण्याचे फायदे आणि तोटे

अंडे खाल्ल्याने आरोग्याला अनेक प्रकारचे फायदे होतात. अंडे हे प्रथिनांचा चांगला स्त्रोत आहे आणि भूक कमी करण्यास मदत करू शकतात. त्यामुळे वजन नियंत्रणात राहते. अंड्याचे एवढे फायदे असले तरी ते योग्य प्रमाणात प्रमाणात खाणे गरजेचे आहे. कारण अंडे खाल्ल्याने जसे फायदे होतात तसेच काही तोटे देखील होतात.

तुम्हीही रोज अंडे खाता का? जाणून घ्या अंडे खाण्याचे फायदे आणि तोटे
Follow us
| Updated on: Nov 27, 2024 | 5:04 PM

आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे. हे यासाठी म्हटले जाते की अंड्यामध्ये पुरेशा प्रमाणात प्रोटीन आढळते जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. जर तुम्ही रोज अंडे खात असाल तर तुम्हाला त्याचे फायदे आणि तोटे माहिती असे आवश्यक आहे. कारण केवळ चवच तुमच्या आरोग्यासाठी पुरेशी नाही आणि तेच अंडे जे तुमचे आरोग्य सुधारू शकते ते काही वेळा तुमच्या आरोग्याचे नुकसानही करू शकते.

जाणून घेऊया अंडे खाण्याचे फायदे आणि तोटे

अंडे जेवढे चविष्ट आहे तेवढेच ते पौष्टिकही आहे. यामध्ये उच्च दर्जाचे प्रथिने आढळतात. जे तुमचे स्नायू दुरुस्त करण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी उपयुक्त मानले जातात. याशिवाय अंड्यांमध्ये व्हिटॅमिन B 12, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन बी 5 यासह इतर अनेक जीवनसत्वे आढळतात. सेलेनियम, फॉस्फरस आणि झिंक यासारखे पोषक घटक देखील अंड्यामध्ये आढळतात. एवढेच नाही तर त्यात ओमेगा – 3 ॲसिड आढळते, जे हेल्दी फॅट आहे. अशा प्रकारे पाहिल्यास अनेक आवश्यक पोषक तत्वांची कमतरता केवळ अंडेच पूर्ण करू शकते.

अंडे खाण्याचे फायदे

अंड्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड आढळते ज्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो. याशिवाय यामध्ये कोलीन नावाचे पोषक तत्व देखील असते. जे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले मानले जाते.

मेंदूसाठी फायदेशीर

अंड्यामध्ये आढळणारे कोलीन नावाचे पोषक तत्व तुमच्या मेंदूच्या विकासासाठी आणि चांगल्या कार्यासाठी आवश्यक आहे. याशिवाय अल्झायमर रोगापासून बचाव करण्यासाठी हे उपयुक्त मानले जाते.

वजन नियंत्रणात ठेवते

अंड्यांमध्ये प्रथिने भरपूर असल्याने तुमचे पोट लवकर भरते आणि त्यामुळे तुम्हाला भूक खूप कमी लागते. याच्या मदतीने तुम्ही तुमचे वजन नियंत्रित करू शकता.

डोळ्यांसाठी फायदेशीर

अंड्यामध्ये व्हिटॅमिन ए देखील असते, म्हणजेच ते खाल्ल्याने तुमचे डोळे निरोगी राहतात आणि अंधत्वासारख्या समस्यांपासूनही तुम्ही दूर राहू शकता.

अंडे खाण्याचे तोटे

जर तुम्ही रोज अंडे खात असाल तर तुम्ही नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण काही लोकांना अंड्यांमुळे फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकते. डॉक्टरांच्या मते दररोज फक्त एक ते दोन अंडे खाणे आवश्यक आहे. जर तुम्ही जास्त प्रमाणात किंवा दररोज अंडे खात असाल तर शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते जी हृदयाच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर.
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी.
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे.
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे.
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे.
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?.
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता.
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे.
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?.
आमच्या तंगड्यात- तंगड्या अडकलेल्या नाहीत,राऊत यांना शिरसाट यांचे उत्तर
आमच्या तंगड्यात- तंगड्या अडकलेल्या नाहीत,राऊत यांना शिरसाट यांचे उत्तर.