दही खाल्ल्याने पित्ताचा त्रास होतोय? मग ‘या’ टिप्स नक्की फाॅलो करा !
बऱ्याच लोकांना दही खायला आवडते. मात्र, त्यांना पित्ताचा त्रास होत असल्यामुळे दही इच्छा असताना देखील खाता येत नाही.
मुंबई : बऱ्याच लोकांना दही खायला आवडते. मात्र, पित्ताचा त्रास होत असल्यामुळे दही इच्छा असताना देखील खाता येत नाही. आज आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही दही खाऊ शकता आणि पित्ताचा त्रास देखील होणार नाही. दह्यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, रायबोफ्लेविन, व्हिटॅमिन बी 6 आणि व्हिटॅमिन बी 12 सारखी पोषक तत्वांचा फायदा होतो. (Eat Curd in your diet to get rid of bile)
ज्या लोकांना पित्ताचा त्रास होतो त्यांनी दह्यामध्ये तूप, साखर, मुगाची भिजवलेली डाळ, मध किंवा आवळा घालून खावे. यामुळे त्यांना पित्ताचा त्रास होणार नाही. आंबट व अत्यंत आंबट दहीसुद्धा सेवन करू नये. यामुळे पित्ताचे व अपचनाचे विकार मागे लागतात. म्हणजेच फक्त गोड व आंबट-गोड दही आपण खाऊ शकतो. जे दही लागले आहे, जे मधुर रसदार व थोडे आंबट असते त्याला गोड दही असे म्हणतात. हे दही सर्वात उत्तम समजले जाते.
हे शक्तिवर्धक असून यामुळे पचनशक्तीसुद्धा सुधारते, भूक वाढते. मात्र, मधुमेह झालेल्या व्यक्तीने कोणत्याच प्रकारचे दही सेवन करू नये. दही तयार करण्यासाठी नेहमी ‘फुल क्रीम’ दुधाचा वापर करा. दही लावण्यासाठी दूध मातीच्या जाड मटका किंवा हांडीमध्ये साठवा. कारण, या भांड्यात उष्णता जास्त काळ राहते. भांड्यात टाकण्यापूर्वी प्रथम ते दूध चांगले उकळवा. पुन्हा थंड होऊ द्या. दूध कोमट झाल्यावर त्यात थोडे ताजे दही घाला. यासाठी साधारण एक लिटर दुधात एक चमचा दही टाकू शकता.
या मिश्रणाला व्यवस्थित फेटून घ्या. यानंतर, हांडी अशा ठिकाणी ठेवा जिथे ती जास्त वेळ गरम राहील. यासाठी आपण गरम चपात्या बनवण्याच्या ठिकाणी, किंवा जेवण बनवण्याच्या ठिकाणी ठेवू शकता. हे भांडे लोकरीच्या कपड्यात गुंडाळून पिठाच्या डब्यात किंवा कुकरच्या भांड्यामध्ये देखील ठेवू शकता. दही हा एक उत्तम प्रोबायोटिक पदार्थ आहे. त्यामध्ये असलेले सूक्ष्मजीव आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरते. दही अँटिऑक्सिडेंट म्हणून काम करते.
दह्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. याव्यतिरिक्त झोपेची समस्या दूर करण्यातही दही फायदेशीर आहे. केसांवर आणि त्वचेवर दही लावल्याने त्याचे चांगले परिणाम दिसू लागतात. डोक्यातील कोंडा टाळण्यासाठी केसांना दही लावणे फायदेशीर ठरते. यासाठी केसांना दही लावून अर्ध्या तासाने केस धुवावे. दहीमध्ये लैक्टोज असते. यामुळे तुमची पाचकशक्ती वाढते. ज्यांचे पचन तंत्र कमकुवत आहे अशा लोकांसाठी ते फायदेशीर आहे.
(टीप : सदर लेख संशोधनावर आधारित असून, कुठल्याही उपचारापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Skin Care Tips | लग्न करताय? ना ब्यूटी पार्लर, ना ट्रिटमेंट, ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा ग्लो!
Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायकhttps://t.co/y89Pxceis3#VitaminD #FoodSupplement
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 20, 2020
(Eat Curd in your diet to get rid of bile)