Immunity Booster : रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी प्या ‘हा’ स्पेशल चहा
कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी सर्वात महत्वाचे आहे की, आपली ‘रोगप्रतिकारक शक्ती’ कारण आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असली की, आपण कोरोनापासून दूर राहू शकतो.
मुंबई : कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी सर्वात महत्वाचे आहे की, आपली ‘रोगप्रतिकारक शक्ती’ कारण आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असली की, आपण कोरोनापासून दूर राहू शकतो. रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवावी, याविषयी सगळेच संभ्रमात आहे. आज आम्ही तुम्हाला रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी एक खास चहा सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शकिती मजबूत होईल. (Drink Ayurvedic tea to boost the immune system)
विशेष म्हणजे हा चहा आपण कोरोना झालेल्या रूग्णालाही देऊ शकता. या चहामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आपण आले, लसूण आणि हळद चहा घेऊ शकतो. चला जाणून घेऊया हा चहा कसा तयार करायचा. हा चहा तयार करण्यासाठी आपल्याला 2 लसूण पाकळ्या, आले, पाणी आणि अर्धा चमचे हळद लागणार आहे. सर्वात अगोदर लसूण, आले आणि हळद ची पेस्ट तयार करा. नंतर ही पेस्ट उकळलेल्या पाण्यात घाला. हे पाणी पाच मिनिटे उकळवा. हे उकळल्यानंतर पाणी चाळून घ्या. त्यात मध आणि लिंबू घालून प्या.
लसूण खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. जेवण बनवताना त्यात लसूण घातल्यास पदार्थाची चव अनेक पटींनी वाढते. शरीर निरोगी ठेवण्यासाठीही लसूण खूप फायदेशीर मानली जाते. आयुर्वेदात लसूण एक उत्तम औषध म्हणून वापरली जाते. लसूनमध्ये भरपूर प्रमाणात एलिसिन, झिंक, सल्फर, सेलेनियन आणि व्हिटॅमिन ए आणि ई सुद्धा आहेत. दररोज सकाळी साधारण सहा ते सात लसूणचा पाकळ्या खाल्ल्या पाहिजे. लसूण फक्त रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीच नाहीतर इतरही अनेक आजारांवर रामबाण आहे.
हिमोग्लोबिनचा अभाव म्हणजे शरीरात लाल रक्तपेशींचा अभाव. ज्यास सामान्य भाषेत अशक्तपणा म्हणतात. आपल्या शरीरात रक्ताची कमतरता असल्यास, आपण जास्त प्रमाणात लसणाचे सेवन करणे टाळावे. आल्यात अँटी-बॅक्टेरियल, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आहेत, ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढवते. याशिवाय सर्दी आणि खोकल्यातदेखील आले खूप फायदेशीर ठरते. आल्यामुळे स्नायूंना आराम मिळतो.
आल्यात अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-ऑक्सिडंट, औषधी आणि उपचारात्मक असे बरेच गुणधर्म आहेत. तुम्हाला जर खोकल्याचा त्रास होत असेलतर आल्याचे साल उन्हात वाळवा आणि मिक्सरमधून काढा आणि त्याची पूड बनवा. जेव्हा जेव्हा खोकल्याची समस्या उद्भते तेव्हा आल्याची सालची पावडर आणि मध मिक्स करा यामध्ये कोमट टाका. यामुळे तुमचा खोकला जाईल.
संबंधित बातम्या :
Milk Testing : सावधान! घट्ट दिसण्यासाठी दुधात मिसळले जातायत ‘हे’ घटक, अशी तपासा दुधाची शुद्धता
दुधाच्या चहापेक्षा ‘ग्रीन टी’ला मिळतेय सर्वाधिक पसंती! वाचा या ‘ग्रीन टी’चा रंजक इतिहास…#GreenTea | #Health | #food | #drink https://t.co/VMbYebOZ9t
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 26, 2021
(Drink Ayurvedic tea to boost the immune system)