Kidney Disorder Symptoms | किडनी खराब झाल्याची ही आहेत 5 महत्त्वाची लक्षणे, जाणून घ्या

डनी खराब होत असेल किंवा किडनीला काही इन्फेक्शन असेल तर किडनीकडून शरीराला काही संकेत दिले जातता. हे संकेत वेळीच ओळखले तर ठीक अन्यथा मोठ्या परिणामांना सामोरे जावे लागू शकते. जाणून घेऊया किडनीच्या आजाराची काही लक्षणे

Kidney Disorder Symptoms | किडनी खराब झाल्याची ही आहेत 5 महत्त्वाची लक्षणे, जाणून घ्या
KIDNEYImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jan 08, 2022 | 7:08 AM

मुंबई : किडनी हा शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे. रक्तातील टाकाऊ तसेच घातक पदार्थ बाहेर काढण्याचे काम किडनीद्वारे केले जाते. किडनीने आपले काम करणे सोडले किंवा एखाद्या आजारामुळे किडनी पूर्ण क्षमतेने काम करु शकत नसली, तर होणार त्रास हा असह्य होतो. किडनी खराब होत असेल किंवा किडनीला काही इन्फेक्शन असेल तर किडनीकडून शरीराला काही संकेत दिले जातात. हे संकेत वेळीच ओळखले तर ठीक अन्यथा मोठ्या परिणामांना सामोरे जावे लागू शकते. जाणून घेऊया किडनीच्या आजाराची काही लक्षणे.

भूक न लागने, उलटी होणे

युरिया, क्रिएटिनिन, अॅसिड यासारख्या नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थांना रक्तातून बाहेर काढण्याचे काम किडनीद्वारे केले जाते. किडनीच्या माध्यमातून हे टाकाऊ पदार्थ मुत्राशयात साठवले जातात. नंतर ते लघवीच्या माध्यमातून शरीराच्या बाहेर टाकले जातात. मात्र किडनीला काही आजार झाले की खूप त्रास होतो. त्याची काही लक्षणे आहेत. त्यातील सर्वात पहिले लक्षण म्हणजे भूक न लागणे. शरीरात टाकऊ पदार्थ साचल्यामुळे आपल्याला भूक लागत नाही. तसेच सकळी उठल्यानंतर मळमळ तसेच उलटी होण्याचा त्रास जाणवू लागतो. भूक न लगाल्यामुळे जेवण करण्याची इच्छा होत नाही, ही किडनीचा आजार असण्याचे लक्षणे आहेत.

पाय तसेच घोट्यांना सूज

किडनी शरीरातील आगावीच्या सोडियमला फिल्टर करण्याचे काम करते. किडनीने काम करणे बंद केल्यानंतर शरीरात सोडियमचे प्रमाण वाढायला लागते. यामुळे पाय, घोटे तसेच पिंढऱ्यांना सूज येते. याला एडिमा म्हणतात. तसं पाहायचं झालं तर किडनीचा आजार असेल तर डोळे तसेच चेहऱ्यावर सूज येते. मात्र काही प्रमाणात हात, पाय तसेच घोट्यावरदेखील सूज आलेली दिसते.

कोरडी त्वचा तसेच खाज

त्वचा कोकडी होणे तसेच खाज येणे हे किडनी डिसऑर्डचे मुख्य संकेत आहेत. किडनी रक्तातील नको असलेले घटक फिल्टर करण्यास सक्षम नसेल तेव्हा त्वचेवर खाज येणे तसेच त्वचा कोरडी पडणे अशी लक्षणे जाणवतात.

कमजोरी तसेच थकवा

थकवा तसेच कमजोर झाल्यासारखे वाटणे हे किडनीचा आजार सुरु झाल्याचे संकेत आहेत. नंतर किडनीचे आजार वाढल्यानंतर आणखी थकवा तसेच शरीर कमजोर झाल्यासारखं वाटतं. विशेष म्हणजे चालतानादेखील थकवा जाणवतो.

पुन्हा पुन्हा लघवी येणे

एका निरोगी व्यक्तीला दिवसातून सहा ते दहा वेळा लघवी येते. यापेक्षा जास्त वेळ लघवी येत असेल तर किडनीचा आजार झाल्याची शक्यता असते. किडनीचा आजार असलेल्या व्यक्तीला एक तर पुन्हा पुन्हा लघवीला जावे वाटते किंवा लघवीला जाण्याची एखाद्या व्यक्तीचा इच्छा होत नाही. काही लोकांच्या लघवीतून रक्तसुद्धा यायला लागते. किडनी खराब असण्याची ही काही मुख्य लक्षणे आहेत.

इतर बातम्या :

Jujube Fruit | कोरोनामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवायची आहे ? चिंतो नको फक्त बोर खा !

Lips Care : हे होममेड लिप स्क्रब ओठांचे सौंदर्य वाढवण्यासाठी अत्यंत फायदेशीर, जाणून घ्या याबद्दल!

Skin Care : या गोष्टी कॉफीसोबत चुकूनही घेऊ नका, होऊ शकते मोठे नुकसान!

Non Stop LIVE Update
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.