इअरफोनमुळे होऊ शकतो हृदयविकार! जाणून घ्या प्रमुख तोटे
इअरफोनमधून निघणारा आवाज कानाच्या पडद्याच्या जवळ आदळतो, त्यामुळे इअरड्रमला इजा होण्याची शक्यता असते. ही समस्या वाढल्यास बहिरेपणा येण्याचाही धोका असतो.
मोबाईलवर एखादा (mobile) चित्रपट बघायचा असो किंवा गाणे ऐकायचे असो, त्यासाठी आपण सगळेजण इअरफोन किंवा हेडफोन्स (earphones) वापरतो. इअरफोन हा आजकाल आपल्या जीवनशैलीचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. मात्र याच इअरफोनच्या अतिवापरामुळे केवळ ऐकण्याच्या क्षमतेवरच (side effects) परिणाम होत नाही तर हृदयाची समस्या देखील उद्भवू शकते. अशावेळी जास्त इयरफोन वापरण्याआधी या गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे. हेडफोन किंवा इअरफोनमधून निघणारा आवाज कानाच्या पडद्याच्या जवळ आदळतो, त्यामुळे इअरड्रमला इजा होण्याची शक्यता असते. ही समस्या वाढल्यास बहिरेपणा येण्याचाही धोका असतो.
खूप वेळ हेडफोन लावल्यास आपल्या मेंदूवरही परिणाम होतो. वास्तविक पाहता, इअरफोन किंवा हेडफोनमधून निघणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी या मेंदूवर परिणाम करतात. अनेक वेळा इअरफोनच्या अतिवापरामुळे आवाजाचा भ्रम निर्माण होतो.
कदाचित तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल आणि तुम्ही हैराणही व्हाल पण, इअरफोनच्या अतिवापरामुळे केवळ ऐकण्याच्या क्षमतेवरच परिणाम होत नाही तर हृदयाची समस्या देखील उद्भवू शकते. यामुळे हृदयाची गती जलद होते, ज्यामुळे हृदयाचे ठोकेही वाढतात.
अनेक वेळा बहुतांश लोक आपले हेडफोन्स किंवा इअरफोन्स हे एकमेकांसोबत एक्स्चेंजही करतात. मात्र असे केल्याने इअरफोनच्या स्पंजच्या माध्यमातून बॅक्टेरिआ हे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात पोहोचतात. अशामुळे कानात इन्फेक्शनही (संसर्ग) होऊ शकते.
इअरफोन जास्त वेळ कानावर लावून ठेवल्यास कानाच्या नसांवर दाब पडतो. यामुळे नसा सुजण्याची शक्यता असते. व्हायब्रेशनमुळे ऐकण्याच्या पेशी त्यांची संवेदनशीलता गमावू लागतात.