Weight loss : झटपट वजन कमी करण्यासाठी दररोज सकाळी उपाशी पोटी प्या ‘बडीशेप पाणी’

आपण सर्वजण जेवणानंतर बडीशप खातो. बडीशेप मुख्यतः माऊथ फ्रेशनर अर्थात मुखवास म्हणून वापरली जाते.

Weight loss : झटपट वजन कमी करण्यासाठी दररोज सकाळी उपाशी पोटी प्या 'बडीशेप पाणी'
बडीशेप पाणी
Follow us
| Updated on: May 11, 2021 | 10:22 AM

मुंबई : आपण सर्वजण जेवणानंतर बडीशप खातो. बडीशेप मुख्यतः माऊथ फ्रेशनर अर्थात मुखवास म्हणून वापरली जाते. बडीशेपच्या गोड चव आणि सुगंधामुळेच लोक ती माऊथ फ्रेशनर म्हणून वापरतात. बडीशेप विविध पदार्थांची चव वाढवण्यासोबतच औषध म्हणून देखील वापरली जाते. बडीशेपमध्ये फायबर, अँटी-ऑक्सीडंट्स आणि खनिज इत्यादी असतात. शरीरावरील चरबी कमी करण्यासाठी बडीशेप खूप फायदेशीर आहे. (Drinking saunf water is beneficial for weight loss)

बडीशेपचे पाणी तयार करण्यासाठी सर्वात अगोदर पाणी मंद आचेवर गरम करण्यासाठी ठेवा आणि त्यामध्ये तीन चमचे बडीशेप घाला. 15 मिनिटे पाणी चांगले उकळूद्या आणि नंतर हे पाणी चाळून द्या. हे पाणी आपण सतत महिनाभर जर पिले तरी आपले वजन कमी होईल. बडीशेपमध्ये व्हिटॅमिन सी असून त्यात कॅल्शियम, सोडियम, लोह आणि पोटॅशियम सारख्या आवश्यक खनिज पदार्थांचा समावेश आहे. बडीशेपमध्ये फायबर, अँटी-ऑक्सीडंट्स आणि खनिज इत्यादी असतात.

शरीरावरील चरबी कमी करण्यासाठी बडीशेप खूप फायदेशीर आहे. यात असलेले आवश्यक तेल आणि फायबर सारखी पोषक तत्त्वे आपल्या शरीरातून टॉक्सिक घटक काढून टाकण्यास मदत करतात, म्हणूनच बडीशेप रक्त शुद्धिकरणासाठी देखील उपयुक्त आहेत. बडीशेपमध्ये असणाऱ्या नैसर्गिक तेलामुळे अपचन, आतड्यांची सूज आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यास मदत होते. असलेल्या अ‍ॅस्ट्रॅगल आणि अ‍ॅनिथोलमुळे, हे गॅस, वेदना आणि जठरासंबंधी विकार यांसारख्या पोटाच्या आजारांसाठी एक प्रभावी औषध मानले जाते.

बडीशेप घातलेले दूध बनवणे अत्यंत सोपे आहे. एक ग्लास दुधात एक चमचा बडीशेप घालून ते दूध चांगले उकळवून घ्या. नंतर हे दूध प्या. बडीशेप दूध हे पोटातील आजार बरे करण्यासाठी खूप प्रभावी मानले जाते. यात असलेल्या अ‍ॅस्ट्रॅगल आणि अ‍ॅनिथोलमुळे, हे गॅस, वेदना आणि जठरासंबंधी विकार यांसारख्या पोटाच्या आजारांसाठी एक प्रभावी औषध मानले जाते. मसालेदार जेवणामुळे होणारी जळजळ आणि आतड्यांची सूज कमी करण्यासाठी बडीशेप प्रभावीपणे कार्य करते.

संबंधित बातम्या : 

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

(Drinking saunf water is beneficial for weight loss)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.