‘दही’ खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहिती आहेत का?
दही (Curd) हा बहुतेक लोकांच्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. दह्यामध्ये अनेक पोषक घटक असतात.
मुंबई : दही (Curd) हा बहुतेक लोकांच्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. दह्यामध्ये अनेक पोषक घटक असतात. दररोज दही खाल्ल्याने केवळ ताजेतवाने वाटत नाही तर, पाचन तंत्रही ठीक राहते आणि पोटाचा त्रासही होत नाही (Health Benefits). दही ऑस्टिओपोरोसिस, रक्तदाब, केस आणि हाडे यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. दह्यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, राइबोफ्लेविन, व्हिटामिन बी 6 आणि व्हिटामिन बी12 या पोषक घटकांचे प्रमाण अधिक असते (Do you know the ‘these’ benefits of eating curd?)
दही तयार करण्यासाठी नेहमी ‘फुल क्रीम’ दुधाचा वापर करा. दही लावण्यासाठी दूध मातीच्या जाड मटका किंवा हांडीमध्ये साठवा. कारण, या भांड्यात उष्णता जास्त काळ राहते. भांड्यात टाकण्यापूर्वी प्रथम ते दूध चांगले उकळवा. पुन्हा थंड होऊ द्या. दूध कोमट झाल्यावर त्यात थोडे ताजे दही घाला. यासाठी साधारण एक लीटर दुधात एक चमचा दही टाकू शकता. या मिश्रणाला व्यवस्थित फेटून घ्या.
तुमच्या घरी मायक्रोवेव्ह असेल, तर हे भांडे दोन मिनिटांसाठी गरम करून घ्या, नंतर भांडे नीट बंद करून ठेवा. एकदा हंडी सेट झाली की भांडे पुन्हा हलवू नये, ही गोष्ट कटाक्षाने लक्षात ठेवा. दह्याचे भांडे सुमारे 8 ते 10 तास असेच ठेवून द्या. यासाठी आपण रात्रीच्या वेळी दह्याचे विरजण लावून ठेवू शकता. याप्रमाणे सकाळपर्यंत दही व्यवस्थित तयार होईल
दही खाण्याचे महत्त्वाचे फायदे :
-दररोज दही खाल्ल्याने उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो. त्याचबरोबर हृदयाशी संबंधित आजारांपासून दूर राहण्यासाठीही दही उपयुक्त आहे.
-केसांवर आणि त्वचेवर दही लावल्याने त्याचे चांगले परिणाम दिसू लागतात. डोक्यातील कोंडा टाळण्यासाठी केसांना दही लावणे फायदेशीर ठरते. यासाठी केसांना दही लावून अर्ध्या तासाने केस धुवावे.
-दह्यामध्ये फॅटचे प्रमाण अधिक असते. दह्यामध्ये दुधासारखेच पोषक घटक असतात. दह्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे दात आणि हाडेही बळकट होतात (Health Benefits of Curd).
-दही एनर्जी बूस्टर देखील आहे. त्यामुळे ताण-तणाव देखील कमी होतो. दही उत्तम अँटीऑक्सिडेंट असून, शरीर हायड्रेट देखील ठेवते.
-दह्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. याव्यतिरिक्त झोपेची समस्या दूर करण्यातही दही फायदेशीर आहे.
-चेहऱ्यावर,त्वचेवर मध आणि बदाम तेलासोबत पंधरा मिनिटे दही वापरल्याने मृत आणि रापलेली त्वचा निघून जाते. कांती उजळ बनते. संत्र्याच्या सालीसोबत दही लावल्याने रंग उजळतो. गुलाब पाणी आणि हळदी सोबत दही लावल्याने त्वचा उजळ आणि मुलायम बनते. लिंबू रस आणि दह्याच्या वापराने त्वचेवरील,चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.
संबंधित बातम्या :
Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायकhttps://t.co/y89Pxceis3#VitaminD #FoodSupplement
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 20, 2020
(Do you know the ‘these’ benefits of eating curd?)