गरमा गरम कॉफी तुम्ही पितायत? तर ‘या’ गंभीर आजारांना निमंत्रण देत आहात !
आपल्यापैकी अनेकजण झोप घालवण्यासाठी सातत्याने कॉफी पितात. काहींना तर उपाशी पोटी झोपेतून उठल्यानंतर गरम गरम कॉफी प्यायला आवडते.
मुंबई : आपल्यापैकी अनेकजणांना कॉफी सातत्याने कॉफी पिण्याची सवय असते. काहींना तर उपाशी पोटी झोपेतून उठल्यानंतर गरम गरम कॉफी प्यायला आवडते. सकाळी झोपेतून उठल्यानंतर आळस जरी कमी होत असला, तरीही अतिगरम कॉफी पिणे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. त्याचे वाईट परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतात. (Drinking hot coffee causes cancer)
एका रिसर्चनुसार, रिकाम्या पोटी अतिगरम कॉफी प्यायल्याने तुमच्या शरीरात कोर्टिसोल हार्मोनची वाढ होते. जर या हार्मोनची वाढ झाली तर आपल्या शरीरावर त्याचे वाईट परिणाम होतात. यामुळे कॅन्सर सारखा गंभीर रोग होण्याची शक्यता वाढते. दरम्यान कॉफी पिण्याची योग्य वेळ ही दुपारी असते असे तज्ज्ञ म्हणतात. कारण त्यादरम्यान आपले शरीर कामात सक्रीय झालेले असते.
त्यावेळी आपला सकाळचा नाश्ता झालेला असल्याने त्याला कॉफी पिऊन झाल्यावर अॅसिडिटीसारखा त्रास होत नाही. त्याशिवाय संध्याकाळी उशिरा कॉफी प्यायल्याने तुमच्या झोपेवर परिणाम होऊ शकतात. रिकाम्या पोटी कॉफी पिणाऱ्यांच्या शरीरात जास्त अॅसिड जमा होते. त्याचा परिणाम आपल्या पचनशक्तीवर होतो. विशेष म्हणजे कोणत्याही खाण्यातील पोषक तत्त्वे शरीराला मिळत नाही. त्यामुळे जरी तुम्ही निरोगी अन्न खाल्ले तरी ते तुमच्या शरीरासाठी व्यर्थ ठरु शकते.
चहा सारखं कॉफी देखील अनेक लोकांना आवडते. आरोग्यविषयी माहिती देणारी वेबसाईटनुसार, उत्तेजक पदार्थ म्हणून कॉफीचा वापर केला जातो. कॉफीमध्ये कॅफिन असते, ज्यामुळे आपली मज्जासंस्था उत्तेजित होते. कॉफीमध्ये सामान्य प्रमाणात व्हिटॅमिन बी, अतिशय कमी प्रमाणात मँगनीज आणि पोटॅशियम असतं. तज्ज्ञांच्या मते आपण कॉफीच्या सेवनावर नियंत्रण ठेवणं जरुरीचं आहे. कारण अति कॅफिनमुळे आपली मज्जासंस्था आणि पोटाच्या समस्या उद्भवू शकतात.
संबंधित बातम्या :
Food | ‘या’ पदार्थांना दूर ठेवा आणि हिवाळ्याच्या काळात सर्दी-खोकल्यापासून सुरक्षित राहा!
Skin Care | शिजवलेल्या तांदळापासून मिळेल चमकदार त्वचा, नक्की ट्राय करा ‘राईस’ फेसपॅक!
Healthy Cooking Oil | जेवणासाठी कोणते खाद्य तेल सुरक्षित? वाचा खाद्यतेलांचे फायदे-तोटे#HealthyCookingOil | #CookingOil | #goodfood | #health https://t.co/whxSc4xLH3
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 15, 2021
(Drinking hot coffee causes cancer)