मुंबई : दूध स्वतःच एक संपूर्ण अन्न मानले जाते. प्रथिने, चरबी, कॅलरीज, कॅल्शियम, व्हिटामिन डी, बी-2, बी-12, पोटॅशियम, फॉस्फरस आणि सेलेनियम यासारख्या पोषक घटकांमुळे दुधाची गुणवत्ता वाढते. रिफाईंड साखरेपेक्षा कमी गोड असलेली खडी साखर आपल्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम असते. आयुर्वेद शास्त्रातील अनेक औषधांमध्ये खडीसाखरेचा वापर केला जातो. (Drinking rock sugar and milk is beneficial for health)
सर्दी, जुनाट खोकला, घशातली खवखव, कफविकार, तोंडातील रोगजंतू, मानसिक ताण, तोंडाची दुर्गंधी, मूळव्याधी अशा एक ना अनेक व्याधींवर खडीसाखर उपयुक्त असते. दररोज रात्री कोमट दुधात खडी साखर मिक्स करून पिणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. दुधात प्रथिने, चरबी, कॅलरीज, कॅल्शियम, व्हिटामिन डी, बी-2, बी-12 आणि पोटॅशियम असते. तर खडी साखरमध्ये सर्दी, जुनाट खोकला, घशातली खवखव, कफविकार, तोंडातील रोगजंतूसाठी खडी साखर फायदेशीर आहे.
यामुळे दररोज रात्री कोमट दुधात खडी साखर मिक्स करून प्या. प्रत्येक कप गरम दुधात सुमारे 12 ग्रॅम नैसर्गिक साखर असते, जी आपले स्नायू आणि मेंदू मजबूत करते. त्यात 8 ग्रॅम पूर्ण प्रथिने देखील आहेत, ज्यात सर्व अमीनो आम्ल असतात. हे आपल्या स्नायूंना सामर्थ्य आणि मजबुती देतात. जर तुम्हाला अशक्तपणा आला असेल तर दूधामधून खडीसाखर घेतल्याचा नक्कीच चांगला फायदा होईल. अशक्त लोकांनी नेहमी त्यांच्याजवळ खडीसाखर ठेवावी. ज्यामुळे जेव्हा अचानक थकवा जाणवेल तेव्हा खडीसाखर तोंडात ठेवावी.
अशी बनते ‘खडी साखर’
खडीसाखर बनवण्याची पद्धत सोपी आहे. साखरेचा सुपर सॅच्युरेटेड पाक बनवून त्यात दोरा घालून गार होण्यासाठी ठेवून द्यावे. जसजसे मिश्रण गार होऊ लागते, दोऱ्याभोवती साखरेचे मोठे दगडासारखे (आकारहीन) स्फटिक तयार होऊ लागतात. ह्यालाच आपण दोऱ्याची खडीसाखर म्हणून ओळखतो. काही वेळा खडीसाखर बनवताना पाकात दूधही घातले जाते. धार्मिक विधींसाठी खडीसाखर बनवताना पाक बनवण्यासाठी नारळाचे पाणी वापरले जाते, असेही एका ठिकाणी नमूद करण्यात आले होते. हल्ली दोऱ्याचा वापर न करता बनवलेली विशिष्ट आकाराची खडीसाखरदेखील मिळते.
(टीप : वरील माहिती ही सामान्य माहितीवर आधारित असून, डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Milk Testing : सावधान! घट्ट दिसण्यासाठी दुधात मिसळले जातायत ‘हे’ घटक, अशी तपासा दुधाची शुद्धता
Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!
Beauty Tips | चेहऱ्याचे सौंदर्य वाढवतील ‘ही’ योगासने, तुम्हीदेखील नक्की ट्राय करा!#beautytips | #skincare | #yoga | #beauty https://t.co/zqbiogPSVT
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 25, 2021
(Drinking rock sugar and milk is beneficial for health)