Healthy Foods: वर्कआऊट केल्यानंतर खा ‘ हे ‘ पदार्थ, लगेच मिळेल एनर्जी

वर्कआऊट केल्यानंतर तुम्ही काही हेल्दी पदार्थ खाऊ शकता. हे पदार्थ खाल्ल्याने तुम्हाला लगेच एनर्जी मिळू शकेल.

  Healthy Foods: वर्कआऊट केल्यानंतर खा ' हे ' पदार्थ, लगेच मिळेल एनर्जी
Follow us
| Updated on: Oct 25, 2022 | 12:24 PM

नवी दिल्ली-  वजन कमी करण्यासाठी तसेच फिट राहण्यासाठी (to be fit) बऱ्याचशा व्यक्ती जिममध्ये तासनतास व्यायाम, वर्कआऊट (workout) करतात. वर्कआऊट केल्यानंतर आपली एनर्जी (low energy) कमी होते. अशा वेळी तुम्ही आहारात काही हेल्दी पदार्थांचा समावेश करू शकता. वर्कआऊट केल्यानंतर या पदार्थांचे सेवन केल्यानंतर एनर्जी मिळते. वर्कआऊट केल्यानंतर तुम्ही कोणते पदार्थ खाऊ शकता, ते जाणून घेऊया.

पनीर – पनीर हे प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे. ते स्नायूंसाठीही खूप फायदेशीर आहे. वर्कआउट केल्यानंतर तुम्ही पनीरचे सेवन करू शकता. कच्चे पनीर किंवा सॅलॅडमध्ये त्याचा वापर करून तुम्ही खाऊ शकता. पनीर खाल्ल्याने ते शरीराला ऊर्जा देण्याचे कार्य करते.

ड्रायफ्रूट्स – ड्रायफ्रूट्समध्ये अनेक चांगले गुणधर्म असतात, ते आपल्या आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतात. त्यामुळे वर्कआऊट केल्यानंतर तुम्ही ड्रायफ्रुटसचे सेवन करू शकता. वर्कआउटनंतर कमी झालेली एनर्जी भरून काढण्याचे काम ते करतात. तसेच आपले शरीरही मजबूत करण्यास मदत करतात. काजू, बदाम आणि पिस्ता यांचा तुम्ही आहारात समावेश करू शकता. ते जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध असतात.

हे सुद्धा वाचा

फळे – तुम्ही फळांचाही आहारात समावेश करू शकता. हंगामानुसार येणारी विविध फळे आपल्याला त्वरित ऊर्जा देण्याचे काम करतात. त्यांचे सेवन केल्याने पोटही बराच वेळ भरलेले राहते व सारखी भूक लागत नाही. त्यामुळे आपले वजनही नियंत्रित राहण्यास मदत होते. वर्कआऊट केल्यानंतर तुम्ही सफरचंद, केळी आणि ॲवोकॅडो इत्यादी फळांचे सेवन करू शकता. ते आपल्याला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करतात.

हिरव्या पालेभाज्या –

हिरव्या पालेभाज्या या सर्वांच्याच आरोग्यासाठी फायदेशीर असतात. त्यात अनेक पौष्टिक तत्वं असतात. हिरव्या पालेभाज्यांचा तुम्ही आहारात समावेश करू शकता. वर्कआउटनंतर केल, पालक आणि ब्रोकोली इत्यादींचे सेवन करू शकता. त्या खाल्याने तुम्हाला ऊर्जा मिळते. हिरव्या भाज्याचा हा वर्कआउटनंतर खाण्यासाठी हा एक निरोगीव व चांगला पर्याय आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.