दूधात गुळ मिसळून पिण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहिती आहेत का? वाचा

गुळ आणि दूध हे पदार्थ आपल्या शरिरासाठी किती फायदेशीर आहेत हे सर्वांनाच माहिती आहे.

दूधात गुळ मिसळून पिण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहिती आहेत का? वाचा
Follow us
| Updated on: Mar 10, 2021 | 8:09 AM

मुंबई : गुळ आणि दूध हे पदार्थ आपल्या शरिरासाठी किती फायदेशीर आहेत हे सर्वांनाच माहिती आहे. गुळाच्या पौष्टिक गुणधर्मांमुळे त्याला एक सुपर फूड देखील म्हटले जाते. गुळ आपल्या शरीरास डिटॉक्सिफाई करते. कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, पोटॅशियम, जस्त, प्रथिने आणि व्हिटामिन बी यासारखे पौष्टिक घटक त्यात भरपूर प्रमाणात आढळतात. गुळात प्राकृतिक उष्णता असते, त्यामुळे आपले शरीर आतून उबदार राहते. (Drinking jaggery mixed in milk is beneficial for health)

दूध आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात बरीच जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. ज्यातून आपल्याला पोषण मिळते आणि शरीर मजबूत बनण्यात मदत होते. दूध स्वतःच एक संपूर्ण अन्न मानले जाते. प्रथिने, चरबी, कॅलरीज, कॅल्शियम, व्हिटामिन डी, बी-2, बी-12, पोटॅशियम, फॉस्फरस आणि सेलेनियम यासारख्या पोषक घटकांमुळे दुधाची गुणवत्ता वाढते.

मात्र दूध आणि गुळ एकत्र करुन पिण्याचे देखील काही महत्वाचे फायदे आहेत.दुधात गूळ मिसळून पिल्यास शरिराच्या अनेक मुलभूत गरजा पूर्ण होतात. रोगप्रतिकारक शक्ति वाढवते, रक्त पुरवठा सुरळित होणे, थकवा दूर होतो, असे अनेक फायदे होतात. दुधात गुळ मिसळून पिल्यास रक्त स्वच्छ राहण्यास मदत होते.

रक्तामध्ये गाठी तयार होणे, रक्त पुरवठ्याचा त्रास होणे, अशा समस्या कमी होतात. पचनक्रिया तंदुरुस्त ठेवण्यासाठी आणि कफ टाळण्यासाठी याचा फायदा होतो. तुम्हाला जर मासिक पाळीचा त्रास होत असेल तर गुळ आणि दूध घ्या. गरोदर महिलांना थकवा आणि अशक्तपणा जाणवल्यास दुधात गूळ मिसळून पिण्याचा सल्ला अनेक वेळा दिला जातो.

संबंधित बातम्या : 

पायांना सतत दुर्गंध येतोय? मग ‘या’ घरगुती टिप्स ट्राय करा नि समस्येतून मुक्त व्हा!

Face Massage | त्वचेसाठी संजीवनी ठरेल ‘फेस मसाज’, वाचा याचे फायदे…

(Drinking jaggery mixed in milk is beneficial for health)

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.