सावधान ! कॉफीच्या अतिसेवनामुळे गमवावू लागू शकते दृष्टी
तज्ज्ञांच्या मते, गरम कॉफीचे अतिसेवन केल्यास दृष्टी जाण्याचा धोका वाढतो. एका ठराविक प्रमाणाबाहेर कॉफी प्यायल्यास ग्लूकोमा म्हणजेच मोतीबिंदू होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे कॉफीच्या अतिसेवनामुळे डोळ्यांचे आरोग्य बिघडू शकते.
काही लोकांना चहा पिणे आवडते तर काहींना कॉफी. बऱ्याच जणांना कोल्ड्रिंक अथवा ज्यूस पिण्याची आवड असते. बरेचसे द्रव पदार्थ हे आरोग्यासाठी चांगले समजले जातात तर काही पदार्थ हे हानिकारक असतात. बऱ्याच जणांना सकाळी उठल्यानंतर चहा किंवा कॉफी प्यायची सवय असते. भारतासह जगभरात कॉफीला (Coffee) वाढती मागणी आहे. 1 कप स्ट्राँग कॉफी प्यायल्याने अनेकांच्या दिवसाची सुरूवात चांगली होते. मात्र बरेच जण दिवसभरात कॉफीचे अतिसेवन (excess coffee drinking is bad for health) करतात. अति तेथे माती, या उक्तीनुसार, कोणतीही गोष्ट एका मर्यादेबाहेर केल्यास त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. कॉफीच्या बाबतीतही तसेच होते. एका संशोधनानुसार, कॉफीच्या सेवनामुळे टाइप २ मधुमेह, फॅटी लिव्हर डिसीज आणि काही प्रकारच्या कर्करोगांच्या उपचारात मदत मिळू शकते. मात्र हीच कॉफी तुमच्या डोळ्यांसाठी ( bad for your vision) हानिकारक ठरू शकते, हे तुम्हाला माहीत आहे का ?
कॉफीच्या अतिसेवनाने मोतिबिंदूचा धोका ?
‘द मिरर’च्या वृत्तानुसार, अधिक प्रमाणात कॉफी प्यायल्यास ग्लूकोमा ( Glaucoma) म्हणजेच मोतिबिंदू होऊ शकतो. हा डोळ्यांच्या आजाराचा सामान्य प्रकार असला तरी त्यावर वेळेत योग्य उपचार न झाल्यास दृष्टी गमवावी लागू शकते. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, कॉफीमध्ये मोठ्या प्रमाणात कॅफेन असते, त्यामुळे दिवसातून 1 किंवा 2 कपपेक्षा जास्त कॉफी पिऊ नये. एखादी व्यक्ती या प्रमाणापेक्षा अधिक कॉफी पित असेल, तर त्यांना मोतीबिंदू होण्याचा धोका वाढतो.
कॅफेनयुक्त द्रव पदार्थांमुळे रक्तदाब वाढतो, ज्यामुळे डोळ्यांवरील दबावही वाढतो. डोळ्यांवर सतत दाब पडत राहिल्यास, मोतीबिंदू होऊ शकतो. दृष्टी जाण्यामागचे / अंधत्व येण्याचे, मोतीबिंदू हे जगभरात सर्वात मोठे कारण मानले जाते. हार्वर्ड मेडिकल स्कूलमधील संशोधनानुसार, दिवसभरात तीन किंवा त्यापेक्षा अधिक कप कॉफी प्यायल्यामुळे ‘एक्सफोलिएशन ग्लूकोमा’चा धोका वाढतो. शरीरातील द्रवाचे प्रमाण वाढून त्याचा दाब डोळ्यांच्या ऑप्टिक नसांवर पडल्याने मोतीबिंदू होतो.
या संशोधनामध्ये सहभागी झालेल्या लोकांच्या कुटुंबियांना ग्लूकोमा (झाल्याचा) इतिहास होता, ज्यामुळे मोतीबिंदूची जोखीम वाढते. ज्या व्यक्ती आठवड्यातून एखादा दिवसच कॉफी पितात, अशा लोकांना या संशोधनात सहभागी केले नव्हते. जे लोक दिवसभरात 3 कप व त्यापेक्षा अधिक प्रमाणात कॉफी पितात, त्यांचाच या संशोधनात अभ्यास करण्यात आला.
किती कॉफी पिणे योग्य ?
Healthline नुसार, कॉफीमध्ये कॅफेनची मात्रा किंवा प्रमाण वेगवेगळे असू शकते. म्हणजेच कधी 1 कप कॉफीमध्ये 50 mg कॅफेन तर कधी 400mg कॅफेन असू शकते. सामान्यत: एक कप कॉफीमध्ये 100mg कॅफेन असते. अनेक तज्ज्ञ या गोष्टीशी सहमत आहेत की एका दिवसात अंदाजे 400 मिलिग्रॅम कॅफेन सुमारे 4 कप कॉफीइतके असते. मध्यम प्रमाणात कॉफी पिणे हे केवळ तुमच्या डोळयांच्या दृष्टीनेच चांगले नसते तर त्यामुळे अनेक आजारांचा धोकाही कमी होतो. कच्च्या कॉफी बिन्समध्ये ( बिया) क्लोरोजनिक ॲसिड (सीजीए) असते, जे खूप चांगले ॲंटी- ऑक्सीडेंट आहे. ते रक्तदाब कमी करणे आणि रक्तप्रवाह सुधारणे यामध्ये मदत करते.
हळूहळू होतो मोतीबिंदू
ग्लूकोमा अथवा मोतीबिंदू ही एक अशी स्थिती आहे, ज्याचा वृद्ध आणि वयस्कर व्यक्तींवर जास्त परिणाम होतो. ग्लूकोमा खूप हळू-हळू, वर्षानुवर्षे विकसित होतो. त्याचा परिणाम हळूहळू दिसायला लागतो. प्रथमत: तुमची नजर धूसर होते व त्यानंतर त्याचे इतर परिणाम दिसू लागतात. त्यामुळेच बऱ्याच लोकांना त्यांना ग्लूकोमा / मोतीबिंदू झाला आहे, हे कळतच नाही. नियमितपणे डोळ्यांची तपासणी केली जात असेल, तरच त्याबद्दल कळू शकते.