Skin Care Tips : चमकदार त्वचेसाठी हे घरगुती डिटॉक्स पेय प्या आणि सुंदर त्वचा मिळवा!

निरोगी आहार (Health)आणि पुरेसे पाणी (Water) पिणे केवळ तंदुरुस्त राहण्यासच मदत करत नाही तर तुमची त्वचा चमकदार बनवते.

Skin Care Tips : चमकदार त्वचेसाठी हे घरगुती डिटॉक्स पेय प्या आणि सुंदर त्वचा मिळवा!
skin
Follow us
| Updated on: Mar 11, 2022 | 7:30 AM

मुंबई : निरोगी आहार (Health)आणि पुरेसे पाणी (Water) पिणे केवळ तंदुरुस्त राहण्यासच मदत करत नाही तर तुमची त्वचा चमकदार बनवते. अनेक लोक चमकदार त्वचेसाठी विविध रसायनयुक्त सौंदर्य उत्पादने वापरतात. परंतु ते दीर्घकाळापर्यंत त्वचेचे नुकसान करते. अशा परिस्थितीत तुम्ही नैसर्गिक (Nature) घटकांचा वापर करून अनेक प्रकारचे फेस पॅक देखील बनवू शकता. ग्लोइंग स्कीनसाठी घरगुती डिटॉक्स ड्रिंक देखील घेऊ शकता. हे डिटॉक्स ड्रिंक नेहमे कोणते याबद्दल जाणून घेऊयात.होममेड डिटॉक्स ड्रिंक बनवण्यासाठी तुम्हाला पुदिना, आले, काकडी आणि सब्जा इत्यादींची आवश्यकता असेल.

प्रथम आले कापून किसून घ्या. काकडी सोलून कापून घ्या. पुदिन्याची ताजी पाने आणि भिजवलेल्या सब्जा घ्या. पुदिन्याची पाने, आले आणि काकडी ब्लेंडरमध्ये टाका. आता या पेयात भिजवलेला सब्जा टाका. हे खूप चवदार आहे. तुम्ही ते सहज बनवू शकता. याचे नियमित सेवन केल्याने तुमची त्वचा चमकदार होण्यास मदत होते.

  1. आल्यामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे वृद्धत्वाच्या लक्षणांशी लढण्यासाठी काम करतात. हे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्याचे काम करते आणि आले रक्ताभिसरण सुधारते.
  2. पुदिन्यात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. हे मुरुमांविरूद्ध लढण्यास मदत करतात. ते तुमची त्वचा ताजी ठेवतात. पुदिन्याचे पाणी नियमितपणे प्यायल्याने त्वचा निरोगी आणि ताजी राहते.
  3. सब्जा हे अतिशय आरोग्यदायी आहे. ते खाल्ल्यानंतर तुम्हाला बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटते. हे अँटी-ऑक्सिडंट्स, ओमेगा-3 फॅटी अॅसिड, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, प्रथिने, कॅल्शियम, फायबर यांचाही स्रोत आहे. सब्जा त्वचेचे मुक्त रॅडिकल्सच्या नुकसानीपासून संरक्षण करतात.
  4. काकडीत पाण्याचे प्रमाण जास्त असते. ते त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. हे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते. यामुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होते. काकडीत व्हिटॅमिन बी-5 जास्त असते. मुरुमांची समस्या दूर करण्याचे काम करते.

इतर बातम्या

Pune metro | पुणेकरांनो मट्रोचे तिकीट करा ‘ऑनलाईन बुक’ ; मट्रो प्रशासनाकडून ॲपची निर्मिती

ICC WWC 2022: एकटी हरमनप्रीत लढली, न्यूझीलंडचा भारतावर मोठा विजय

EPF वर व्याजदर किती मिळेल? या आठवड्यात होणार निर्णय

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.