कोरोना काळात दररोज रात्री प्या बदामयुक्त दूध, वाचा याबद्दल अधिक !
दररोज दूध पिणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते. दूध स्वतःच एक संपूर्ण अन्न मानले जाते.
मुंबई : दररोज दूध पिणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते. दूध स्वतःच एक संपूर्ण अन्न मानले जाते. प्रथिने, चरबी, कॅलरीज, कॅल्शियम, व्हिटामिन डी, बी-2, बी-12, पोटॅशियम, फॉस्फरस आणि सेलेनियम यासारख्या पोषक घटकांमुळे दुधाची गुणवत्ता वाढते. सध्याच्या कोरोना काळात तर आरोग्याची विशेष काळजी ही घेतली पाहिजे. दररोज रात्री झोपण्याच्या अगोदर एक ग्लास बदामयुक्त दूध पिले पाहिजे. हे आपल्या आरोग्याला निरोगी ठेवण्यासाठी खूप फायदेशीर आहे. (Drink almond milk every night during the corona period will have many benefits)
बदामयुक्त दूध तयार करण्यासाठी दुधात बारीक करून बदाम मिक्स करा आणि काही वेळ उसळू द्या. हे पिणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. दुधात प्रथिने, चरबी, कॅलरीज, कॅल्शियम, व्हिटामिन डी, बी-2, बी-12 आणि पोटॅशियम असते. बदामामध्ये प्रथिने, अँटी-ऑक्सिडंट्सही असतात. शिवाय कॅलरीचं प्रमाण कमी असतं. शरीरातील खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी बदाम खाणे फायद्याचे ठरते. बदामामुळे आपल्या मेंदूच्या आरोग्याला जास्त प्रमाणात फायदा होतो. दुधात प्रथिने, चरबी, कॅलरीज, कॅल्शियम, व्हिटामिन डी, बी-2, बी-12 आणि पोटॅशियम असते.
रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढवण्यासाठी दूध हळद खूप महत्वाचे आहे. कारण हळद आणि दूध पिणे आपल्या हाडांसाठी फायदेशीर असते आणि यामुळे आपले हाडे मजबुत होतात. त्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. हळदीच्या दुधामुळे पचन करण्यास मदत करते. यामुळे शरीरातील आंबटपणा कमी होतो. हळद मिसळून जास्त प्रमाणात दूध पिल्यास त्रास होऊ शकतो. म्हणून, एक चिमूटभर हळद दुधात मिसळणे आपल्यासाठी फायदेशीर आहे.
हळदीच्या दुधाचे आणखी फायदे करून घ्यायचे असतील, तर हळदीच्या पावडर ऐवजी कच्ची हळद दुधामध्ये घालून ते दुध प्यावे. हळदीचे दूध कर्करोगाच्या रुग्णांसाठी देखील खूप चांगले मानले जाते. हळदीमध्ये आढळणारा करक्युमीन हा घटक कर्करोगाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. तसे, तो कर्करोगाच्या रुग्णांना बरे होण्यासही मदत करतो. हळद असलेले दूध पिण्यामुळे तुमची झोपेची समस्या देखील दूर होते. हळदीयुक्त दुधाच्या सेवनाने चांगली झोप लागते. दुधात अमीनो अॅसिड असतात, जे चांगली झोप देण्यास प्रभावी ठरतात.
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
(Drink almond milk every night during the corona period will have many benefits)