World Cycle Day : सायकल एक उपयोग अनेक, एक राईड तंदुरुस्तीची!, जागतिक सायकल दिनानिमित्त वाचा काही हटके…

आजच्या काळात लठ्ठपणा ही एक सामान्य समस्या बनली आहे. लठ्ठपणा हे अनेक आजारांचे मूळ मानले जाते. लठ्ठपणामुळे हाय बीपी, कोलेस्टेरॉल, हृदयविकार, मधुमेह, थायरॉईड, संधिवात अशा समस्या कमी वयातच लोकांना होत आहेत.

World Cycle Day : सायकल एक उपयोग अनेक, एक राईड तंदुरुस्तीची!, जागतिक सायकल दिनानिमित्त वाचा काही हटके...
Follow us
| Updated on: Jun 03, 2022 | 4:35 PM

मुंबई : आजच्या काळात लठ्ठपणा ही एक सामान्य समस्या बनली असून, लठ्ठपणामुळे कमी वयातच अनेक आजार डोके वर काढतात. लठ्ठपणामुळे हाय बीपी, कोलेस्टेरॉल, हृदयविकार, मधुमेह, थायरॉईड, संधिवात अशा समस्या उद्भवतात. या समस्या टाळण्यासाठी संतुलित आहार (Balanced diet)पाळणे आणि शारीरिक कसरत करणे अत्यंत आवश्यक आहे. जेणेकरून लठ्ठपणावर नियंत्रण ठेवता येईल. वजन कमी करण्यासाठी सायकलिंग हा एक चांगला व्यायाम (Good exercise) मानला जातो कारण सायकल चालवताना माणसाला खूप ऊर्जा खर्च करावी लागते. यामुळे त्याच्या कॅलरीज जलद बर्न होतात, वजन कमी होते, फुफ्फुसे मजबूत होतात आणि सर्व धोकादायक आजारांपासून संरक्षण मिळते. याशिवाय पर्यावरणाला प्रदूषणापासून वाचवण्यासाठीही सायकल खूप उपयुक्त आहे. आजच्या काळात सायकलिंगचे महत्त्व आणि उपयोगिता समजावून सांगण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेद्वारे 3 जून 2018 रोजी न्यूयॉर्कमध्ये प्रथमच जागतिक सायकल दिन (World Cycle Day)साजरा करण्यात आला. यावेळी पाचवा जागतिक सायकल दिन साजरा केला जात आहे. तुम्हालाही सायकलिंगद्वारे वजन कमी करायचे असेल किंवा त्याचे इतर फायदे घ्यायचे असतील, तर ती सायकल चालवण्याची योग्य पद्धत येथे जाणून घ्या.

लांबच्या राईड्स घ्या

जर तुम्हाला वजन झपाट्याने कमी करायचे असेल, पोटाची चरबी कमी करायची असेल तर सायकलच्या लांब राईड करा. यामुळे तुम्ही बराच काळ सायकल चालवाल. तुमच्या कॅलरीज जलद बर्न होतील, चरबी कमी होईल, तसेच तुमच्या शरीरातील सर्व समस्या दूर होतील. एक तास सायकल चालवून तुम्ही ३०० ते ५०० कॅलरीज बर्न करू शकता.

वेळेची खात्री करा

सायकलिंगसाठी वेळ सुनिश्चित करा. काही अभ्यासांनी असे सुचवले आहे की दररोज रिकाम्या पोटी सायकल चालवल्याने चरबी जलद बर्न होते. त्यामुळे शक्य असल्यास रोज सकाळी उठल्यानंतर रोजच्या कामातून निवृत्त होऊन रोज सायकल चालवा.

हे सुद्धा वाचा

चढावावर सायकल चालवा

तुमचे वजन जास्त असल्यास आणि ते लवकर कमी करायचे असल्यास, चढाच्या रस्त्यावर सायकल चालवा. यामुळे तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल आणि अधिक ऊर्जा खर्च होईल. यामुळे तुमचे वजनही झपाट्याने कमी होईल.

सायकलींगची स्टाईल योग्य ठेवा

सायकल चालवितांना तुमची सायकलींगची स्टाईल बरोबर ठेवा. म्हणजे बसण्याची आणि पायडल मारतांना योग्य शारीरीक मुद्रा हवी. अन्यथा तुमच्यासाठी समस्या वाढू शकतात. याशिवाय तुमची पकड बरोबर ठेवा आणि वेगावर नियंत्रण ठेवा, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या सहज टाळता येईल. सायकल चालवताना तुमचा वेग सामान्य असावा. लक्षात ठेवा की सायकल तुमचे शरीर तंदुरुस्त ठेवण्याचे काम करते, परंतु फिटनेस राखण्यासाठी तुम्हाला तुमची जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींवरही नियंत्रण ठेवावे लागेल.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.