मुंबई : उन्हाळ्यामध्ये आरोग्याची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. म्हणूनच, स्वतःला हायड्रेटेड ठेवण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय करतो. अनेक फळे खाऊन आपणाला उकाड्यापासून आराम मिळवता येतो. फळ खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. उन्हाळ्याचा हंगामात त्वचेची आणि शरीराची विशेष काळजी घ्यावी लागते.
उन्हाळ्यात आपण जास्त करून कलिंगड खाण्यावर भर देतो. कारण कलिंगडमध्ये अँटिऑक्सिडेंट्स, जीवनसत्त्वे बी, सी आणि डी मोठ्या प्रमाणात आढळतात. जे उन्हाळ्यात शरीरासाठी खूप महत्वाचे मानले जातात. कलिंगडमध्ये साधारण 92 ते 96 टक्के पाण्याचं प्रमाण असते.
काकडी तुम्हाला बर्याच आजारांपासून दूर ठेवते. आपण काकडी कोशिंबीरसाठी जास्त वापरतो किंवा जेवताना देखील काकडी खातो. काकडीमध्ये बरेच पौष्टिक पदार्थ आढळतात. ज्यामुळे शरीरातील रक्तामध्ये साखरेचे पातळी नियंत्रण राहते. म्हणूनच काकडी खाल्ल्याने मधुमेहावरही नियंत्रण मिळते. म्हणून उन्हाळ्यात काकडी खाण्याचा सल्ला दिला जातो.
उन्हाळ्यात लिंबू पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. उन्हाळ्याच्या काळात, आम्लपित्त, मळमळ किंवा अपचन यासारख्या समस्या उद्भवतात, अशा परिस्थितीत ही लिंबू पाणी प्रभावी मानले जाते. लिंबू पाणी हे असेच एक पेय आहे. उन्हाळ्यात घामामुळे शरीराचे अनेक घटक बाहेर पडतात. आवश्यक इलेक्ट्रोलाइट्स देखील शरीराबाहेर पडतात. दररोज एका ग्लास लिंबू पाणी प्यायल्याने या घटकांची मात्रा शरीरात टिकून राहते.
उन्हाळ्यात दही खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. दह्यामध्ये अनेक पोषक घटक असतात. दररोज दही खाल्ल्याने केवळ ताजेतवाने वाटत नाही तर, पाचन तंत्रही ठीक राहते आणि पोटाचा त्रासही होत नाही. दही ऑस्टिओपोरोसिस, रक्तदाब, केस आणि हाडे यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. दह्यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, राइबोफ्लेविन, व्हिटामिन बी 6 आणि व्हिटामिन बी12 या पोषक घटकांचे प्रमाण अधिक असते.