रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ड्रायफ्रुट्स, मासे, चिकन, सोयाबीन आणि पनीर खाणे फायदेशीर !

कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आरोग्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ड्रायफ्रुट्स, मासे, चिकन, सोयाबीन आणि पनीर खाणे फायदेशीर !
Follow us
| Updated on: May 15, 2021 | 7:14 AM

मुंबई : कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आरोग्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. कोरोना व्हायरसची दुसरी लाट आली आहे. प्रत्येक दिवशी कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. यामुळे या दिवसात आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे अत्यंत महत्वाचे आहे. जेव्हा आवश्यक असेल तेव्हाच घराबाहेर पडा आणि आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर विशेष लक्ष द्या. (Eat dried fruits, fish, chicken, Soybean and paneer to boost immunity)

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपण आहारात ड्रायफ्रुट्स, मासे, चिकन, सोयाबीन आणि पनीर याचा समावेश केला पाहिजे. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. ड्रायफ्रूट्समध्ये मोठ्या प्रमाणाच जीवनसत्त्वे, खनिजे, अमीनो अॅसिडस्, फायबर असतात. याशिवाय, व्हिटॅमिन बी 1, बी 9, सी, ई, के, एच ​​इ अशा अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे ड्रायफ्रूट्समध्ये असतात. लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, झिंक फॉस्फरस यासारखे पौष्टिक पदार्थसुद्धा ड्रायफ्रूट्समध्ये आढळतात. हे खाल्ल्याने अशक्तपणा दूर होतो.

हाडांशी संबंधित कोणतीही समस्या उद्भवत नाही. तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते. जर आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असेल तर आपण आहारात मासाचा समावेश केला पाहिजे. हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा पोषक तत्व आहे. त्यात असलेले व्हिटॅमिन-सी केवळ आपल्या प्रतिकारशक्तीसाठी चांगले नाही तर पुनरुत्पादक प्रक्रिया आणि डोळ्यांसाठी देखील फायदेशीर आहे. मासे लोहाचेही उत्तम स्रोत मानले जाते, जे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहे.

लोह आपल्या फुफ्फुसातून इतर ऊतकांमध्ये ऑक्सिजन पोहोचवण्याचे कार्य करते. अंड्यांमध्ये मुबलक प्रमाणत ‘व्हिटामिन डी’ आढळतो, जो तुमच्या हाडांना बळकटी देण्यास फायदेशीर ठरतो. अंडी सर्वोत्तम आणि आरोग्यासाठी उपयुक्त पदार्थांपैकी एक मानली जातात. अंड्यात कॅलरी, प्रथिने, निरोगी चरबी, फोलेट, कॅल्शियम, फॉस्फरस, सेलेनियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी 5, व्हिटॅमिन बी 12, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन बी 6 यासारखे पोषक असतात. यामुळे सध्याच्या कोरोना काळात आपण आहारात जास्तीत-जास्त अंडी घेतली पाहिजे. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

पनीरमध्ये पोटॅशियम, सेलेनियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि झिंक इत्यादी अनेक पोषक घटक असतात. पनीर आपल्याला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी ठेवते. आरोग्याच्या अनेक समस्यांवर मात करण्यासाठी पनीर मदत करते. पनीरमध्ये व्हिटॅमिन डी, कॅल्शियम आणि प्रथिने असतात. पनीरमध्ये कॉंज्युगेटेड लिनोलिक अॅसिड असते. यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो. त्यात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी देखील असते. यामुळे स्तनाचा कर्करोगाचा धोका कमी होतो.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

Face Massage | त्वचेसाठी संजीवनी ठरेल ‘फेस मसाज’, वाचा याचे फायदे…

(Eat dried fruits, fish, chicken, Soybean and paneer to boost immunity)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.