रोजच्या आहारात केवळ दोन खजुरांचा समावेश करा!
सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये तणाव आणि थकवा येणे सामान्य झाले आहे.
मुंबई : सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये तणाव आणि थकवा येणे सामान्य झाले आहे. मात्र, तणावाचा आपल्या मेंदूवरही परिणाम होतो आणि यामुळे आपल्या मेंदूच्या क्षमतेवरही परिणाम होतो. म्हणूनच, आज आम्ही तुम्हाला अशा एका फळाबद्दल सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची हाडेही मजबूत होतील आणि तुमचे हृदयही निरोगी असेल. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, खजूर आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. (Eat 2 dates in a day to stay healthy and fit)
-खजूरचे नियमित सेवन केल्याने आपली हाडे मजबूत होतात. खजूरमध्ये फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम असते, जे आपल्या हाडांसाठी फायदेशीर आहे.
-खजूरचे सेवन केल्याने आपली रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते. त्यात फ्लेव्होनॉइड्स, कॅरोटीनोईड्स, फिनोलिक अॅसिड असतात. ज्यामुळे शरीराची प्रतिकार शक्ती वाढते. खजूरमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात, ज्यामुळे आपल्या त्वचेला फायदा होतो.
-दररोज सकाळी खजूर खाल्लाने मेंदूची क्षमता सुधारते. खजूरमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात. ज्यामुळे आपल्या मेंदूत कार्यक्षमता सुधारते.
-जर तुम्ही दररोज सकाळी फक्त 2 खजूर खाल्ल्या तर त्याचा काही दिवसांत त्याच्या शरीरावर प्रचंड परिणाम होईल. खजूर खाल्लाने थकवा येत नाही.
-खजूर दररोज खाल्लाने आपल्या डोळ्यांसाठी देखील फायदेशीर आहे.
संबंधित बातम्या :
Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो
Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!
सावधान! ताप आणि खोकलाच नाही, तर पोटासंबंधित ‘हे’ विकारही ठरु शकतात कोरोनाचे लक्षणेhttps://t.co/3h2V1upR37 #Coronasymptoms #coronavirus #Corona
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 11, 2020
(Eat 2 dates in a day to stay healthy and fit)