मोबाईलवर चॅट करता करता वजन कमी करा; ‘या’ एक्सरसाईज करून पाहाच

प्रत्येकाला फिट राहवसं वाटतं. परंतु, अनेकांना एक्सरसाईज करण्याचा कंटाळाही येतो. अनेकांना व्यायामासाठी वेळ मिळत नाही. तर काहींच्या मोटिव्हेशनची कमतरता असते. (easy workout tips while using mobile resting or watching tv)

मोबाईलवर चॅट करता करता वजन कमी करा; 'या' एक्सरसाईज करून पाहाच
workout
Follow us
| Updated on: Oct 08, 2021 | 7:55 AM

नवी दिल्ली: प्रत्येकाला फिट राहवसं वाटतं. परंतु, अनेकांना एक्सरसाईज करण्याचा कंटाळाही येतो. अनेकांना व्यायामासाठी वेळ मिळत नाही. तर काहींच्या मोटिव्हेशनची कमतरता असते. आज किंवा उद्या करू किंवा नव्या वर्षात वर्कआऊटला सुरुवात करू असं करून करून वर्कआऊट करणं टाळलं जातं. तुम्हीही अशाच लोकांपैकी एक असाल तर काही खास सोप्या ट्रिक्स वापरू शकता. अॅक्टिव्ह राहण्यासाठी जीममध्येच गेलं पाहिजे असं काही नाही. तुम्ही घरात झोपता झोपता, चालता चालता शरीराला अॅक्टिव्ह ठेवू शकता.

झोपता झोपता सायकलिंग

फिट राहण्यासाठी चांगल्या खाण्यापिण्याशिवाय अॅक्टिव्ह असणंही तितकच महत्त्वाचं आहे. तुम्ही जर संपूर्ण दिवस थकून जात असाल आणि वर्कआऊटही करू शकत नसाल तरीही तुम्ही स्वत:ला अॅक्टिव्ह ठेवू शकता. जर तुम्ही झोपता झोपता मोबाईल स्क्रॉल करत असाल तर त्याचवेळी पायाने सायकलिंगही करू शकता. झोपता झोपता करण्यात येणाऱ्या या एक्सरसाईजमुळे तुमच्या शरीराचे इतर बॉडी पार्ट्स अॅक्टिव्ह होतात.

चालता चालता फोनवर बोला

चालणे आरोग्यासाठी खूप चांगले आहे. तुम्ही मोबाईलवर बोलत असाल तर नेहमी चालता चालता बोला. त्यामुळे एकाचवेळी तुमचे दोन्ही कामे होतील. तुम्ही फोनवर बोलता बोलता उठबश्याही घालू शकता. नाही तर पायऱ्यांवरून चढउतारही करू शकता. ही एक चांगली वर्क आऊट आहे.

टीव्ही पाहताना दीर्घ श्वास घ्या

टीव्ही पाहत असताना तुम्ही हाताच्या मुव्हमेंट करू शकता. त्याचबरोबर दीर्घ श्वास घेण्याचा सराव करा. काही दिवस तुम्हाला हा प्रयत्न करावा लागेल. त्यानंतर हा सवयीचा भाग होईल.

या गोष्टी खाण्यचे टाळा

जास्त साखर किंवा जास्त सोडियमयुक्त पदार्थ खाणे टाळा. या प्रकारच्या पदार्थांमुळे लठ्ठपणा, उच्च कोलेस्ट्रॉल, मधुमेह आणि इतर अनेक चयापचय विकार होऊ शकतात. तसेच, तळलेले किंवा जास्त मसालेदार खाणे देखील टाळा. याव्यतिरिक्त अल्कोहोल, सिगारेट किंवा जास्त प्रमाणात कॅफिनचे सेवन टाळा.

पुरेशी झोप आणि पाणी

दररोज किमान 6-8 तासांची पुरेशी झोप घ्या. याशिवाय शरीर हायड्रेट राहण्यासाठी भरपूर पाणी प्या. कमी पाणी प्यायल्याने हिवाळ्यात डिहायड्रेशनचा धोका वाढतो. या दोन्ही गोष्टी आपल्या शरीराच्या योग्य कार्यासाठी खूप महत्वाच्या आहेत.

आहार

केवळ आरोग्यदायी गोष्टी खाण्याची सवय लावा. आपल्या आहारात प्रथिने, नैसर्गिक फॅट आणि शरीरास ऊर्जा देणारे कार्बोहायड्रेट समाविष्ट करा. याशिवाय हिरव्या पालेभाज्या आणि फायबरयुक्त फळंही नियमित खा.

संबंधित बातम्या:

गुडघ्यातून येणाऱ्या कट- कट आवाजाकडे दुर्लक्ष करताय? होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार!

Weight Loss : वजन कमी करण्यासाठी आहारात समाविष्ट करा हे 7 उच्च प्रथिनेयुक्त पदार्थ

Home Remedies : मळमळची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ नैसर्गिक घरगुती उपाय ट्राय करा!

(easy workout tips while using mobile resting or watching tv)

Non Stop LIVE Update
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.