Weight Loss Tips : लवकरात लवकर वजन घटवायचंय?, ‘हे’ पदार्थ सोबत खा, मग बघा रिझल्ट

वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेकजण प्रयत्न करत आहेत. वजन कमी करताना आपण आपल्या आहाराची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे.

Weight Loss Tips : लवकरात लवकर वजन घटवायचंय?, 'हे' पदार्थ सोबत खा, मग बघा रिझल्ट
वजन कमी करण्यासाठी मेथीचा चहा खूप फायदेशीर आहे. मेथीचा चहा घरी तयार करण्यासाठी आपल्याला आठ ते दहा मेथी घ्याव्या लागतील. त्यानंतर एक ग्लास पाण्यात मेथी उकळून घ्या आणि हे पाणी गाळून घेऊन प्या. यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते.
Follow us
| Updated on: Jun 10, 2021 | 10:05 AM

मुंबई : वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेकजण प्रयत्न करत आहेत. वजन कमी करताना आपण आपल्या आहाराची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. आपण आहारात असे काही पदार्थ घेतले पाहिजेत. ज्यामुळे आपल्याला जास्त वेळ भूक लागणार नाही. हे नेमके कोणते पदार्थ ज्यामुळे आपल्याला भूक लागत नाही आणि आपले वजनही झटपट कमी होण्यास मदत होते, हे आज आपण बघणार आहोत. (Eat these foods together to lose weight)

सफरचंद आणि पीनट बटर

वजन कमी करण्यासाठी पीनट बटर आणि सफरचंद हे एक उत्तम पर्याय आहे. पीनट बटर आणि सफरचंद आपण एकत्र खाल्ल्याने आपले वजन झटपट कमी होण्यास मदत होते. सफरचंदमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, म्हणून वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. पीनट बटरमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट असते. जे आपल्याला वजन कमी करण्यास आणि पॉलीअनसॅच्युरेटेडमुळे आपल्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते.

ओट्स आणि अक्रोड

ओट्स खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात फायबरचे प्रमाण जास्त असते. हे पाचन तंत्र निरोगी ठेवते. त्यात चरबी नसते. अक्रोडमध्येही अनेक पोषक घटक असतात. हे आपल्याला वजन कमी करण्यात मदत करतात. म्हणून, वजन कमी करण्यासाठी आपण ओट्स आणि अक्रोड एकत्र खाऊ शकता.

पुदिना आणि लिंबूसह ग्रीन टी

आपण अनेकदा ग्रीन टीमध्ये लिंबू मिक्स करून पिले असेल. मात्र, ग्रीन टीमध्ये लिंबु आणि पुदिना मिक्स करून पिले पाहिजे. यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते. लिंबू आणि पुदीना पाने असलेली ग्रीन टी तुम्हाला बर्‍याच काळासाठी हायड्रेट ठेवू शकते. हे आपले वजन कमी करण्यात मदत करते. पुदीनाची पाने भूक कमी करण्यासाठी ओळखली जातात. यामुळे बराच काळ आपल्याला भूक लागत नाही.

दही आणि दालचिनी

दह्याचे सेवन आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. मात्र, वजन कमी करण्यासाठी आपल्याला दह्यामध्ये चिमूटभर दालचिनी मिक्स करावी लागेल. अँटीऑक्सिडेंट्स आणि इतर पौष्टिक पदार्थांसह समृद्ध दालचिनी शरीरात साठवलेल्या चरबीचे प्रमाण कमी करण्यास मदत करते. यामुळे आपण दिवसातून एकवेळा तरी दही आणि दालचिनीचा आहारात समावेश करावा.

डाळिंब आणि बदाम

वजन कमी करण्यासाठी बदाम फायदेशीर असतात. डाळिंब आणि बदाम एकत्र खाल्ल्याने आपले वजन कमी होण्यास मदत होते. डाळिंबामध्ये जीवनसत्त्व बी, सी, के आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. डाळिंबामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. यामुळे आपण दररोजच्या आहारात डाळिंब आणि बदामाचा समावेश करावा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या)

संबंधित बातम्या : 

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

Face Massage | त्वचेसाठी संजीवनी ठरेल ‘फेस मसाज’, वाचा याचे फायदे…

(Eat these foods together to lose weight)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.