Foods For Cholesterol : कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी ‘हे’ 8 पदार्थ आहारात घ्या
सध्या आपण पॅक केलेले आणि बाहेरचे अन्न जात प्रमाणात खातो. यामुळे कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता असते.
मुंबई : सध्या आपण पॅक केलेले आणि बाहेरचे अन्न जात प्रमाणात खातो. यामुळे कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता असते. कोलेस्ट्रॉलच्या वाढीमुळे हृदयविकाराचा झटका देखील येऊ शकतो. तसेच कोलेस्ट्रॉल वाढण्याची अनेक कारणं असू शकतात. म्हणजेच बाहेरचं खाणं, व्यायाम न करणं, तळलेलं अन्न खाणं आणि आरोग्यदायी नसलेली जीवनशैली याला कारणीभूत ठरू शकते. कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यासाठी आपण आहारात काही पदार्थांचा समावेश केला पाहिजे. ज्यामुळे आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉल नियंत्रित राहू शकतो. (Eat these foods to control cholesterol)
अॅवाकाडो – अॅवाकाडोमध्ये भरपूर प्रमाणात मोनो सॅच्युरेटेड फॅट, फायबर आणि पोटॅशियम असते. जे आपल्या शरीरातील एचडीएल कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवते आणि एलडीएल कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते. म्हणूनच अॅवाकाडोला ‘सुपर फूड’ असे देखील म्हणतात. अॅवाकाडो सॅलड आणि इतर पाककृतींमध्ये वापरले जाते.
नारळाचे दूध – नारळाच्या दुधात संतृप्त चरबी असते. हे कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यास मदत करते. त्यात लॅरिक अॅसिड असते. हे चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते. म्हणूनच, कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी आपण आपल्या आहारात नारळाच्या दुधाचा समावेश करू शकता.
डार्क चॉकलेट – डार्क चॉकलेट फक्त खाण्यापुरतेच मर्यादित नाही. त्याव्यतिरिक्त डार्क चॉकलेटमध्ये भरपूर फायबर, हेल्थी फॅट, लोह, मॅग्नेशियम, अँटिऑक्सिडेंट्स आहेत. जे आपले रक्तदाब कमी करतात आणि एलडीएल कोलेस्ट्रॉल देखील कमी करतात.
ओट्स – आहारात ओट्स असणं फायदेशीर आहे. ओट्स खाल्ल्याने कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित राहते. यामध्ये ग्लूकोन नावाचा घटक असतो जो आतडे साफ करण्यास मदत करतो.
कांदा – चवीसाठी जेवणामध्ये कांदा वापरला जातो. पण त्याचे अनेक आरोग्यादायी फायदेही आहेत. लाल कांद्या खाल्ल्याने कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित केली जाऊ शकते.
लसूण – लसूणमध्ये अॅलिसिन आणि वनस्पती घटक असतात. यामुळे एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी होतो. याद्वारे रक्तदाब देखील नियंत्रित केला जातो. लसूण खाल्ल्याने हृदयरोग आणि स्ट्रोक टाळता येऊ शकतो.
सोयाबीन – सोयाबीनमध्ये अनेक पोषक घटक असतात. यामध्ये फायबर देखील मोठ्या प्रमाणात असते. याव्यतिरिक्त, त्यात अँटीऑक्सिडंट्स असतात. यामुळे पाचन तंत्र निरोगी राहते. तसेच कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहतो.
बदाम – बदाम खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम इ. असते. ते रक्तदाब नियंत्रित करण्यात मदत करतात. अक्रोडमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड असतात. हे हृदय निरोगी ठेवते.
(टीप : कोणताही उपाय करण्यापूर्वी नेहमीच एखाद्या विशेषज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)
संबंधित बातम्या :
Skin Care | चेहऱ्यावरील नको असणाऱ्या केसांमुळे त्रस्त आहात? पार्लर विसरा आणि ‘हे’ उपाय ट्राय करा!
Health | देशातील 10 टक्के महिला PCODने ग्रासित, जाणून घ्या ‘या’ आजाराबद्दल…https://t.co/j8mizk9UJ9#PCOD #health
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 17, 2020
(Eat these foods to control cholesterol)