तुम्हालाही सांधेदुखीची समस्या आहे ? … शरीरातील ‘या’ घटकाची पातळी वाढल्याचे लक्षणं आताच सावध व्हा

शरीरात यूरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढल्याने अंगाला सूज आणि सांधेदुखी सारख्या समस्या सुरू होतात. या समस्यांपासून बचाव करण्यासाठी काही घरगुती उपाय उपयुक्त ठरू शकतात. शरीरात यूरिक अॅसिड नियंत्रित करण्याचे सोपे अन्‌ घरगुती उपाय तुम्हाला नक्कीच कामात येतील

तुम्हालाही सांधेदुखीची समस्या आहे ? ... शरीरातील ‘या’ घटकाची पातळी वाढल्याचे लक्षणं आताच सावध व्हा
pain
Follow us
| Updated on: Mar 10, 2022 | 10:12 AM

मुंबई : साधारणत: मानवी शरीरात म्हणजेच रक्तात यूरिक ॲसिड (uric acid) आढळत असते. हे प्युरीनयुक्त पदार्थांच्या पचन प्रक्रियेदरम्यान तयार होत असते. जेव्हा शरीरात (Body) प्युरीनचे प्रमाण ठराविक प्रमाणापेक्षा जास्त वाढते तसेच मूत्रपिंड ते फिल्टर करण्यास अकार्यक्षम ठरते तेव्हा शरीरात यूरिक ॲसिडचे प्रमाण वाढत जाऊन ते जास्त होते. युरिक ॲसिडमुळे सांध्यांमध्ये दुखणे, सूज येणे अशा अनेक समस्या निर्माण होऊ लागतात. जर तुमच्या रक्तातील यूरिक अ‍ॅसिड वाढले असेल आणि त्यामुळे तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करवा लागत असेल तर, या लेखातील काही घरगुती उपाय (home remedies) तुमच्या नक्की कामी येऊ शकतात.

जवस

जवसच्या बिया शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. ते यूरिक ॲसिड कमी करण्यासाठीदेखील उपयुक्त मानले जातात. रक्तातील यूरिक अॅसिड वाढले असेल तर तुम्ही जवसाच्या बिया भाजून आणि चघळल्यानंतर खाऊ शकता. याशिवाय जवसपासून तयार लाडूही खाऊ शकता. शिवाय ओवा किंवा बडीशेपमध्ये जवस टाकून जेवणानंतरची त्याचे सेवन आरोग्यासाठी लाभदायी मानले जाते.

हळद

हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचा घटक आढळतो ज्यामुळे तुम्हाला अनेक समस्यांवर मात करता येते. हळद यूरिक अॅसिड कमी करण्याचे काम करते आणि सांधेदुखीच्या समस्येत आराम देते. तुम्ही ते दुधात घालून सेवन करू शकता. जर कच्ची हळद शरीरासाठी अधिक फायदेशीर मानली जाते.

ओवा

ओव्याचे पाणी यूरिक ॲसिड कमी करण्यासाठी उपयुक्त मानले जाते. ज्या लोकांचे यूरिक ॲसिड वाढले आहे, त्यांनी सकाळी रिकाम्या पोटी आणि जेवणानंतर अर्ध्या तासाने ओव्याचे पाणी प्यावे. ते बनवण्यासाठी तुम्ही एक चमचा ओव्याच्या बिया एका ग्लास पाण्यात काही तास भिजवून ठेवा, नंतर ते सेवन करा.

जेष्ठमध

हे केवळ श्वासोच्छवासाच्या समस्या दूर करत नाही तर यूरिक ॲसिड कमी करण्यासाठीदेखील उपयुक्त मानले जाते. जेष्ठमधात ग्लायसिरीझिन नावाचे एक संयुग असते, जे जळजळ कमी करते आणि फ्री रेडिकल्सच्या प्रभावापासून शरीराचे संरक्षण करते. तुम्ही जेष्ठमध चोखून त्याचा रस घेऊ शकता किंवा पावडरच्या स्वरूपातही त्याचा वापर होऊ शकतो.

अश्वगंधा

यूरिक ॲसिड कमी करण्यासाठीही अश्वगंधा फायदेशीर मानली जाते. यामुळे सांधेदुखीची समस्याही दूर होते. जर तुमचे यूरिक ॲसिडही वाढले असेल तर तुम्ही दररोज दुधासोबत अश्वगंधा वापर करू शकतो.

संबंधित बातम्या : 

चमकदार त्वचा हवीय, संत्री ते टोमॅटो ही फळं आहारात नक्की असूद्या

Honey Facial : काळवंडलेल्या त्वचेला डाग रहित करण्यासाठी आजच करा हनी फेशिअलचा वापर, त्वचा घरच्या घरी उजळून जाईल!!

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.