Weight Loss Tips: सणासुदीच्या दिवसात रहायचे असेल फिट तर प्या ‘या’ भाज्यांचे ज्यूस

सणासुदीच्या दिवसांत अनेक वेळा अनहेल्दी पदार्थ खाल्ले गेल्यामुळे पोट खराब होते. अशा वेळी तुम्ही वेगवेगळ्या भाज्यांचे ज्यूस डाएटमध्ये समाविष्ट करू शकता.

Weight Loss Tips: सणासुदीच्या दिवसात रहायचे असेल फिट तर प्या 'या' भाज्यांचे ज्यूस
Follow us
| Updated on: Oct 10, 2022 | 9:51 AM

सणासुदीचे, उत्सवाचे (festive season) दिवस हे मिठाई, तळलेले पदार्थ यांशिवाय अपूर्ण असतात. चविष्ट पदार्थ खाण्याच्या नादात बरेचसे लोक ओव्हरइटिंग (overeating) करतात. मात्र हे पचनसंस्थेसाठी खूप हानिकारक ठरते. तसेच यामुळे बद्धकोष्ठता व सूज येणे यासारख्या समस्यांनाी सामोरे जावे लागू शकते. पोटही खराब होते. अशा परिस्थितीत तुम्ही वेगवेगळ्या भाज्यांचे ज्यूस (vegetable juice) डाएटमध्ये समाविष्ट करू शकता. यामुळे पचनसंस्था निरोगी राहण्यास मदत होईल. तसेच हे ज्यूस वजन कमी करण्यासही मदत करतात.

कोणत्या भाज्यांचे ज्यूस आपण पिऊ शकतो, ते जाणून घेऊया.

बीटाचा ज्यूस – बीटामध्ये लोह मुबलक प्रमाणात असते, ज्यामुळे शरीरात लोहाची कमतरता निर्माण होत नाही. तसेच बीटामध्ये फायबरही असते. हे पचनसंस्था निरोगी ठेवण्याचे कार्य करते. बीटामध्ये खूप कमी प्रमाणात कॅलरीज असतात. त्याने वजन कमी होण्यासही मदत होते. त्यामुळे बीटाच्या ज्यूसचे सेवन कराने.

हे सुद्धा वाचा

लिंबू आणि आल्याचा रस – लिंबामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. त्यामध्ये यात ॲंटी-ऑक्सिडंट गुणधर्मही असतात. आल्याचे सेवन केल्याने मेटाबॉलिजमही वाढते. लिंबू आणि आलं मिश्रित रस आपल्या शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्याचे कार्य करतो.

सफरचंदाचा रस – तुम्ही सफरचंदाचा रसही पिऊ शकता. त्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. यामुळे पचनसंस्था निरोगी राहते. सफरचंदाचा ज्यूस प्यायल्याने बद्धकोष्ठता आणि सूज येण्याची समस्या दूर होते. तसेच याचे सेवन केल्याने वजन वेगाने कमी होण्यासही मदत होते.

हिरव्या भाज्यांचा ज्यूस – पालकामध्ये लोह मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे तुम्ही पालक किंवा कोबीपासून बनवलेला ज्यूसही तुम्ही पिऊ शकता. या भाज्यांमध्ये फायबर आणि ॲंटी-ऑक्सिडंट गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात. हिरव्या भाज्यांचा ज्यूस सेवन केल्याने वेगाने वजन कमी होण्यास मदत होते.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.