रोज खा मूठभर फुटाणे, मिळतील असंख्य फायदे

फुटाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट, प्रोटीन, कॅल्शियम, आयर्न आणि व्हिटॅमिन असते. दररोज नाश्त्यामध्ये अथवा जेवणाच्या आधी फुटाणे खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यामुळे हिवाळ्यात फुटाण्याचे सेवन करणे अधिक फायदेशीर ठरते.

रोज खा मूठभर फुटाणे, मिळतील असंख्य फायदे
Follow us
| Updated on: Nov 19, 2024 | 6:49 PM

अनेक लोक फुटाणे स्नॅक्स म्हणून खातात. मात्र फुटाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. फुटाण्याच्या सालीमध्ये फायबर आणि प्रोटीन मोठ्या प्रमाणात आढळते. हिवाळ्यात फुटाणे खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. ते फक्त चवीला छान लागतात असे नाही तर त्यात विविध पोषक घटक असतात. जे हिवाळ्यात शरीराला ऊर्जा आणि उबदारपणा देतात. फुटाण्यामध्ये प्रथिने, फायबर, लोह आणि इतर खनिजे घटक आढळतात. जे शरीराला ताकद देण्याचे काम करतात. फुटाणे गरम असतात जे थंडीपासून आराम देतात आणि शरीराला आतून उबदार ठेवतात.

पचनसंस्था सुधारते आणि वजन कमी करण्यास मदत करते

फुटाण्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. जे पचन सुधारण्यास मदत करतात आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्या दूर करतात. एवढेच नाही तर फुटाण्याच्या सेवनाने दीर्घकाळ भूक लागत नाही. ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते. फुटाणे शरीराला ताजेपणा आणि ऊर्जा देते जे संपूर्ण दिवसाच्या कामासाठी आवश्यक असते.

रक्तातील साखर नियंत्रित करते

फुटाणे अँटिऑक्सिडंटने ही भरपूर असतात. फुटाणे शरीरातील अतिरिक्त ग्लुकोजचे प्रमाण कमी करते. यामुळे फुटाणे खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी ही नियंत्रणात ठेवली जाऊ शकते. ज्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी ते फायदेशीर ठरू शकते.

हे सुद्धा वाचा

हाडे मजबूत होतात

वयाच्या चाळिशीनंतर शरीरातील हाडे कमकुवत होऊ लागतात. हेच कारण आहे की शरीरात जोड भागाशी संबंधित वेदना देखील सुरू होतात. हाडे मजबूत करण्यासाठी दररोज मूठभर फुटाणे खाणे फायदेशीर ठरू शकते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

फुटाणे पोटॅशियमने समृद्ध आहेत. ज्यामुळे हृदयविकाराचा धोका टळतो. फुटाण्याच्या सेवनाने शरीरात चयापचय वाढतो. तसेच शरीराची रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते.

असे खा फुटाणे

फुटाणे तुम्ही स्नॅक्स म्हणून खाऊ शकता, तुम्ही ते आले, हिरवी मिरची आणि लिंबू सोबत देखील खाऊ शकता. जे चव आणि पौष्टिकतेसाठी फायदेशीर आहे किंवा थोडे मीठ घालून त्याचे सेवन करू शकता. हिवाळ्यात फुटाणे खाणे हे तुमच्या आरोग्यासाठी एक सोपा आणि प्रभावी उपाय ठरू शकतो.

Non Stop LIVE Update
शरयू मोटर्सची चौकशी का झाली? श्रीनिवास पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
शरयू मोटर्सची चौकशी का झाली? श्रीनिवास पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी.
गोपीचंद पडळकरांनी पैसे वाटले? खळबळजनक आरोप करणारा मनोरूग्ण?
गोपीचंद पडळकरांनी पैसे वाटले? खळबळजनक आरोप करणारा मनोरूग्ण?.
'हा 'नोट जिहाद' आहे का? पैसा बाटेंगे आणि..',उद्धव ठाकरेंचा खरमरीत सवाल
'हा 'नोट जिहाद' आहे का? पैसा बाटेंगे आणि..',उद्धव ठाकरेंचा खरमरीत सवाल.
मतदानाच्या आधल्या दिवशीच नालासोऱ्यात राडा अन् डहाणूत मोठा राजकीय भूकंप
मतदानाच्या आधल्या दिवशीच नालासोऱ्यात राडा अन् डहाणूत मोठा राजकीय भूकंप.
तावडेंकडून पैसे वाटप, ठाकूरांना कोणी दिली टीप? राऊतांनी थेट सांगितलं..
तावडेंकडून पैसे वाटप, ठाकूरांना कोणी दिली टीप? राऊतांनी थेट सांगितलं...
तावडेंना तीन तास घेरलं, विवांत हॉटेल रुम नंबर 404 मध्ये 9 लाखांचे बंडल
तावडेंना तीन तास घेरलं, विवांत हॉटेल रुम नंबर 404 मध्ये 9 लाखांचे बंडल.
तावडेंकडून कोट्यावधींचं वाटप? ठाकूरांनी दाखवलेल्या 'त्या' डायरीत काय?
तावडेंकडून कोट्यावधींचं वाटप? ठाकूरांनी दाखवलेल्या 'त्या' डायरीत काय?.
तावडेंना घेरलं, पैशांचं वाटप, भाजप-बविआमध्ये निवडणुकीपूर्वी तुफान राडा
तावडेंना घेरलं, पैशांचं वाटप, भाजप-बविआमध्ये निवडणुकीपूर्वी तुफान राडा.
कालीचरण महाराजांची सभा? जरांग पाटलांवर जहरी टीका; संजय शिरसाट म्हणले..
कालीचरण महाराजांची सभा? जरांग पाटलांवर जहरी टीका; संजय शिरसाट म्हणले...
'टिकल्या, बुचड्या...', कालिचरण महाराजांची नक्कल करत जरांगेंचा पलटवार
'टिकल्या, बुचड्या...', कालिचरण महाराजांची नक्कल करत जरांगेंचा पलटवार.