हेल्दी डाएट घ्या आणि कोरोना काळात स्वास्थ्य राखा

तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी हेल्दी डाएट अत्यंत महत्वाचा असतो. मात्र, आपल्याकडे अनेकांना प्रश्न पडतो की, हेल्दी डाएट म्हणजे नेमका कोणता आहार आपण घेतला पाहिजे.

हेल्दी डाएट घ्या आणि कोरोना काळात स्वास्थ्य राखा
Follow us
| Updated on: Apr 12, 2021 | 9:26 AM

मुंबई : तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी हेल्दी डाएट अत्यंत महत्वाचा असतो. मात्र, आपल्याकडे अनेकांना प्रश्न पडतो की, हेल्दी डाएट म्हणजे नेमका कोणता आहार आपण घेतला पाहिजे. आज आम्ही तुम्हाला हेल्दी डाएटमध्ये काय घेतले पाहिजे हे सांगणार आहोत आणि सध्याच्या वाढलेल्या कोरोना परिस्थितीमध्ये तर हेल्दी डाएट घेणे महत्वाचे झाले आहे. कारण हेल्दी डाएटमुळे आपण आजारांना आपल्यापासून दूर ठेऊ शकतो. (Eat a healthy diet and boost your immune system)

प्रत्येक भाजी खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. कोबीमध्ये असलेले घटक कर्करोगासारख्या आजारांपासून आपले संरक्षण करतात. दररोज कोबीचे सेवन केल्यास आपले वजन कमी होईल. त्यात कमी कॅलरी घटक आणि उच्च फायबर घटक आहे. तसेच यात अनेक प्रकारची जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील आहेत. कोबीमध्ये व्हिटामिन सी, के आणि ए जास्त प्रमाणात असतात. तसेच ॉपॅन्टोथेनिक अॅसिड (बी 5), पायरीडोक्सिन (बी 6), थायमिन (बी 1), राइबोफ्लेविन (बी 2) नियासिन (बी 3) सारखी आवश्यक जीवनसत्त्वे देखील मुबलक प्रमाणात आढळतात.

प्रथिनेयुक्त बदाम आपले स्नायू तयार करण्यात मदत करतात. यासह बदाममध्ये आढळणारे फॅट चांगले आणि निरोगी असते, जे आपल्या शरीराचे बॉडी मास इंडेक्स म्हणजे बीएमआय राखण्यास मदत करते. विशेष म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी बदाम खाणे चांगले मानले जाते. जर आपल्याला हाडांशी संबंधित आजारांना दूर ठेऊन म्हातारपणातही ताठ राहायचे असेल, तर आपल्या आहारात निश्चितपणे कॅल्शियमयुक्त पदार्थ समाविष्ट करा.

टोमॅटो हे चवीला काहीसे आंबट असतात, कारण यामध्ये सायटीक अॅसिड असते. याशिवाय टोमॅटोमध्ये प्रोटीन, व्हिटामिन्स, मिनरल्स आणि फायबरची मात्राही भरपूर असते. हे व्हिटामिन ए, व्हिटामिन सी, व्हिटामिन ई आणि व्हिटामिन के चा खूप चांगला स्त्रोत आहे. ही सर्व व्हिटामिन्स आरोग्यासाठी खूप चांगली मानली जातात. टोमॅटोमध्ये पोटॅशिअम आणि मँगनीज भरपूर प्रमाणात असते. तसंच टोमॅटो कॅल्शिअम, आर्यन, कॉपर, मॅग्नेशिअम, फॉस्फरस आणि झिंक यासारख्या तत्त्वांनी युक्त असतो. टोमॅटोमध्ये अँटीऑक्सिडेंट गुणही आढळतात.

हा प्रथिनांचा चांगला स्रोत मानला जातो, म्हणून तो आहारात सामील करणे पौष्टिक असते. सोयाबीन तुमचे सौंदर्य वाढवण्यात देखील मदत करू शकते. खरं तर, सोयाबीनमध्ये व्हिटामिन ई आणि व्हिटामिन ए बरोबरच भरपूर खनिज घटक असतात, जे त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात. सोयाबीन चेहरा आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. कारण त्यात त्वचेचे पीएच पातळी संतुलित करणारे घटक असतात. सोयाबीन त्वचा सुधारण्यासाठी तसेच त्वचेचे आजार दूर करण्यासाठी खूप प्रभावी आहे. सोयाबीन चेहर्‍यातील अनेक त्रास तसेच समस्या दूर करतो. यामध्ये असे अनेक घटक आढळतात.

संबंधित बातम्या : 

(Eat a healthy diet and boost your immune system)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.