दररोज आहारात केळीचा समावेश करा होतील जबरदस्त फायदे, वाचा !
केळी खाणे आपल्या निरोगी आयुष्यासाठी खूप फायदेशीर आहे. केळीमध्ये पोटॅशियम, मूड-रेगुलेटिंग फोलेट, ट्रायटोफन आणि एनर्जाइजिंग कार्ब्स देखील असतात.
मुंबई : केळी खाणे आपल्या निरोगी आयुष्यासाठी खूप फायदेशीर आहे. केळीमध्ये पोटॅशियम, मूड-रेगुलेटिंग फोलेट, ट्रायटोफन आणि एनर्जाइजिंग कार्ब्स देखील असतात. हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. केळी आपल्या शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करतात आणि शरीराला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते. मात्र, काही लोक दररोज केळीचा आहारात समावेश करावा किंवा नाही, याबद्दल संभ्रमात असतात. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. दररोज केळी खाण्याचे काय फायदे आहेत. (Eat bananas in your daily diet and stay healthy)
बऱ्याच लोकांना सवय असते. सकाळी नाश्त्यासोबत केळी खाण्याची ही सवय अतिशय चांगली आहे. केळीमध्ये 100 कॅलरी उर्जा असते, ज्यामुळे तुमचे शरीर दिवसभर सफुर्तीवान राहते. विशेष म्हणजे केळी आपल्याला कोणत्याही हंगामात बाजारात मिळते. यामुळे दररोजच्या आहारात केळीचा समावेश केला पाहिजे. विशेष म्हणजे सध्याच्या कोरोनाच्या काळात आपण आहारात केळीचा जास्तीत-जास्त समावेश केला पाहिजे. कारण त्यात असलेले इलेक्ट्रोलाइट्स आणि खनिजे देखील शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात.
केळ्यामध्ये उच्च फायबर असते. केळी खाल्ल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते आणि शरीर निरोगी राहते. केळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम असते, जे उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. यामुळे तुमचे हृदयही मजबूत बनवते. केळ्यांसारख्या उच्च फायबरयुक्त पदार्थांना हृदयरोगाचा धोका कमी करण्यासाठी फायदेशीर मानले जाते. बर्याच लोकांना झोपेची समस्या असते. कमी झोप लागल्यामुळे बरेच लोक अत्यंत अस्वस्थ असतात. अशा प्रकारच्या समस्येमध्ये केळी खूप फायदेशीर ठरू शकतात.
पचनासाठी सगळ्यांत चांगली केळी ही पिवळी आणि ज्याच्या सालीवर तपकिरी रंगाचे छोटे छोटे ठिपके असतात. ती केळी सगळ्यात चांगली असते. केळ्यामध्ये उच्च फायबर असते. केळी उपाशी पोटी खाल्ल्याने मायग्रेनच्या रुग्णांसाठी हानिकारक आहे. असेही म्हटले जाते की, केळी चुकीच्या वेळी खाल्ल्यास, आपल्या रक्तातील खनिजे कमी होतात. केळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम असते, जे उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते.
संबंधित बातम्या :
रिकाम्या पोटी ‘चहा’ पिणे आरोग्यासाठी हानिकारक !
Health | देशातील 10 टक्के महिला PCODने ग्रासित, जाणून घ्या ‘या’ आजाराबद्दल…https://t.co/j8mizk9UJ9#PCOD #health
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 17, 2020
(Eat bananas in your daily diet and stay healthy)