दररोज सकाळी कच्चा लसूण खा आणि वाढवा रोगप्रतिकारक शक्ती

कोरोनाच्या काळात जर आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असेल तर आपण कोरोनाच्या संसर्गापासून दूर राहू शकतो.

दररोज सकाळी कच्चा लसूण खा आणि वाढवा रोगप्रतिकारक शक्ती
लसूण
Follow us
| Updated on: Jun 04, 2021 | 9:05 AM

मुंबई : कोरोनाच्या काळात जर आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असेल तर आपण कोरोनाच्या संसर्गापासून दूर राहू शकतो. या काळात आहारात असा पदार्थांचा समावेश करा, ज्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल. पावसाळा आणि कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवण्यासाठी आम्ही काही खास टिप्स सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल. (Eat raw garlic every morning and boost the immune system)

लसूणमध्ये अँटी व्हायरल, अँटी फंगल आणि अँटी ऑक्सिडंट आहेत. आयुर्वेदात लसूण एक उत्तम औषध म्हणून वापरली जाते. लसूनमध्ये भरपूर प्रमाणात एलिसिन, झिंक, सल्फर, सेलेनियन आणि व्हिटॅमिन ए आणि ई सुद्धा आहेत. विशेष म्हणजे दररोज सकाळी आपण रिकाम्या पोटी लसणाच्या चार ते पाच पाकळ्या खाल्ल्यातर आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. मात्र, सकाळी रिकाम्या पोटी लसूण खाल्यानंतर शक्यतो पाणी पिणे टाळा. नाहीतर याचा गंभीर परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ शकतो.

लसूणमधील प्रथिने 6.3 टक्के, चरबी 0.1 टक्के, कार्ब 21 टक्के, खनिज 1 टक्के, लोह 0.3 टक्के, जीवनसत्त्वे ए, बी, सी असतात. म्हणून लसूण खाणे आपल्या निरोगी आयुष्यासाठी खूप फायदेशीर आहे. सूण खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतो. तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी हे खाऊ शकता. असे केल्याने हृदय निरोगी राहते. शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्याने अनेक समस्या उद्भवू शकतात. लसूण सेवन केल्याने पोटाच्या समस्या दूर होतात. लसण्याच्या रसाबरोबर तुम्ही मीठ, तूप आणि भाजलेली हिंग खाऊ शकता.

हे आपल्या पाचक प्रणालीस ठीक ठेवण्यास मदत करते. लसणाच्या रसात मध आणि लिंबू मिसळून त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट 10 मिनिटांसाठी आपल्या चेहऱ्यावर लावा. नंतर चेहरा पाण्याने धुवा. आठवड्यातून दोनदा हा उपाय केल्याने आपल्याला काही दिवसात फरक दिसून येईल.जर आपल्याला उच्च रक्तदाबाची समस्या असेल, तर लसूण आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे. परंतु रक्तदाब कमी असल्यास लसूणचे सेवन केल्याने आपली समस्या वाढू शकते.

(टीप : कोणत्याही उपचारापूर्वी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!

(Eat raw garlic every morning and boost the immune system)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.