खरोखरच ‘ग्रीन टी’ प्यायल्याने वजन कमी होते का? वाचा याबद्द्ल अधिक
वजन कमी करण्यासाठी जवळपास सर्वचजण दिवसातून अनेक वेळा ग्रीन टी घेतात. ग्रीन टीमध्ये अॅंटी-ऑक्सीडंट आणि पॉलीफेनॉल घटक असतात.
मुंबई : वजन कमी करण्यासाठी जवळपास सर्वचजण दिवसातून अनेक वेळा ग्रीन टी घेतात. ग्रीन टीमध्ये अॅंटी-ऑक्सीडंट आणि पॉलीफेनॉल घटक असतात. विशेष म्हणजे ग्रीन टीमध्ये असलेल्या काही घटकांमुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते. दररोज एक कप ग्रीन टी सेवन केल्याने, केवळ त्वचाच नव्हे तर केसांनाही फायदा होतो. (Drinking green tea is beneficial for weight loss)
जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी पित असाल तर नाश्ता किंवा जेवणानंतर ग्रीन टी प्या. त्यामुळे तुमच्या शरीराला लगेचच त्याचा फायदा होईल. तसेच तुमचे पोट जर खूप सेनस्टिव्ह असेल तरच असे करा. कारण त्यामुळे नेचर अल्कालाइन होते. त्याशिवाय दररोज सकाळी एक कप आणि संध्याकाळी एक कपच ग्रीन टी चे सेवन करा.
लिंबाचा रस ग्रीन टीच्या कडू चवीचा प्रतिकार करतो. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, लिंबूवर्गीय फळामचा रस ग्रीन-टीमध्ये मिसळल्यास त्यातील अँटीऑक्सिडेंट्स वाढतात, जे आपल्या शरीरासाठी अधिक फायदेशीर आहेत. परंतु, आपल्या ग्रीन-टीला आधी थंड होऊ द्या आणि नंतरच त्यात थोडे लिंबू पिळून मग त्याचे सेवन करा.
ग्रीन टी तयार करण्यासाठी पाण्याला खूप जास्त गरम करु नका. त्यामुळे त्यात आवश्यक जीवनसत्त्व नष्ट होतात. चांगल्या परिणामांसाठी तुम्ही पाणी गरम करुन 10 मिनीटे तसेच ठेवा. त्यानंतर ग्रीन टीचे पॅकेट कपात घेऊन त्यावर गरम पाणी टाका आणि 1 मिनीटे तसेच ठेवा. ग्रीन टी आणि पाणी एकत्रित झाल्यानंतर प्या.
दिवसातून 1 ते 3 कपापेक्षा जास्त ग्रीन टी सेवन करू नये. असे केल्याने शरीराला इजा होऊ शकते आणि ती व्यक्ती शारीरिक दुर्बलतेचा बळी पडू शकते. तसेच ग्रीन टीचे सेवन करण्यापूर्वी किंवा केल्यानंतर किमान एक तासाच्या अंतरानेच काहीही पदार्थ खावेत. (टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या)
संबंधित बातम्या :
Skin Care Tips | लग्न करताय? ना ब्यूटी पार्लर, ना ट्रिटमेंट, ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा ग्लो!
Study | कोरोनाचा लैंगिक क्षमतेवर परिणाम, पुरुषांना होतोय ‘हा’ आजार
Eczema Myth | ‘एक्झिमा’ आजाराबद्दल लोकांमध्ये संभ्रमाची स्थिती, जाणून घ्या या मागचं पूर्ण सत्य…#eczema | #Health | #skincare | #skincareproducts https://t.co/azKyegZj0a
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 26, 2021
(Drinking green tea is beneficial for weight loss)