Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tea Side Effect | उपाशी पोटी चहा पिताय? थांबा, होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार!

चहामधील कॅफिनचे प्रमाण तुम्हाला सक्रिय ठेवण्यास मदत करते. पण, जास्त चहा पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे.

Tea Side Effect | उपाशी पोटी चहा पिताय? थांबा, होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार!
Follow us
| Updated on: Jan 04, 2021 | 6:11 PM

मुंबई : चहा पिणे कोणाला आवडत नाही? काम करणारे लोक चहाचे सर्वाधिक सेवन करतात. कारण, चहामधील कॅफिनचे प्रमाण तुम्हाला सक्रिय ठेवण्यास मदत करते. पण, जास्त चहा पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. त्याहीपेक्षाही रिकाम्या पोटी चहा पिणे अधिक हानिकारक आहे. सकाळी उठल्याबरोबर बर्‍याच लोकांना चहाची तलफ येते. जर, चहा मिळाला नाही, तर लोकांचे डोके दुखू लागते. म्हणून, नुसता चहा पिण्याऐवजी, चहाबरोबर थोडा हलका फुलका नाश्ता देखील करावा, असा सल्ला नेहमी दिला जातो. केवळ चहा न पिता, त्यासोबत काही खाल्ल्यास शरीराला इजा होत नाही. पण, रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने काय नुकसान होते, हे आपल्याला माहिती आहे का? (Drinking tea on empty stomach causes lots of health problem)

लठ्ठपणाची समस्या

लठ्ठपणा या समस्येमुळे बरेच लोक त्रासलेले आहेत. परंतु, तरीही ते आपल्या खाण्यांच्या सवयींमध्ये अजिबात तडजोड करू इच्छित नाहीत. रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने, त्यात विरघळलेली साखरदेखील शरीरात जाते. ज्यामुळे वजन वाढते आणि लठ्ठपणाची समस्या निर्माण होते.

सांधे दुखी

बर्‍याच लोकांना सांधेदुखीची समस्या असते. यामागील एक मोठे कारण म्हणजे चहा! चहा पिण्यामुळे आपल्या हाडांमध्ये वेदना होतात आणि दातही पिवळसर पडू लागतात.

ताणतणावाचे मोठे कारण

काम करणारे लोक ताजेतवाने राहण्यासाठी चहाचे जास्त सेवन करतात. त्यामुळे अशा व्यक्तींच्या शरीरात कॅफिनचे प्रमाण लक्षणीय वाढते आणि त्यांचे मन खूप उत्साही होते. मात्र, यामुळे झोप देखील व्यवस्थित येत नाही. रिक्त पोट किंवा जास्त चहा पिण्यामुळे ताण आणि नैराश्यासारख्या समस्या उद्भवतात (Drinking tea on empty stomach causes lots of health problem).

अल्सरची समस्या

कित्येक लोकांना गरमागरम, कडक चहा पिणे आवडते. परंतु, सकाळच्या वेळी गरम चहा पिण्यामुळे पोटाच्या आतील पृष्ठभागावर इजा होते, ज्यामुळे पोटात हळूहळू अल्सरची समस्या उद्भवते.

पाचन शक्ती मंदावते

बरेच लोक नेहमी सकाळी सकाळी रिकाम्या पोटी चहाचा कप रिचवतात. त्याबरोबर काहीही खात नाहीत, ज्यामुळे पोटात गॅसचा त्रास होतो आणि पचनशक्ती कमी होते. रिकाम्या पोटी चहा प्यायल्यामुळे, पित्त प्रक्रियेत अडथळा येतो. ज्यामुळे आपल्याला मळमळल्यासारखे आणि चिंताग्रस्त वाटू शकते.

थकवा आणि चिडचिड

चहा पिण्यामुळे चपळता येते, असे म्हटले जाते. परंतु, सकाळी दूधयुक्त चहा प्यायल्याने दिवसभर थकवा येतो आणि कामात चिडचिड होऊ लागते.

हृदय रोग

रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने हृदयाची गती वाढते. ज्यामुळे हृदयविकाराची समस्य निर्माण होण्याची शक्यता असते.

(Drinking tea on empty stomach causes lots of health problem)

हेही वाचा :

दादांच्या बीड दौऱ्याला दांडी अन् फॅशन शोला हजेरी, बघा नेमकं काय खरं?
दादांच्या बीड दौऱ्याला दांडी अन् फॅशन शोला हजेरी, बघा नेमकं काय खरं?.
वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर, १४ तासांच्या चर्चेनंतर बील पास
वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर, १४ तासांच्या चर्चेनंतर बील पास.
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.