कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ‘हे’ घटक आहारात घ्या!

सध्याच्या कोरोना काळात साफसफाईपासून ते सोशल डिस्टंसिंगपर्यंत सगळ्या गोष्टींकडे बारकाईने लक्ष दिले जात आहे.

कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी 'हे' घटक आहारात घ्या!
निरोगी आहार
Follow us
| Updated on: Jun 03, 2021 | 5:41 PM

मुंबई : सध्याच्या कोरोना काळात साफसफाईपासून ते सोशल डिस्टंसिंगपर्यंत सगळ्या गोष्टींकडे बारकाईने लक्ष दिले जात आहे. या सगळ्यासोबत कोरोनापासून बचावासाठी सगळ्यात महत्त्वाची आहे ‘रोगप्रतिकारक शक्ती’ रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवावी, याविषयी सगळेच संभ्रमात असतात. रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवण्यासाठी हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (Eat these ingredients to boost the immune system)

पालक – पालकामध्ये कॅलरी, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, रेशे असतात. पालकामध्ये खनिज लवण म्हणजे कॅल्शियम, फॉस्फरस, क्लोरिन, लोह आणि जीवनसत्त्व ए, बी, सी आणि इ भरपूर प्रमाणात असते. विशेष म्हणजे पालक खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

ब्रोकोली – ब्रोकोली लोह, व्हिटामिन ए, सी, पोटॅशियम, प्रथिने, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट आणि क्रोमियमचा उत्कृष्ट स्रोत आहे. त्यात अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात आढळतात. यात इंडोल्ड 3 कार्बिनॉल देखील आहे, जो शरीरातील अ‍ॅक्रेल हायड्रोकार्बन रिसेप्टर नावाच्या प्रोटीनला सक्रिय करतो.

सोयाबीन – सोयाबीनमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने, मॉलिव्डेनम, ट्रिप्टोफॅन, मँगनीज, लोह, ओमेगा-३, फॅटी अॅसिड्स, फॉस्फरस, फायबर, मॅग्नेशियम, तांबे, ‘ब’ व ‘क’ जीवनसत्त्व आणि काही प्रमाणात पोटॅशियम असते. सोयाबीनमध्ये स्निग्ध पदार्थ भरपूर प्रमाणात असतात.

दुधी भोपळा – दुधी भोपळा हा शरीरासाठी खाणे चांगला असतो. दुधी भोपळ्याला आयुर्वेदिक औषधी गुणांमुळे विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यात लोह, कॅल्शियम, फॉस्फरस व अन्य खनिजे तसेच क जीवनसत्व आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी दुधी भोपळा खूप फायदेशीर आहे.

स्ट्रॉबेरी – स्ट्रॉबेरी शरीरातील अनेक खनिजे आणि जीवनसत्त्वे यांची कमतरता पूर्ण करू शकते. स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटामिन आणि फायबरचे प्रमाण खूप जास्त असते. विशेष म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी स्ट्रॉबेरी गुणकारी आहे. सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये दररोज स्ट्रॉबेरी खाल्ल्या पाहिजेत.

भेंडी – भेंडीमध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम ही जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे भेंडीची भाजी खाल्ल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. भेंडीमध्ये युगेनॉल मोठ्या प्रमाणात आढळते. हे डायबिटीजच्या रुग्णांसाठी उपयुक्त आहे. भेंडी खाल्ल्याने शरीरात ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित राहते.

टोमॅटो – टोमॅटोमध्ये व्हिटामिन सी, लाइकोपीन आणि पोटॅशियम हे घटक पर्याप्त प्रमाणात आढळतात. याशिवाय टोमॅटोमध्ये प्रोटीन, व्हिटामिन्स, मिनरल्स आणि फायबरची मात्राही भरपूर असते. हा व्हिटामिन ए, व्हिटामिन सी, व्हिटामिन ई आणि व्हिटामिन के चा खूप चांगला स्त्रोत आहे. ही सर्व व्हिटामिन्स आरोग्यासाठी खूप चांगली मानली जातात.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Turmeric Side Effects | पोटाच्या समस्यांपासून ते मुतखड्यापर्यंत, ‘हळदी’च्या अतिसेवनाने होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम!

Health Care | हवामान बदलतंय! अशाप्रकारे घ्या आपल्या आरोग्याची काळजी

(Eat these ingredients to boost the immune system)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.