रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी दररोज सकाळी प्या आवळ्याचा चहा !

आवळा हे असे सुपर फूड आहे, जे अनेक रोगांपासून बचाव करण्यासाठी वापरले जाऊ शकते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी दररोज सकाळी प्या आवळ्याचा चहा !
आवळ्याचा चहा
Follow us
| Updated on: May 16, 2021 | 11:40 AM

मुंबई : आवळा हे असे सुपर फूड आहे, जे अनेक रोगांपासून बचाव करण्यासाठी वापरले जाऊ शकते. यामुळे तुमची पचनशक्ती देखील बळकट होईल. तुम्ही आवळा कच्चा, पावडर, लोणचे आणि रस या स्वरूपात खाऊ शकता, जे तुमच्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. विशेष म्हणजे दररोज सकाळी रिकाम्या पोटी आपण आवळ्याचा चहा घेतल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.  (Drink amla tea to boost the immune system)

एक आवळा, आले आणि दालचिनी टाकून हा चहा बनवू शकता. या सर्व गोष्टी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. चहा बनवण्याच्या भांड्यात अर्धा चमचा किसलेले आले, अर्धा तुकडा दालचिनी, 1 चिरलेला आवळा आणि थोडासे पाणी घालून साधारण 10 मिनिटे उकळवा. या चहात चवीनुसार किंवा अर्धा चमचा गूळ घालू शकता. सध्याच्या कोरोनाच्या काळात तर हा चहा आपण दररोज सकाळी पिला पाहिजे. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते.

आवळ्यात व्हिटामिन बी 5, व्हिटामिन बी 6, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम समृद्ध प्रमाणात आढळते. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटी ऑक्सिडेंट असतात, ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. रोज सकाळी ग्लास पाण्यात आवळा पावडर आणि मध प्या. रिकाम्या पोटी हे सेवन केल्याने तुमची पाचन क्रिया मजबूत राहील. आपण दिवसातून 3 ते 4 वेळा फर्मेन्टेड आवळ्याचा वापर करू शकता. रोज त्याचे सेवन केल्याने तोंडातून दुर्गंधी येत नाही, तसेच दिवसभर फ्रेशनेस देखील जाणवतो.

रोज आवळा खाल्ल्याने आपला चेहरा नैसर्गिकरित्या चमकतो. त्यामध्ये उपस्थित अँटीऑक्सिडेंट त्वचेच्या वृद्धत्वाची समस्या कमी करतात. रस पिण्यामुळे सुरकुत्या आणि फाईन लाईन कमी होतात. हे शरीराला डिटॉक्स करण्याचे कार्य देखील करते. ज्या लोकांची हाडे कमकुवत आहेत, त्यांनी आवळा रस सेवन केला पाहिजे. हा रस आपली हाडे मजबूत करण्यासाठी कार्य करते. आवळा शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल नष्ट करून चांगलं कोलेस्ट्रॉल तयार करण्याचं काम करतो. जर पोटात होणाऱ्या समस्या जसं, जळजळ, गॅस यांसारख्या समस्याही दूर करतो.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Healthy Food For Typhoid | टायफॉइड तापात  ‘या’ 5 गोष्टींचे सेवन ठरेल लाभदायी

चहा-कॉफी की बियर-वाईन, काय पिता तुम्ही… त्याचे फायदे-तोटे तुम्हाला माहिती आहे का?

(Drink amla tea to boost the immune system)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.